- 40
- 1 minute read
ओबीसी आरक्षण बचाव यात्रा कुणासाठी ?
ओबीसी आरक्षण बचाव यात्रा कुणासाठी ?
२५ जुलै पासुन चैत्यभुमीवर महामानवाला अभिवादन करुन आरक्षण यात्रा पुढच्या मार्गावर मार्गक्रम करत आज तुळजापुर उजनी औसा निलंगा मार्गे लातुर मुक्कामी असणार आहे. ओबीसी बांधवांना त्यांच्या अस्तीत्वाची व राजकीय प्रक्रीयेत त्यांच्या वंचित विवंचनेची सत्यता सांगण्यासाठी या यात्रेचे आयोजन आहे. देशभरात बहुसंखेत असणारा समाज समुह आज धार्मीक चौकटीत बंदीस्त करुन खोट्या हिदुत्वाच्या साखळीत अडकुन पडला आहे. सरंजामी प्रस्थापीतांच्या दारात चाकरी व पोसभर भाकरीसाठी आलेल्या लाचारीत आजही कुंढत आहे. चारदोन सामाजीक तिय्यम नेतृत्वाचे दाखले मिरवत प्रस्थापीत घराणी ओबीसी बांधवांचे सामाजीक व राजकीय शोषण करत आहेत. राज्यातील विधान भवनात ओबीसींचा जेवढा जातसमुह म्हणुन टक्का असावा त्यापेक्षा तो कितीतरी कमी आहे उलट जात म्हणुन विशीष्ट घराण्यांचीच विधानभवनात पारंपारीक मक्तेदारी आहे. हीच मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी बांधवांना त्यांच्या पिढीचे भविष्य सुकर करण्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे आयोजन करीत निसर्गाच्या प्रतीबंधाला न जुमानता पिढ्यांपिढ्या चालत असलेले निर्बंध झुगारण्यासाठी ओबीसी बांधवांना साद देत आहेत. ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या घोषणेपासुनच प्रस्थापितांच्या पोटात शुळ उठले आहे. यात्रेला काउंटर करण्यासाठी महायुती व मवीआ आपले प्यादे पुढे करत आहेत. आरक्षण हा घटनेत ठरवुन दिलेला आराखडा मात्र प्रस्थापीत त्याला आपली मालकी समजत जहागीरदारी बहाल करावी त्याप्रमाणे स्थापीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना माहीत आहे घटनेच्या कसोटीवर हे शक्य नाही मात्र वेळ मारुन नेण्यात तरबेज असलेले ओबीसी बांधवांची शिकार करत आहेत.
आरक्षण प्रश्न
जातसमुह म्हणुन आरक्षण व फक्त जात म्हणुन बळकावलेले आरक्षण कसे आकारास येईल.
मराठा बांधव व ओबीसी आरक्षण यात ऐतीहीसीक फरकाचे दाखले आहेत.
सर्वात मोठे दुर्देव हे की महाराष्ट्रात आलटुन पालटुन मराठ्यांच्याच हातात सत्ता मात्र मराठा बांधव आजही गरीबीच्या गर्तेत का ? तर याला कारणीभुत सत्ताधारी मराठा घराणी. ( या विषयावर चर्चा पुढील भागात )
ओबींसीचे आरक्षण बळकावुन किंवा बळजबरीने मिळवुन ते सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. ओबीसींना सत्ताधारी किंवा विरोधक घटनात्मक संरक्षण देण्यास आज तरी असमर्थ दिसत आहेत.
ओबीसींचे नेते त्या त्या पक्षात ओबीसींच्या सुरक्षीतते पेक्षा त्यांची वैयक्तीक राजकीय सुरक्षेला प्राधान्य देत आहेत.
आरक्षण हा घटनात्मक तांत्रीक मुद्दा योग्यतेने हाताळण्यापेक्षा जातीय तणावाचा मुद्दा बनवण्यात येत आहे.
हा मुद्दा घटनेच्या चौकटीत राहुन सहज सुकर करत दोन्ही घटकांना योग्य न्याय मिळवुन दिल्या जावु शकतो. ओबीसींचे सामाजीक , शैक्षणीक व राजकीय आरक्षण आबाधीत ठेवत त्यांना टक्केवारीनुसार सरकारात सहभागी केल्या जावु शकते मात्र ओबीसी बांधवांनी आता कुस बदलावी. घटनाकारांचे नातु कायद्याचे तज्ञ बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसी बांधवांना त्यांचा घटनात्मक अधिकार मिळवुन व कायम टिकवुन ठेवण्यास सक्षम आहेत. हे सर्व साकार करण्यासाठी अधिकार हवेतव हे सर्व अधिकार विधीमंडळात अमलात येण्यासाठी विधीमंडळात सत्ता हवी. जर आपली सत्ता असेल तर आपले सरकार असेल व आपले सरकार असेल तर आपलाच घटनात्मक अधिकार असेल. हे सर्व अधिकार मिळवण्यासाठी ओबीसी बांधवांनी आज निर्णय घ्यावा ओबीसी आरक्षण यात्रेत सहभाग नोंदवुन बाळासाहेबांचे म्हणणे समजुन घेवुन त्यांचे हात बळकट करावेत. येत्या विधानसभा निवडणुकीत ओबीसींचे १०० आमदार निवडुन आणणे हे ध्येय ठरवुन वंचित बहुजन आघाडी निवडणुका लढणार आहे व आपले अधिकार शाबुत ठेवणे ही अपरीहार्यता ओबीसी बांधवांनी समजुन उमजुन आपल्या येणा-या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी सद्सद्व विवेक बुध्दीने पुढील राजकीय क्रमीता ठरवावी. राज्यातील चालु असलेल्या यात्रेस आपले तन मन धनाने सहभागीत्व नोंदवावे ही विनंती…
संतोष गवई