घरच्यांना सोडून दारच्यांच्या पायावर लोळण घेणारा तू,
पैशासाठी स्वाभिमानाची चाळण करवून घेणारा तू,
“भाऊ” “भाऊ” म्हणता म्हणता, “भो” “भो” कधीं करायला लागलास तूला कळलेच नाही.
हक्कांच्या वनात वाघासारखे जगायचं सोडून स्वत:ला पायचाट्या कुत्रं बनवून घेणारा तू,
सत्ताधाऱ्यांची चाटता चाटता, आपल्याच बांधवांची वाट कधी लावायला लागलास तूला कळलेच नाही.
पाच वर्षासाठी पाच हजारात विकला गेलास तू,
भिकारी पण दिवसाला हजार रुपडे कमावतो,
२.७३ पैशात भिकाऱ्यापेक्षा पण खालची तूझी औकात कधीं झाली तूला कळलेच नाही.
मनुवाद्यांना दिड दमडी साठी आपल्याच आईबहिणीची इज्जत उसवायला संधी देणारा तू,
कष्टाने मिळालेल्या मतदानाचा हक्क प्रस्थापितांना विकणारा तू,
लोकशाही कधीं नागवलीस तूला कळलेच नाही.
स्वातंत्र्य तूझं जातीवाद्यांच्या पायांशी पायघड्या म्हणून अंथरलंस तू,
समाजाला पुन्हा गुलाम बनवण्यासाठी स्वतःलाच नाहीं, तर घरच्यांनाही वापरलंस तू,
“खापऱ्याच तूं”,
पुढच्या कित्येक पिढ्यांनाही फासावर कधीं लटकवलेस तूला कळलेच नाही.
पुढच्या कित्येक पिढ्यांनाही फासावर कधीं लटकवलेस तूला कळलेच नाही.
कांबळेसर, बदलापूर ठाणे