किमान आता परिवहन विभागाने ऍम्ब्युलन्स चे दर निश्चित केल्याने दिलासा
परंतु गंभीर रुग्ण किंवा अपघातातील जखमीं रुग्णांना हॉस्पिटल मधे नेण्यासाठी आणण्यासाठी, हतबल असलेले कुटुंबीयांना रुग्णवाहिका दर ही एक डोकेदुखी असते, कित्तेकदा गरिबांकडे ऍम्ब्युलन्स चे भाडे देण्या इतपत पैसे नसतात, अशा नातेवाईकांना राजकारणी लोकांकडे अनेकदा हात पसरावे लागतात…. हे प्रसंग त्यांच्या वाट्याला अतिशय दुःखद असतात.
किमान आता परिवहन विभागाने ऍम्ब्युलन्स चे दर निश्चित केल्याने दिलासा
ऍम्ब्युलन्स वाले वाट्टेल तसे दर आकारणार नाहीत. प्रत्येक ऍम्ब्युलन्स वर निश्चित केलेले दर लिहावे लागणार आहेत. खालील प्रमाणे दर असल्याचे ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी जाहीर केले आहेत.खालील दर न आकारता जास्त मागणी केल्यास तक्रार नोंदवावी. त्याच्यावर कायदेशीर करवाई होईल.
निश्चित केलेले ऍम्ब्युलन्स ( रुग्णवाहिकेचे ) दर
@मारुती व्हॅनसाठी २५ किमी वा दोन तासांपर्यंत ७०० रुपये व त्यानंतर प्रति किमी १४ रुपये
@टाटा सुमो व मॅटॅडोरसदृश वाहनांसाठी २५ किमी वा दोन तासांपर्यंत ८४० रुपये व पुढील अंतरासाठी प्रति किमी १४ रुपये
@टाटा ४०७, स्वराज माझ्दा यांसारख्या साच्यावरील वाहनांसाठी २५ किमी वा दोन – तासांपर्यंत ९८० रुपये व नंतर प्रति किमी २० रुपये दर आकारला जाईल.
@आयसीयू सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांसाठी २५ किलोमीटर वा दोन तासांपर्यंत ११९० रुपये व त्यानंतर प्रति किलोमीटर २४ रुपये आकारले जातील.
नागरिकांनी नोंद घ्यावी! अडचण आल्यास ठाणे 022-25361434