कल्याण– गेल्या ४ ते ५ महिन्यांपासुन कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोड वरील प्रभाग ड कार्यालय ते विजय नगर नाका या दरम्यानचा रस्तावर सातत्याने अपघात होत असून याच रस्त्याच्या दरम्यान शुक्रवारी दुपारी झालेल्या एका विचित्र अपघातात एका दुचाकी वाहन चालकाच्या मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यु झाला आहे तर वाहन चालक हा या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याचेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
मृत युवकाचे नांव रवी विनोद चव्हण ( २३ ) रा . कर्पेवाडी असे असून या अपघातात जबरी जखमी झालेल्या युवकाचे नांव निखिल सचिन कर्पे ( १८ ) रा . म्हसोबा चौक असे आहे .
शुक्रवारी दुपारी ४ चे सुमारास हे दोन्ही युवक तिसगांव नाक्यावरून काटेमानिवली कडे दुचाकी वरून (MH05-PD-2196 ) जात असतांना सेंटूल बँके समोरील चढणीच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या आणि गॅस सिलेंडरने लोड असलेल्या एका थ्री व्हिलर पिकपला या दुचाकी स्वारांची पाठीमागून जोराची धडक बसली . या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला रवी चव्हणण हा युवक दुचाकी वरून खाली फेकला गेला व रस्त्यावर पडला याच दरम्यान त्याचे डोक्यावरून दुसरे अन्य एक वाहन गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला असून दुचाकी वाहन चालक निखिल सचिन कर्पे याला गंभीर स्वरूपाती दुखापत झाली आहे . या युवकाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री . गणेश न्यायदे यांचे मार्गदर्शना खाली सहा . पोलिस निरिक्षक श्री . पडवळ हे अधिक तपास करीत आहेत .
आज पर्यंतचे जिवघेणे अपघात हे प्रभाग ड कार्यालय ते विजयनगर नाका या उताराच्या रस्त्यावर झाले आहेत . परंतु हा अपघात उलट दिशेने म्हणजे विजय नगर ते प्रभाग ड कार्यालय या दरम्यानच्या चढण असलेल्या रस्त्यावर तेही उभ्या असलेल्या थ्री व्हिलर पिकपला मागून टू व्हिलर ने ठोकर देण्याच्या प्रकारातून हा विचित्र अपघात झाल्याने या अपघातानेही एकाचा बळी घेतला असल्याने हा अपघातग्रस्त रस्ता पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे .