तर देशाच्या या पहिल्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून, म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातून, निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांचा मतदारसंघ होता उत्तर मुंबई. निवडणूक झाली, आणि निकाल संबंध देशाला धक्का देणारा ठरला. कारण नारायणराव काजरोळकरांना 1 लाख 38 हजार 137 मतं, तर बाबासाहेब आंबेडकरांना 1 लाख 23 हजार 576 मतं मिळलाी. काँग्रेसच्या काजरोळकरांनी आंबेडकरांचा पराभव केला. तोही तब्बल 14 हजार 561 मतांनी.
बाबासाहेबांना काँग्रेसनं ठरवून पराभूत केलं, हा आरोप तेव्हापासून आजवर कायम होत आलाय.
काँग्रेसनं बाबासाहेबांचा खरंच ठरवून पराभव केला होता का, हे जाणून घेण्यासाठी आपण त्यावेळच्या काही घडामोडी समजून घ्यायला हव्यात.
स. का. पाटील हे मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. बॉम्बे काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत येणाऱ्या मतदारसंघात त्यांच्याशिवाय कुणाचा शब्द चालत नसे. बॉम्बे काँग्रेसवर त्यांचं एकहाती वर्चस्व होतं. मुंबईतील उमेदवार ते ठरवत किंवा दिल्लीतून उमेदवार ठरवला गेला तरी स. का. पाटलांच्या होकाराशिवाय त्यावर अंतिम निर्णय होत नसे.
मुंबईत आपला दबदबा राखून असलेल्या स. का. पाटलांनी खरंतर निवडणुकीआधीच्या काही महिने आधीच जाहीर म्हटलं होतं की, “आंबेडकर राखीव जागेवरून उभे राहिल्यास त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार देणार नाही.”* मग काँग्रेसनं नारायणराव काजरोळकरांच्या रुपात उमेदवार का दिला? असा सहाजिक प्रश्न निर्माण होतो.
तर आचार्य अत्रेंनी स. का. पाटलांवर केलेल्या एका टीकेतूनच त्याचं उत्तर मिळतं.
अत्रे ‘कऱ्हेचे पाणी’मध्ये लिहितात की, “बाबासाहेब जर मुंबईतील राखीव जागा लढवणार असतील तर काँग्रेस त्यांना विरोध करणार नाही, असे सदोबांनी (स. का. पाटील) पूर्वी जाहीर केले होते. पण शेकाफे आणि समाजवादी पक्ष यांचा करार होताच सदोबांचे डोके भडकले आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसतर्फे नारायणराव काजरोळकर यांचे नाव जाहीर केले.”
आणि आजही काँग्रेस बाळासाहेब आंबेडकर विरोधात अकोल्यात उमेदवार देऊन आंबेडकर ह्यांना विरोध करत असते आणि बाळासाहेब ह्यांना ठरऊन हरविते पण आपले बुद्धिजीवीना हे समजणार नाही