• 110
  • 1 minute read

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

     एसियाटिक सोसायटीच्या निमित्ताने तत्वज्ञानाच्या विषयावर व्याख्यानाचे आयोजन पार पडले आणि त्यावरून तत्वज्ञान सोडून तुम्ही कोण आणि आम्ही कोण हा विवाद समाज माध्यमातून चव्हाट्यावर आला. खरे तर वादही व्हायला पाहिजे आणि विवादही व्हायला पाहिजे होता तो एखाद्या संस्थात्मक मंचावरून. पण त्यासाठी तत्वज्ञानासारख्या विषयावर मतमतांतरे मांडायला समाज माध्यम मंच निवडला तो जेष्ठ पत्रकार श्री विद्याधर दाते यांनी आणि मग प्राध्यापक शरद बाविस्कर यांच्या बाजूने आणि दाते यांच्या बाजूने फ़ेसबुकसारख्या समाजमाध्यमावरील सामाजिक भान असलेल्या आणि आपापल्या परीने सामाजिक भान देणा-या लोकांमधून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. 
     पण यानिमित्ताने भुमिका रेटताना जे दोन गट यात दिसले किंवा अधोरेखित केले गेले ते मात्र एकात्मिक समाज भान असलेल्या व्यापक वाचक वर्गाला खरेतर रुचलेले नाही. ही बाब या विवादात समाधानाची म्ह्णावी लागेल. आपल्या समाजात अशा गटांनी लक्ष्य द्यावे असे अनेक विषय आ करुन आपल्यासमोर उभे असताना इथे नाहक अहमहमिका नकोशी वाटणारा मोठा वर्ग समाजमाध्यमावर दिसला. तो याकडे सूक्ष्मतेने बघत होता. यावरुन वादापेक्षाही समंजस आणि व्यापक एकात्म सामाजिक हित या चर्चेबाहेर असल्याचे नमुद करणारे या जाणत्यांचे लेखन सामान्य वाचकांच्याही निदर्शनास आले.   
प्रा. शरद बाविस्कर यांचे मुंबईतील एशियाटिक सोसायटीत ‘तत्त्वज्ञेतरांचं तत्त्वज्ञान’ या विषयावर व्याख्यान झाले. तत्त्वज्ञान या विषयावर झालेल्या या व्याख्यानावर वैयक्तिक बाबी उद्धृत करून पत्रकार विद्याधर दाते यांनी टीका केली. या टीकेचा विषय कुठेही तत्त्वज्ञानाच्या आसपासही ना राहिल्याने या विषयावर लेखक आर.एस. खनके यांनी लिहिलेला हा लेख, टीका कशी असावी याचे वैचारिक पद्धतीने मार्गदर्शन करणारा प्रमाण लेख आहे. दाते-परुळेकर या विद्वत जोडीचा आदर करीत आर.एस. खनके यांनी केलेली मांडणी आदर्श वैचारिक आयाम उभा करते यात शंका नाही.
– संपादक
     यानिमित्ताने काही बाबी निदर्शनास आल्या त्या नमुद करणे संयुक्तिक वाटते. त्या म्हणजे, एसियाटिक सोसायटीत व्याख्यान होते तत्वज्ञान विषयावर. त्यावर तत्वज्ञानाच्या अनुषंगाने चर्चा वाव विवाद होणे नक्किच योग्य राहिले असते. पण जेष्ठ पत्रकार श्री दाते यांनी प्रा. बावीस्करांच्या तत्वज्ञान मांडणीतील उणिवा मांडायचे सोडून त्यांची लेखमाला आणि त्यांचे लेखन लोकसत्तेत अर्ध्यावर बंद होणार होते असे खाजगीतले प्रकरण फ़ेसबुकवर मांडले. बरे मांडले तर त्याच्या आधारासाठी काहीही सांगितले नाही. हे पाहता तत्वज्ञानाचा विषय व्यक्तिगत आवड निवड यावर आणून ठेवला. इथे श्री विद्याधर दाते चुकले आहेत. श्री दाते यांनी बाविस्करांच्या तत्वज्ञान मांडणीची समिक्षा करत सप्रमाण विरोध केला असता तर त्यात श्री दाते लोकांना सुजान करु शकले असते. 
     या प्रकरणात श्री दाते यांनी एसियाटिक सोसायटीच्या सदर व्याख्यान सभागृहातील चर्चेची संधी गमावली आणि समाज माध्यम वापरतानाही तत्वज्ञान सोडून व्यक्तिगत मुद्द्यावर चर्चा आणली. बरे आणली तर त्यावरही ते ठाम राहिले नाहीत. वारंवार त्यात पुनर्संपादन आणि फ़ेबु भिंत स्वच्छ करण्याचे प्रकार त्यांनी केले. विषय थांववल्याचे लिहिले. पुन्हा पोस्ट केली, मिटवली. त्यामुळे त्यांनी नेमके काय म्हटले आहे. हे वाचकांना कळू शकले नाही. श्री. दाते यांनी असे का केले हे त्यांनाच माहिती आणि त्यामागचा हेतूदेखील त्यांनाच माहिती.
     यानिमित्ताने दूसरी बाब म्हणजे यात श्री दाते यांच्या बाजूने हिरीरीने उडी घेतली ती पत्रकार आणि मुलाखतकार श्री राजू परूळेकर यांनी. परुळेकरांनी तत्वज्ञान विषय आणि त्याचे सादरीकरण हा विषय सोडून श्री दाते यांच्या जेष्ठतेची शिष्टाई करत समर्थन केले. मूळ विषयाला तरुण आणि जेष्ठ नागरिक असे करण्याची गरज नव्हती. पण तसे केले गेले. या दोघामध्येही ना श्री दाते, ना श्री परुळेकर तत्वज्ञानाच्या प्रांतात आहेत, ना अध्यापन करतात, ना अध्ययन करतात, ना तत्वज्ञानाचे विद्यार्थी आहेत. तरीही तत्वज्ञान विषयाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या चर्चेत विषय सोडून व्यक्तिगत आवडी निवडी पसंत नापसंत मांडते कसे झाले ?   
      हे कमी व्हावे म्हणून की काय श्री दाते यांच्या समर्थनार्थ फ़ेबु वर काही लोकांना टॅग करत श्री कौस्तुभ पटाईत यांचे ताजे लेखन समाजमाध्यमावर पुढे आणले.तो लेखही तत्वज्ञान विषयाशी फ़ारकत घेणारा. त्यात श्री. कौस्तुभ प्रा. बाविस्करांच्या तीन वर्षापूर्वीची आठवण सांगत त्यांना बाविस्करांनी कसे दुखावले ते सांगतात. त्यात श्री जयदेव डोळे यांचा हवाला देतात. या लेखणात हे निदर्शनास येते की, श्री डोळे बाविस्करांना आत्ममुग्ध संबोधतात. हे कौस्तुभ सांगतात. यात श्री डोळे यांनी व्यक्तिगत मूल्यमान करण्यापेक्षा त्याची लेखणी आणि मांडणी यावर भाष्य करणे कोणालाही आवडले असते. असो. या ठिकाणी परुळेकरांनी श्री दाते यांच्या समर्थनार्थ आणि संरक्षणार्थ समाजमाध्यमावर बाविस्करांवरील जुन्या नाराजीचे ताजे लेखन टॅग करुन सुरक्षा तटबंदी कशासाठी केली असावी ? यात परुळेकर, श्री दाते, ज्यांचा संदर्भाने उल्लेख आला ते श्री जयदेव डोळे, श्री कौस्तुभ पटाईत एका समान सुरात अवतरताना दिसतात ते प्रा. बाविस्करांच्या विरोधात मते नोंदवताना. बरे यात आणखीही एक समान बाब आहे आणि ती म्हणजे यातले कोणीही तत्वज्ञान या विषयाशी संबंधित नाही. ना प्रोफ़ेशनने ना अध्ययन अध्यापनाने. मग कोणत्या अधिकारवाणीने तत्वज्ञान विषयाच्या प्राध्यापकाबाबत एकवटून व्यक्तिगत हल्ला करते झाले. याचे सामाजिक भान आपल्या समाजाला येणे गरजेचे आहे. नसता कोणीही पुरोगामी म्हणून, व्यापक हितचिंतक म्हणून आपल्या समाजाच्या डोक्यावर बसणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
 यानिमित्ताने श्री दाते आणि श्री परुळेकर यांचे समाजमाध्यमावरील मागील काही दिवसाच्या पोस्ट बघाव्यात. त्यात सूक्ष्म आशयघणता जरू आहे. त्यामुळे त्यांचे लेखनही अनेकांना आवडते होते. पण त्याचबरोबर त्यातून कोण लक्ष्य केले गेले याकडे आपले ज्ञान चक्षू फ़िरवले तर त्यांच्या भूमिका आणि कटाक्ष याबाबत नक्कीच समाज साक्षरता येईल.
        एप्स्टीन फ़ाईलची प्रथम बातमी भारतात आली त्यावेळी परुळेकरांनी पेशवाईतील संदर्भ उद्धृत केलेला होता. पण असे जुने संदर्भ उगाळून वर्तमानाच्या प्रश्नावरून सामाजिक लक्ष जुन्या ब-या वाईट स्मृती कुरवाळण्यासाठी भरकटत असते. यातून वर्तमानात एप्स्टीन फ़ाईल मध्ये काय आहे हा विषय त्यांनी अलगद बाजूला ठेवला हे लक्षात येईल. हे ध्यानत घेतले पाहिजे.
     श्री दाते यांच्या वतीने शिष्टाई करत आपले आजारी मांजर दवाखान्यातून घेरी आले की याविषयावर सविस्तर लिहितो असे परुळेकरांनी यापूर्वी लिहिलेले होते. आज मात्र तत्वज्ञान विषयाला स्पर्श न करता श्री दाते यांनी असे का लिहिले असे विचारणारांना झुंड, भक्त असे हेटाळणीचे पुनर्नामकरण करत विषयाला परुळेकरांनी फ़ेबु वर पूर्णविराम देत असल्याचे नमूद केलेय. आजच्या पोस्ट मध्ये ते म्हणतात की त्यांनी टॅग केलेल्या कोणालाही ते व्यक्तिगतरित्या ओळखत नाहीत. फ़क्त श्री दाते यांना तीन वेळा फ़ोन झालेला सांगतात. मग प्रा. बाविस्करांनाही फ़ोन करुन त्यांचेही मत जाणून घेतले असते आणि त्यांच्यावर विषयाच्या अनुषंगाने टीकेची झोड उठवली असती तरीही चांगलेच झाले असते ना. पण तसे का झाले नसेल ? यातुन त्यांनी तत्वज्ञान विषय व्यक्तीगत स्तरावरून स्वत:च अपने-पराये निश्चित केल्याचे दिसून येते. आजच्याच लेखात अजुन ते इतिहासात त्यांची भुमिका न्याय ठरवली जाईल असे म्हणतात म्हणजे इतिहास पुरूष होणार असल्याचे स्वत:च सांगून टाकतात. विषयावर संदर्भहीन भुमिका घेवूनही इतिहासात हा अजरामर होणार असल्याचा आत्मगौरव कशामुळे येतो?  
       यावादाच्या निमित्ताने जणू सामाजिकते बरोबरच मुंबई आणि मुंबई बाहेरील असा भौगोलिक प्रादेशिक भेद या विवादात अधोरेखित झाला. जणू आम्ही ते महा नागरी आणि तुम्ही ते ग्राम्य. यातून एकच झाले ते म्हणजे हा विषय तत्वज्ञान विषय सोडून व्यक्तिगत आवड निवड इतक्या संकीर्णतेवर गेला आणि मराठी वाचक तत्वज्ञान विषयाच्या विद्वत वादविवादाला मुकले.
     या एसियाटिक संस्थेतील विषयाच्या अनुषंगाने उठलेल्या विचार वादळाएवढाच सीमित हे मत आहे. याशिवाय पत्रकारितेच्या क्षेत्रात जेष्ठ आणि अभ्यासू श्री विद्याधर दाते, पत्रकार राजू परूळेकर यांच्या लेखणीतून वाचकांना चांगले वाचायला मिळते याबाबत त्यांच्या लेखन परिश्रमाचे आणि जेष्ठत्वाचे मोल आहेच. परुळेकरांच्या बाबत सांगायचे तर दशकापूर्वी जेंव्हा सबंध देश आणि महाराष्ट्र कथित गांधीवाद्याच्या भक्तीत लीन झाला होता तेंव्हा सर्वप्रथम भानावर येवून लोकांना भान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला याबद्दल सजग आणि शोध पत्रकार म्हणून त्यांची जागल्याची भूमिका ऐतिहासिक नक्कीच राहील. यबद्दल सर्व सजग जाणते लोक नक्कीच निशंक आहेत हे आवर्जून सांगावेशे वाटते. 
 
~~ आर एस खनके
0Shares

Related post

” पार्टी विथ डिफ्रंट ” या आपल्याच मूळ विचारधारेचा बळी घेतल्याने भाजप राज्याच्या सत्तेत नंबर वन….!

” पार्टी विथ डिफ्रंट ” या आपल्याच मूळ विचारधारेचा बळी घेतल्याने भाजप राज्याच्या सत्तेत नंबर वन….!

राज्यसभा निवडणूक : भाजपशी पंगा घेण्याची हिम्मत राष्ट्रवादीचे बंडखोर व शिंदेंच्या सेनेत नाही…..!      …
केरळचा पहिला लिखित उल्लेख ब्राम्ही लिपीमध्ये

केरळचा पहिला लिखित उल्लेख ब्राम्ही लिपीमध्ये

ब्राह्मी लिपीत कोरलेला ‘केरल’ हा शब्द सर्वात जुना पुरावा [इ.स.पू. २ रे शतक] ‘मणिप्रवालम’ संस्कृतमध्ये लिहिलेला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *