• 180
  • 1 minute read

कुंभमेळा व शाही स्नान प्रथेची सुरुवातच बादशहा अकबराने केली

कुंभमेळा व शाही स्नान प्रथेची सुरुवातच बादशहा अकबराने केली

मुघल बादशहाच्या दरबारातील लाभार्थीच आज कबरी खोदण्याची भाषा करतात !

          मरणकळा अन मृत्यूचे महा भयानक तांडव व भगवाधारी योगीच्या नाकर्तेपणाचा बुरखा फाडत महाकुंभ मेळा नुकताच पार पडला. मात्र याचे कवित्व मागे उरले आहेच. त्याची चर्चा आतापर्यंत सुरु आहे. या प्रकरणी राज ठाकरेतला नकलाकार या निमित्ताने जागा झाला व त्याने काहीबाही करून दाखविले. काहींना त्या नकला वाटल्या. काहींना त्यात त्याची डेरिंग वाटली, तर काहीजणांनी त्याचा याबद्दल विरोध केला. दुसरी एक चर्चा सुरु होती, ती म्हणजे समाजवादी पार्टीचे नेते व उत्तर प्रदेशचे माजी नगरविकास मंत्री आजम खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कुंभमेळ्याच्या नियोजनावर. या चर्चेत झालेल्या तुलनेत योगी फार बाद कॅरेटर ठरले आहेत. याबद्दलची चर्चा पुढे सरकत असताना कुंभमेळ्याची सुरुवात कशी झाली, यावरील पडदा उघडतो, अन पाखण्डी ब्राह्मण्यवाद्यांची पोलखोल होते. मुसलमानांनी कुंमेळ्यात स्नान करू नये म्हणणाऱ्या या हिंदुत्ववाद्यांना माहितच नाही की, मुगल बादशहा अकबरानेच हा कुंभमेळा सुरु केला असून देशभरात ज्या 4 ठिकाणी कुंभमेळा होतो, तेथे शेकडो एकर जमीन व निधी दिला. कुंभमेळ्यात शाहीस्नानाची प्रथा आहे, ती ही बादशहा अकबराने इलाहाबा येथे कुंभमेळात सर्व प्रथम शाही स्नान केले म्हणून सुरु झाली आहे.
         ही अफ़वा नाही. पाखंड नाही. अकबर बादशहाने नाशिक, इलाहाबाद यासह ज्या 4 ठिकाणी कुंभमेळ्यासाठी जमिनी दान दिल्या, त्याची दान पत्रे आज ही उपलब्ध आहेत. कुंभमेळ्याची सुरुवात केल्याचे, त्यासाठी निधी दिल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. इतकेच काय दस्तूरखुद बादशहा अकबराने इलाहाबाद येथे झालेल्या पहिल्या कुंभमेळ्यात पहिले स्नान ही केले. एका बादशहाने कुंभमेळ्यात स्नान केले म्हणून त्यास शाहीस्नान म्हणतात. आज ही कुंभमेळ्यातील मुख्य प्रथा आहे. ही प्रथा पाळायची अन मुस्लिम समाजाने कुंभमेळ्यात सहभागी होऊ नये, अशी फार्माने काढायची, हे वागणे खरे तर नीच प्रवृतीचे आहे. समाजातील सामाजिक सलोखा बिघडविणे, त्यातून नफरतीचे वातावरण तयार करणे व आपली राजकीय पोळी भाजून घेणे हा त्या मागचा मुख्य हेतू आहे.
बाबर अफगाणिस्तान मार्गे भारतात आला. बाबर येण्यापूर्वी ज्या मुस्लिम बादशहाच्या राजवटी येथे होत्या, त्यांचा पराभव करण्यासाठी इथल्या हिंदू राजांनी त्याला आमंत्राने पाठवून बोलावले आहे. त्यामुळे बाबर अन त्यानंतर स्थापन झालेले मुगल शासन आक्रमनकारी ठरत नाही. राहिला प्रश्न धर्माचा तर त्याकाळी धर्म अन साम्राज्य विस्तार या दोन गोष्टी अगदी भिन्न राहिल्या आहेत. भारतीय भूमीवर बाबराची पहिली लढाई कुठल्या हिंदू राजा विरुद्ध झाली नाही, तर इब्राहिम लोधी या मुस्लिम बादशहा विरुद्ध पानिपत येथे झालेली आहे. पानिपतची पहिली लढाई म्हणून तिचा उल्लेख असून बाबरासोबत इथले हिंदू राज होते. साम्राज्य विस्तारासाठी लढाय्या या अपरिहार्य होत्या. अन सर्व लढायात हिंदू राजे अन सरदार, सैन्य बाबर ते औरंगजेब यांच्या शासनकाळात मुगल सत्तेसोबत होते. हिंदु राजांना सरदारक्या, वतने, जहागीऱ्या दिल्या, ब्राह्मणांना दरबारात मा सन्मान दिला की ते आपला सर्व स्वाभिमान विकून चाकरी करीत असत, याची साक्ष व ग्वाही इतिहास देत आहे. पण तो इतिहास वाचतो कोण ?
           फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्य क्रांतीनंतर जगभर आधुनिकतेचे वारे वाहू लागले. त्यात राज्य सत्ता व धर्म सत्ता नष्ट झाल्या. अन लोकशाही राज्य व्यवस्था निर्माण झाली. जनतेला आपले सत्ताधारी निवडण्याचा अधिकार मतदान प्रक्रियेतून मिळाला. आपला देश स्वातंत्र्य झाल्यापासून आपण ही त्याच प्रक्रियेतून आपले सत्ताधारी निवडत आहे. पण ज्या समाज घटकांच्या DNA मध्ये राष्ट्र भावना नाही. राष्ट्र प्रेम नाही, तो समाज धर्म, जातीचे राजकारण करीत राज्य सत्तेवर कब्जा करू पाहत आहे, लोकशाही पुढे आव्हाने उभी करीत आहे. लोकशाही चालविणाऱ्या संविधानाची तोडफोड करीत आहे. हे आज स्पष्ट दिसत आहे.
          ज्यांच्या पूर्वजांनी मुगालांची सेवा, चाकरी केली, मुगलांच्या विरोधात राष्ट्र भावनेने स्थापन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याला विरोध करण्याची एक ही संधी गमावली नाही. मिळेल ती साधने वापरून, कट कारस्थाने करून शिवशाही नष्ट करून पेशवाई स्थापन केली, छत्रपती शिवाजी महाराज अन छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केली, त्यांचे वंशज आज सत्तेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वापर करीत आहेत. आपल्या पूर्वज्यांचे मालक असलेल्या मुगल बादशहांच्या कबरी उखडून टाकण्याची भाषा बोलत आहेत. या मागचा मुख्य हेतू हा केवळ धार्मिक द्वेष निर्माण करून सत्ता मिळविणे इतकाच आहे. अन हे विदेशातून आलेले परकीय ब्राह्मण्यवादी करीत आहेत, हे समजून घेतले पाहिजे.
         जागतिक राजकारणातील वर्चस्व, जागतिक विकासातील सहभाग यामध्ये देशाची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट सुरु असताना धर्म सत्तेच्या दिशेने आपण वेगाने वाटचाल करीत आहे. येणाऱ्या नव्या युगाचा सामना करण्यासाठी जग आधुनिक तंत्राचा वापर करीत आहे. अन धर्म सत्तेच्या मागे लागलेल्या आपल्या देशातील धर्मांध शक्ती मेलेले मूडदे खोदत आहे. यामुळे कुठला विकास होणार आहे, हे त्यांच्या ही अकले बाहेरचे आहे. हे मेलेले मूडदे उकरून देशाचा विकास होणार असेल, बेरोजगारांना रोजगार मिळणार असेल, महागाई कमी होणार असेल, तर हे मुदडे जरूर उकरून काढा, असे समाजवादी नेते अबू असीम आजमी यांनी उदवेगाने म्हटले आहे. देशात अन विशेष करून औरंगजेबाच्या कबरीवरून जे राजकारण सुरु आहे. त्याचा उद्देश केवळ देशात नफरतीचे वातावरण तयार करणे इतकाच आहे, असे ही ते म्हणतात.
        डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी ही धर्मांध शक्तीं औरंगजेब प्रकरणी करीत असलेल्या राजकारणावर टीका केली आहे. औरंगजेबाने 48 वर्ष या देशावर शासन केले. अन आपल्या शासनकाळात त्याने धर्माचे राजकारण केले नाहीतर साम्राज्य वाढविण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने अनेक हिंदुत्ववादी व ब्राह्मणांना आपल्या सैन्यात व दरबारात मानाची पद दिली. हे ते जाहीरपणे उदाहरणे देवून सांगत आहेत. अनेक मुगल बादशहांचा जन्म हिंदू अन ते ही उच्चवर्णीय मातेच्या पोटी झाला असल्याचे ठासून सांगतात. औरंजेबाचे वडील शहाजहाँ यांचा ही जन्म एका राजपूत मातेच्या पोटीच झाला असल्याचे ही ते सांगतात.
       हा सर्व इतिहास आहे. याबाबतचे सर्व पुरावे ही उपलब्ध आहेत. मग मुगल परकीय कसे? असा प्रश्न उभा राहतोच. त्या शिवाय धर्मांध शक्ती ज्या प्रकरणावरून आज समाजात दुही माजवीण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्या घटना 300 वर्षापेक्षा अधिक काळ जुन्या आहेत. या सर्व घटना देशाच्या स्वातंत्र्यानंतर विकासाच्या आड आलेल्या नाहीत. येत नाहीत. मग हे नफरत पसरविणारे राजकारण ब्रिटिशांचे हस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, माफीवीर सावरकर समर्थक अन संघ परिवारातील संघटना का करीत आहेत? हा प्रश्न आहे.
…………….

– राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश

0Shares

Related post

जनसंपर्कतज्ज्ञ : प्रा. सुरेशजी पुरी लोकपत्रकारिता’ पुरस्काराची घोषणा! ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब पहिले मानकरी.

जनसंपर्कतज्ज्ञ : प्रा. सुरेशजी पुरी लोकपत्रकारिता’ पुरस्काराची घोषणा! ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब पहिले मानकरी.

‘जनसंपर्कतज्ज्ञ : प्रा. सुरेशजी पुरी लोकपत्रकारिता’ पुरस्काराची घोषणा! ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब पहिले मानकरी.…
एसोसिएशन के अध्यक्ष पद का विवाद चलते हुए बैरवा द्वारा कार्यक्रम घोषित करना गैरकानूनी – मिलिंद आवाड

एसोसिएशन के अध्यक्ष पद का विवाद चलते हुए बैरवा द्वारा कार्यक्रम घोषित करना गैरकानूनी – मिलिंद…

एसोसिएशन के अध्यक्ष पद का विवाद चलते हुए बैरवा द्वारा कार्यक्रम घोषित करना गैरकानूनी – मिलिंद…
फुले सिनेमा

फुले सिनेमा

फुले सिनेमा लेखक : Adv. प्रदीप ढोबळे, BE, BA, MB,A PGDHRL, LL.M. 9820350758 फुले हा सिनेमा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *