रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर. के. च्या वतीने तीन उमेदवार निवडणुकीत होते.पैकी प्रभाग क्रमांक 9 मधून मा. अशोक गजरमल आणी प्रभाग क्रमांक 11 मधून मा. सुनिल दुपटे, सदर प्रभागातून अत्यंत ताकतीने लढले, आणी त्यांना साडेचारसे च्या आसपास मते मिळाली.
एका बाजूला अत्यंत प्रबळ, आणी प्रचंड पैसे वाले गर्भ श्रीमंत पक्ष, आणी, दुसरीकडे लोकं वर्गणीतून चालणारा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार,मात्र ते शेवट पर्यंत लढले हे कौतुकास्पद आहेचं. मात्र अनेक लोकं पैशाच्या अमिषाने साथ सोडून गेले, ज्यांच्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते तळमळीने कार्य करीत होते.
त्यांच्या सुखदुःखात, अडीअडचणीत धावून जातं होते. ते विरोधी छावनीत होते. याचा अनुभव हा नेहमीच येत असतो, तसा या वेळी ही आलाच.
अनेकदा इतर पक्षातील लोकांना जेव्हा त्रास होतो, त्या वेळी ते कैफियत घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ते यांच्या कडेचं येतात, त्यांनी ज्या पक्षाला पैसे घेऊन मतदान केले, ते यांच्याकडे दुर्लक्ष करतात, असा अनुभव आहेचं.
ज्यांनी पैसे घेऊन मतदान केले ते लोकं लोकशाही चे मारेकरी आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा महिलांना आणी सामान्य जनतेला मतदानाचा अधिकार दिला, त्या विरुद्ध हिंदू महासभा आणी अनेकांनी विरोध केला होता, काही लोकांनी मोर्चे काढले,तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वाना मतदानाचा अधिकार दिला, हे विसरल गेलं.
मात्र असे असूनही ज्यांनी रिपब्लिकन पक्षाला मतदान केले ती लोकं धन्य आहेत, कौतुक्कास पात्र आहेत, त्यांचे मनापासून आभार, लवकरच ज्यांनी रिपब्लिकन पक्षाला मतदान केले, आणी रिपब्लिकन पक्षावर विश्वास दाखविला,त्या स्वाभिमानी रिपब्लिकन मतदारांचा कौतुक सोहळा घेणार आहोत.