• 98
  • 1 minute read

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

सहवासातले आठवले पुस्तकाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

मी तसा कुणाचाही नाही हस्तक
म्हणून माझ्यावर निघत आहे पुस्तक
माझे नेहमी शांत असते मस्तक अशी काव्यमय सुरुवात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवलेंनी केली.

डॉ बाबासाहेब नसते तर आम्ही कुठेच नसतो .आंबेडकरी विचारांवर निष्ठा ठेवून भारतीय दलित पँथर द्वारे आम्ही सातत्याने संघर्ष केला.त्या चळवळीत माझ्या सोबत असंख्य कार्यकर्ते जोडले गेले,ही जी कार्यकर्त्यांचे ताकद आहे तीच माझी संपत्ती आहे . कमावलेली माणुसकी आणि माणसं हीच माझी खरी संपत्ती आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.


वरळी येथील नेहरू तारांगण येतील एका सभागृहात काल शनिवारी दि.२९ जून रोजी रात्री सहवासातले आठवले या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,
आमदार प्रवीण दरेकर ,
शरणकुमार लिंबाळे , माजी मबत्री अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, सिद्धार्थ कसारे, पप्पू कागदे , श्रीकांत भालेराव उत्तम कांबळे राजेंद्र खरात नवनित लोंढे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ सौ.सीमाताई आठवले आणि आठवले कुटुंबीय उपस्थित होते.
तसेच रिपब्लिकन पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
सहवासातले आठवले हे पुस्तक रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याबद्दल लिहिलेले अनुभव आहेत. त्याचे संकलन चंद्रमणी जाधव आणि प्रवीण मोर यांनी या पुस्तकात केले आहे.

= हेमंत रणपिसे

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *