मुंबई दि.12 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे येत्या बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतुन लंडनला रवाना होणार आहेत.त्यांच्या समवेत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अविनाश कांबळे हे सुध्दा लंडन दौऱ्यावर रवाना होणार आहेत. केंद्रीयराज्यमंत्री ना.रामदास आठवले हे लंडन दौऱ्यात लंडन येथील भारतीय दुतावास येथे 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत.तसेच लंडन मधील विविध आंबेडकरी विचारवंत आणि कार्यकर्त्यांच्या ते भेटी घेणार आहेत.लंडन मधील आंबेडकरी कार्यकर्ते गौतम चकवर्ती यांनी साऊथ हॉल आंबेडकर सेंटर येथे आयोजित केलेल्या स्वागत सत्कार समारंभात ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.तसेच दिनांक 18 ऑगस्ट रोजी दैनिक लोकमतच्या वतीने लंडन मध्ये आयोजित केलेल्या कोहिनुर पुरस्कार सोहळ्यात ते उपस्थित राहणार आहेत.या पुरस्कार सोहळ्यात आवर्जुन उपस्थित राहण्याचे आमंत्रण लोकमत समुहाचे प्रमुख विजय दर्डा यांनी ना.रामदास आठवले यांना दिले होते.या निमंत्रणाला मान देऊन ना.रामदास आठवले या पुरस्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
लंडन दौऱ्यात ना.रामदास आठवले पत्रकार,आंबेडकरी,कार्यकर्ते,उद्योजक आणि अनिवासी भारतीयांची ते भेट घेणार आहेत. या दौऱयात ना.रामदास आठवले यांच्या सोबत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अविनाश कांबळे हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.