केरळचा पहिला लिखित उल्लेख ब्राम्ही लिपीमध्ये

केरळचा पहिला लिखित उल्लेख ब्राम्ही लिपीमध्ये

ब्राह्मी लिपीत कोरलेला 'केरल' हा शब्द सर्वात जुना पुरावा [इ.स.पू. २ रे शतक]

'मणिप्रवालम' संस्कृतमध्ये लिहिलेला व्याकरण ग्रंथ, यात भौगोलिक क्षेत्राचा उल्लेख 'केरळम्

.

“केरल / केरलम” (Kerala / Keralam) कालरेषा
१. मौर्य कोरीव लेख (इ.स.पू. २५७)
स्रोत: सम्राट अशोकाचा दुसरा मुख्य शिलालेख (Major Rock Edict II)
अचूक शब्द: “केरलपुतो” (प्राकृत भाषेतील ‘केरलपुत्र’ – “केरलचा पुत्र”)
तपशील: ब्राह्मी लिपीत कोरलेला हा ‘केरल’ या ध्वनीचा सर्वात जुना आणि निर्विवाद पुरावा आहे. मौर्य साम्राज्याचा शेजारी देश म्हणून हा उल्लेख अधिकृतपणे आढळतो.
२. व्याकरण ग्रंथ (अंदाजे इ.स.पू. २ रे शतक)
स्रोत: पतंजलींचे ‘महाभाष्य’ (पाणिनीच्या संस्कृत व्याकरणावरील भाष्य)
अचूक शब्द: “केरल”
तपशील: ‘केरल’ या शब्दाचा मूळ स्वरूपात झालेला हा सर्वात जुना प्रमाणित साहित्यिक वापर आहे. भौगोलिक क्षेत्रांशी संबंधित संस्कृत व्याकरणाचे नियम स्पष्ट करताना पतंजलींनी या शब्दाचा उल्लेख केला आहे.
(केरळ या राज्याचे नुकतेच नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आला. केरळ राज्य सरकारने हा प्रस्ताव पाठविल्याचे मोठ्या प्रमाणात यासाठी प्रचार करण्यात आला. परंतु, प्रश्न इतका साधा नाही; ज्या दक्षिण भारतात द्रविड संस्कृती मजबूत असल्याचे मानले जाते तेथे द्रविड भाषेऐवजी संस्कृत भाषेचा बोलबाला कम्युनिस्ट सरकार वाढवत आहे काय? असे असेल तर, देशात डावे आणि उजवे यांची सांस्कृतिक पार्शवभूमी एक आहे का? हा गंभीर प्रश्न निर्माण होतो. म्हणून ऐतिहासिक माहितीवर आधारित हा अनुवादित लेख वाचकांच्या विचारार्थ देत आहोत. मूळ इंग्रजी पोस्टचा हा मराठी अनुवाद आर. एस. खनके यांनी केला आहे.
– संपादक)
३. संस्कृत महाकाव्ये (अंदाजे इ.स.पू. ३ रे शतक – इ.स. ४ थे शतक)
स्रोत: महाभारत (सभा पर्व, भीष्म पर्व) आणि रामायण (किष्किंधा कांड)
अचूक शब्द: “केरल” / “केरालाः”
तपशील: या दोन्ही प्राचीन महाकाव्यांमध्ये दक्षिण भारतातील एक प्रमुख राज्य म्हणून ‘केरल’ची नोंद आहे. रामायणात, वानरराज सुग्रीव आपल्या शोधपथकांना दक्षिण दिशेला पाठवताना चोल, पांड्य आणि ‘केरल’ या राज्यांचा स्पष्ट उल्लेख करतात.
४. अभिजात संस्कृत काव्य (अंदाजे इ.स. ४ थे – ५ वे शतक)
स्रोत: कालिदासाचे ‘रघुवंश’
अचूक शब्द: “केरल”
तपशील: चौथ्या सर्गातील ५४ व्या श्लोकात, महाकवी कालिदास राजा रघूच्या दिग्विजयाचे वर्णन करतात. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की रघूने दक्षिणेकडील प्रदेश जिंकले, ज्यामुळे ‘केरल’च्या स्त्रियांना अश्रू अनावर झाले. यामुळे अभिजात साहित्यात हा शब्द कायमचा कोरला गेला.
५. चोल साम्राज्यातील शिलालेख (इ.स. ११ वे शतक)
स्रोत: पहिला राजेंद्र चोल याचे शिलालेख (उदा. तंजावरचे बृहदीश्वर मंदिर)
अचूक शब्द: “केरळम्” (Kēraḷam)
तपशील: संस्कृतमधून तमिळ/द्रविडीय कोरीव कामांकडे वळताना, चोल शिलालेख चेरा राजांवरील विजयाचा अभिमानाने उल्लेख करतात. येथे आधुनिक ‘केरळम्’ हा शब्द (-म् प्रत्यय जो भूभागाचे दर्शक आहे) प्रथमच दगडी शिलालेखात आढळतो.
६. स्थानिक भाषिक इतिहास (इ.स. १४ वे शतक)
स्रोत: लीलतिलकम
अचूक शब्द: “केरळम्”
तपशील: हा ‘मणिप्रवालम’ (मल्याळम-संस्कृत संकरित भाषा) भाषेबद्दल संस्कृतमध्ये लिहिलेला व्याकरण ग्रंथ आहे. यात भौगोलिक क्षेत्राचा उल्लेख ‘केरळम्’ असा केला असून येथील मूळ भाषेला ‘केरल-भाषा’ म्हणून ओळखले आहे.
७. पौराणिक उत्पत्ती ग्रंथ (अंदाजे इ.स. १७ वे शतक)
स्रोत: केरललोत्पत्ती (केरलची उत्पत्ती)
अचूक शब्द: “केरळम”
तपशील: जरी हा ग्रंथ ऐतिहासिकदृष्ट्या भगवान परशुरामांनी आपली कुऱ्हाड फेकून जमीन निर्माण केल्याच्या पौराणिक कथेवर आधारित असला, तरी या अस्सल मल्याळम ग्रंथाचे नाव आणि मजकूर पूर्णपणे विकसित झालेल्या ‘केरळम’ या शब्दावर आधारित आहे.
 
(UPSC कोच राज मल्होत्रा यांची अभ्यासून केलेली मूळ इंग्रजी पोस्ट चा हा आर.एस. खनके यांनी केलेला अनुवाद)
0Shares

Related post

” पार्टी विथ डिफ्रंट ” या आपल्याच मूळ विचारधारेचा बळी घेतल्याने भाजप राज्याच्या सत्तेत नंबर वन….!

” पार्टी विथ डिफ्रंट ” या आपल्याच मूळ विचारधारेचा बळी घेतल्याने भाजप राज्याच्या सत्तेत नंबर वन….!

राज्यसभा निवडणूक : भाजपशी पंगा घेण्याची हिम्मत राष्ट्रवादीचे बंडखोर व शिंदेंच्या सेनेत नाही…..!      …
इंग्रजांच्या विरोधात लढून मृत्यू पत्करलेला टीपू सुलतान एकमेव प्रिन्स

इंग्रजांच्या विरोधात लढून मृत्यू पत्करलेला टीपू सुलतान एकमेव प्रिन्स

इंग्रजांच्या विरोधात लढून मृत्यू पत्करलेला टीपू सुलतान एकमेव प्रिन्स ! टिपू सुलतान यांच्या बद्दलचे अभ्यासुन व्यक्त…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *