सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे माजी धुळे जिल्हाध्यक्ष
कॉम्रेड दीपक भगवान लोंढे दुःखद निधन
धुळे दि.९ (यूबीजी विमर्श-प्रतिनिधी)
सत्यशोधक विचारांचे निष्ठावान वाहक आणि प्रामाणिक विद्यार्थी नेता,सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे माजी धुळे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड दीपक भगवान लोंढे यांचे दि.८ जून २०२५ रोजी रात्री दुःखद निधन झाले.त्यांचेवर आज दि.९ रोजी सायंकाळी ५:००वाजता अंत्यविधी होणार आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी धुळे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांनी रात्री उशिरा अखेरचा श्वास घेतला.
कॉम्रेड दीपक लोंढे हे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. विद्यार्थी दशेपासूनच ते सामाजिक प्रश्नांवर आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्यावर फुले, शाहू, आंबेडकर आणि मार्क्सवादी विचारांचा खोल प्रभाव होता.त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी आंदोलनांनी सामाजिक न्यायाचा आवाज बुलंद केला. ते स्पष्टवक्ते, जिद्दी आणि विचारशील नेतृत्व देणारे कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्याने समाजक्रांतीच्या चळवळीतील एक निष्ठावान योध्दा हरपला आहे.सत्यशोधक विद्यार्थी संघटना व यूबीजी विमर्श परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली व कॉम्रेड दीपक यांना अखेरचा लाल सलाम