• 44
  • 1 minute read

कोल्हापूरात सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे ऐतिहासिक उद्घाटन

कोल्हापूरात सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे ऐतिहासिक उद्घाटन

ॲड.अमोल सावंत अध्यक्ष बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा

कोल्हापूर दि .१८(यूबीजी विमर्श-संहिता)
          ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर कोल्हापूर येथे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे स्वप्न साकार झाले. मा. सरन्यायाधीश भूषण गवई (सर्वोच्च न्यायालय,दिल्ली) यांच्या हस्ते या खंडपीठाचे सर्किट बेंचचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, मा.न्या. आलोकजी आराधे तसेच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज व मान्यवर यांची उपस्थिती लाभली.उदघाटन कार्यक्रमात उपस्थितीनांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचे स्वागत केले.
या कार्यक्रमावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोव्याचे विद्यमान अध्यक्ष ॲड.अमोल सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आजचा दिवस हा कोल्हापूरकरांसाठी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जनतेसाठी ऐतिहासिक आहे. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २ लाख ५० हजार सदस्यांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.”
ॲड.सावंत पुढे म्हणाले की, “The central of judiciary हा भावनांचा प्रश्न नसून न्यायदान जलदगतीने आणि विनाविलंब व्हावे, ही काळाची खरी गरज आहे. ‘Justice for All’ आणि ‘Justice at the Doorstep of the Litigant’ या उच्च न्यायालयाच्या तत्वांशी सुसंगत असेच हे खंडपीठ आहे.”
सन२०१० ते २०२५ या कालावधीत कोल्हापूर खंडपीठासाठी बार कौन्सिलने चार ठराव पारित करून ठाम भूमिका घेतल्याचे सावंत यांनी नमूद केले. “भारतीय न्यायव्यवस्थेचे लोकशाहीकरण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय यांचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे. आज त्या भूमिकेला प्रत्यक्ष स्वरूप मिळाले असून, यासाठी मा. सरन्यायाधीश गवई साहेबांचे योगदान अविस्मरणीय आहे. हा दिवस खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस आहे,” असे ते म्हणाले.
याच वेळी त्यांनी राज्यातील सर्वात मोठे महाराष्ट्र रिसर्च सेंटरच्या बांधकामासाठी मुख्यमंत्री यांनी कबूल केलेला १० कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
या ऐतिहासिक कार्यासाठी कोल्हापूर,सोलापूर सांगली,सातारा,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या ६ जिल्ह्याचे अध्यक्ष व सदस्य तसेच बार कौन्सिल सदस्य ॲड.विवेकजी घाटगे, ॲड.संग्राम देसले,ॲड. वसंतराव भोसले,ॲड.मिलिंद थोबडे तसेच जिल्ह्यातील वकील आणि तमाम जनतेचे ॲड.सावंत यांनी आभार मानले.

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *