• 51
  • 1 minute read

क्रिप्टो करन्सी. एक बिटकॉइन १,२५,००० डॉलर्स! एक नवीन ऐतिहासिक उच्चांक.

क्रिप्टो करन्सी. एक बिटकॉइन १,२५,००० डॉलर्स! एक नवीन ऐतिहासिक उच्चांक.

नवउदारमतवादाचे लॉजिकल टोक: कोणत्याही शासकीय हस्तक्षेपापासून मुक्त असणारे चलन

     भांडवल बाजारातील गुंतवणूकदारांचे , विशेषतः क्रॉस बॉर्डर गुंतवणूकदारांचे एक स्वप्न प्रत्यक्षात येऊ घातले आहे.
_______

प्रत्येक देशातील शासन आपल्या देशातील देशांतर्गत व्यवहारांसाठी एक चलन बाजारात आणते. त्यासाठी नोटा छापते. त्या नोटेचे दर्शनी मूल्य ठरलेले असते. उदाहरणार्थ शंभर रुपयाची नोट.

त्याला इंग्रजी मध्ये Fiat Currency म्हणतात. म्हणजे शासन ठरवते या वीतभर रंगीत कागदाच्या तुकड्याचे मूल्य १०० रुपये इत्यादी. आणि सर्व जण त्या कागदी तुकड्यात व्यवहार करायला लागतात

पण अनेक कारणांमुळे त्या शंभर रुपयाच्या नोटेतून खरेदी केला जाऊ शकणारा वस्तुमाल कमी होत जातो. हे तर अगदी गरीब नागरिकांच्या देखील दैनंदिन अनुभवाचे आहे. ज्याला सामान्य परिभाषेत “महागाई” वाढली असे म्हणतात.

चलनाच्या दर्शनी मूल्यापासून त्याची खरेदी शक्ती कमी होत जाणे हा जसा सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तेवढाच तो भांडवल बाजारातील गुंतवणूकदारांच्या देखील जिव्हाळ्याचा विषय आहे.

हे गुंतवणूकदार जर क्रॉस बॉर्डर / विविध देशात गुंतवणूक आणि निर्गुंतवणूक करणारे असतील तर जास्तच. कारण विनिमय दरात होणाऱ्या चढउतारांमुळे त्यांची गुंतवणुकीची गणिते उद्ध्वस्त होतात.

देशातील चलनाचे मूल्य आणि त्याच्या विनिमयाचे दर त्या त्या देशातील शासनाच्या आणि केंद्रीय बँकांच्या विविध निर्णयामुळे प्रभावित होतात उदा महागाई, व्याजदर , पैशाचा पुरवठा, अर्थसंकल्प, सरकारी कर्ज उभारणी , आयात निर्यात धोरणे आणि परकीय चलन गंगाजळी अशी अनेक
_________

गेली अनेक वर्षे भांडवलाचे गुंतवणूकदार असे चलन बनवण्याच्या शोधात होते जे शासनाच्या अधिकारात येऊच शकत नाही. त्यातून कूट चलनाचा /क्रिप्टो करन्सीचा २००९ च्या दरम्यान जन्म झाला आहे. (त्यावर जिज्ञासूंनी गुगल करावे)

मुख्य प्रवाहातील अर्थतज्ञ आणि बँकर्स आतापर्यंत क्रिप्टो करन्सी कडे साशंकतेने पाहत होते. नवतंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण प्रोफेशनल लोकांचा हा एक कल्पनाविलास आहे अशी लेबले लावली जायची.

पण आता नाही

रिझर्व्ह बॅंकेसकट अनेक केंद्रीय बँका स्वतःची क्रिप्टो करन्सी (CBDC) काढत आहेत. खुद्द अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प प्रशासन याला प्रोत्साहन देऊ लागले आहे. केंद्रीय बँका आपले राखीव निधीतील काही हिस्सा बिटकॉइन किंवा तत्सम चलनात ठेवतील. स्टॉक मार्केटवर त्याचे व्यवहार होऊ शकतील

बाकीचे जाऊद्या आपल्या वित्तमंत्री निर्मला सिथरामन काही दिवसापूर्वी म्हणाल्या की आपल्याला आवडो वा नावडो , जगातील चलन व्यवहार बदलत आहेत , आपल्याला स्टेबल कॉइन साठी तयारी करावी लागेल
________

या बदलांच्या ढकलशक्ती नेहेमीच कॉर्पोरेट / वित्त भांडवल असते. मान्य.

तरुणांना आवाहन; भंडलशाहीला जजमेंटल सट्टेबाजी / नफेखोरी अशी लेबले लावली की मेंदूला आपणच मेसेज देत असतो की फार काही अभ्यास करण्याची, समजून घेण्याची गरज नाही म्हणून. कॉर्पोरेट / वित्त भांडवलशाहीवरील आपली सर्व टीका अभ्यासून असावी. कशासाठी? तरच ती लोकांना आपण समजावून देऊ शकतो. त्यांना ती काही काळाने उमजू लागते.

हे अकेडेमिक ज्ञान म्हणून नाही. आज भारतातील भांडवली बाजार पार ग्रामीण भागापर्यंत पोचला आहे याची किमान वस्तुनिष्ठ नोंद घेऊया. उद्या क्रिप्टो मध्ये देशातील अनेक तरुण ट्रेडिंग करू लागलेले असतील. त्यांचे राजकीय शिक्षण कोण करणार?

संजीव चांदोरकर (१० ऑक्टोबर २०२५

0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *