समर खडस बाबत मुद्दाम गैरसमज होतील अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. तो एकतर सत्ताधाऱ्यांपुढे न झुकणारा ताठ कण्याचा पत्रकार म्हणून अनेक वर्ष गोदी मिडियाच्या डोळ्यांत खुपतो आहे… आणि ही संधी साधून आयटी सेल पिलावळीनं दुसरं कोलित हाती घेतलंय ते म्हणजे, ‘तो मुसलमान आहे.’
खरी गोष्ट अशी आहे की, महाराष्ट्रातल्या ‘मत चोरी’बाबत डॉक्यूमेंट्रीचं स्क्रीनिंग प्रेस क्लबनं आयोजित केलं होतं. तिथं टीव्ही मिडियावाले घुसले. विचारल्यावर म्हणाले, “हा शो काँग्रेसनं आयोजित केला आहे. त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं आहे.” खरंतर या कार्यक्रमाचा काँग्रेसशी काहीही संबंध नव्हता. हॉलमध्ये विनाकारण गर्दी झाली. कॅमेरे, स्टँड्स वगैरे जामानिम्यामुळं प्रेक्षकांना बसायला जागा मिळेना. जी फिल्म यूट्यूबवर उपलब्ध आहे तिचं शुटिंग करायची गरज नव्हती. क्लबच्या आयोजकांनी टीव्ही कॅमेरामनना सांगितले की “त्या कार्यक्रमाचा काँग्रेसशी बिलकुल संबंध नाही. तुम्ही बाहेर जा आणि प्रश्नमंचावरील वेळेवर परत या.”
…इथं टीव्ही वाल्यांनी इगोचा प्रश्न निर्माण केला. आणि ‘प्रिंट मिडिया’ विरुद्ध ‘टीव्ही मिडिया’ असा वाद सुरू झाला. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीच्या व्हीडिओचा गैरफायदा घेवून, आधीच बिकावू पायचाटू म्हणून विश्वासार्हता गमावलेले पत्रकार, ही गोष्ट बरोब्बर उलटी दाखवून ; त्याला ‘हिंदू-मुस्लिम’ फोडणी देण्याच्या प्रयत्नात आहेत.
…अर्थात समर खडस या सगळ्यांचा बाप आहे. त्याचे मत तो त्याच्या पद्धतीनं मांडेलच. आम्हाला समर खडस हा मानवतेसाठी लढणारा नीडर योद्धा म्हणून माहिती आहे. एक जाणकार, परखड, सत्यशोधक राजकीय विश्लेषक म्हणून तो प्रसिद्ध आहे. ‘बकऱ्याची बॉडी’ सारखी कथा असो किंवा झुंडशाही, मॉब लिंचिंगचा पर्दाफाश करणारं ‘झुंड’ सारखं नाटक असो… समर तितक्याच भेदक लेखणीचा साहित्यिकही आहे.
हल्ली गोदी पिल्लांना जो माज आलाय तो उतरवायला जी भाषा लागते ती समरनं वापरली. मला तरी त्यात गैर वाटत नाही. समरच्या सच्चेपणावर माझा पूर्ण विश्वास आहे !
सत्य आम्हां मनी । नव्हो गाबाळाचे धनी ।। वेल डन समर… जो भी होगा देखा जायेगा.