• 174
  • 1 minute read

गजनी

गजनी

एक नाही, भाजपात,
सारेच गजनी झालेत,
त्यांनीच दिलेली वचनें,
तेच आज विसरलेत…१

कवडी ना आली हाती,
पंधरा लाखातली,
देशाची बॅंक मात्र,
त्यांनी स्विस बॅंक केली….२

दोन कोटी रोजगाराचे,
होते युवकांस वचन,
रोजगार देणे सोडाच,
बेरोजगारीने स्पर्शीले गगन….३

ना खाऊँगा, ना खाने दूँगा,
होते वचन भारी,
सोळा लाख कोटी देशधन,
लूटले खानाऱ्यांवरी…४

भ्रष्टाचाराचा करील अंत,
होते असेही एक वचन,
मोडून कंबर लोकशाहीची,
करती आरोपींचे जतन…५

मोदी गॅरंटी, नवा गजनी डाव,
जाणती सारे रंक नि राव,
एकच गर्जना चोहीकडे राव,
गजनी हटाव – देश बचाव…६

– प्रकाश डबरासे

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *