मुंबई व महाराष्ट्र राज्यातील परवडणाऱ्या घरांचे व जमिन विषयक प्रश्न कामगार व नागरिक यांच्या साठी जीवघेणे ठरत आहेत
घर हक्क परिषदेतील 30 संघटनांनी एकत्र येऊन
टिळक भवन वर 12 October 2025 रेाजी 12 कलमी
जाहीरनामा मंजूर केला .
मुंबई व महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना व कामगारांना घरांचा हक्क सविधानातून निर्माण झालेल्या कायद्यानुसार दिला आहे .
मात्र महाराष्ट्र सरकार नागरिक व कामगार यांचे हक्क हिरावून घेत आहे ! तसेच बिल्डर आणि राजकीय नेते व नेाकरशहा यांची भ्रष्ट युती लाभार्थी आहे . नागरिक व कामगारांना त्यांच्या घरांचा व जमिनी वरील अधिकाराचा हक्क मिळावा या करिता ही चळवळ आकाराला येत आहे. !
हिवाळी अधिवेशना पूर्वी
मा मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन एक पत्रकार परिषद घेऊन आंदोलन कार्यक्रम जाहीर केले . हिवाळी अधिवेशनात आमदारांनी नागरिक व कामगार यांच्या घरांचे व जमिनी च्या हक्का बाबत लक्षवेधी प्रश्न उपस्थित करावेत असे प्रयत्न झाले .
आता महानगरपालिका निवडणुकीत नागरिक व कामगारांनी मतदान करताना केाणती भूमिका घ्यावी?
या करिता पत्रकार परिषद आयेाजित करण्यात येत आहे
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या अर्थ शास्त्र विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी व तसेच महाविकास आघाडी तील अनेक संघटना तसेच बंद गिरणी कामगार संघटना या
“ घर हक्क परिषद “ मध्ये एकत्र आहेत .
न्यायालयीन संघर्ष करीत असतानाच व्यापक चळवळ संघटित हेात आहे .
12 जानेवारी रेाजी दुपारी 3 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ , पहिला मजला , महानगर पालिके समेार मुंबई येथे पत्रकार परिषद संबेाधित करीत आहेत .
सर्व भाषिक वृत्त पत्र व चँनेल प्रतिनिधि ना नम्र विनंती आहे की त्यानी दुपारी 3 वा या मुंबई मराठी पत्रकार संघ येथे उपस्थित राहून या महत्वा च्या प्रश्नाला प्रसिद्धी ध्यावी. ही विनंती!
या निवडणुकीत 2 केाटी नागरिकांचा व कामगारां च्या घर व जमिन या प्रश्ना वर
“घर हक्क परिषद “ आपले निवेदन माध्यमा समेार मांडेल .
विश्वास उटगी