- 25
- 1 minute read
छ्त्रपती शिवराय महाराज याचा ३५० वा राज्याभिषेक
छ्त्रपती शिवाजी महाराज याचा रायगडावर ६ जून १९७४ रोजी राज्याभिषेक झाला .त्याला ३५० वर्ष पूर्ण होत असल्याने सुवर्णकलशसह शिवशक राजदंड स्वराज्यची गुढी १५ फुट उंच उभारून राज्याभिषेक सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.परंतु छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी ६ जून १९७४ रोजीचा राज्याभिषेक नाकारून केवळ ७९ दिवसात २४ सप्टेंबर १६७४ रोजी दुसरा राज्याभिषेक केला.याचा शिवसैनिकाना विसर का पडतो? इतिहास साक्षीला आहे की , शिवाजी महाराज यांनी पाहिला राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक केला .त्यांनी जो राज्याभिषेक नाकारला तरी तोच राज्याभिषेक साजरा करून आम्ही शिवाजी महाराज याचा गौरव करतोय की अवमान करतोय.यावर विचार मंथन करणार की नाही?
सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य आणि विक्रमादित्य याचे राज्याभिषेक गणराज्य व्यवस्थाने केले.शिवाजी महाराज याना देखील
अठरा पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेवुन बहुजनवादी राज्याभिषेक साजरा करण्याची इच्छा होती.कारण शिवाजी महाराज याना आदिलशाहीच्या बंडखोरीने राज्य निर्माण केल्याचा त्याच्यावर आरोप होत होता.तसेच
.धर्मशास्रनुसार ब्राह्मणला शिक्षा करता येत नव्हती.कारण ‘ब्राह्मण कितीही झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ ” म्हणून राज्य कायदेशीर राज्यसंस्था धर्मसिद्दी ,प्राणप्रतिष्ठा,स्वातंत्र्य आणि सार्वभौम राज्यसाठी राज्याभिषेक करायचा निर्णय शिवराय , अवबाजी आवळे, जिजाऊ आणि संभाजी राजे यांनी घेतला.
निधर्मी राजा शिवाजी महाराज याच्या स्वराज्यात आनाजी पंथ ,मोरोपंत पिंगळे सारख्या
अनेक वतनदार ब्राह्मण होते.त्यानी भडकावल्याचा परिणाम महाराष्ट्रातील एक जात ब्राह्मनानी शिवाजी हा शूद्र राजा असल्याचे म्हणत त्याचा राज्याभिषेक करण्यास कडवा विरोध केला. विरोधाचे स्पष्टीकरण म्हणजे स्वतःच्या आईचे मुंडके उडविणारा परशुराम याने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. शेवटच्या नंद कुळाचा नाश झाल्या पासून पृथ्वीवर एकही क्षत्रिय उरलेला नाही.याचा अर्थ फक्त ब्राह्मण आणि शूद्र आहेत .शिवाजी महाराज स्वतःला क्षत्रिय म्हणत असतील तर त्याचा देखील योग्य वेळी उपनयन विधी अर्थात मुंज झालेली नाही.
शिवाजी महाराज हार मानणारे नव्हते.त्यांनी
आपले पूर्वज वेरूळचे क्षत्रिय असल्याचे सिद्ध करून राज्यभिषेक करण्यास काशीचे गागाभट्ट याना पाचारण केले. मोरोपंत पिंगळे यांच्यात आणि गागाभट्ट मध्ये बराच वादविवाद झाला. अखेर गागाभट्ट म्हणाले शिवाजी नाही तर कायस्थ
ब्राह्मण आवजी आवळे याचा राज्यभिषेक करावा लागेल.३६ चा आकडा असलेलेआवजी आवळे पेक्षा दगडा पेक्षा वीट मऊ म्हणत मोरोपंत पिंगळे यांनी शिवाजी महाराज याच्या राज्यभिषेकाला संमती दिली होती.
गागाभटानी स्वतःचे ७००० होन आणि विरोध करणाऱ्या प्रमुख ब्राह्मणांना १७००० होन दक्षिणा रुपी घेवून .राज्याभिषेकस आरंभ केला.शिवाजी महाराज याची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला करून ते सर्व रायगडावर अतिथी असलेल्या ५० हजार ब्राह्मण परिवाराना दान रुपी वाटले.त्याच्या जेवणाच्या पंगती बसत होत्या .आणि मावळे
मराठे त्याच्या सेवेसाठी रात्र दिवस राबत होते.स्वराज्याची तिजोरी दानाच्या नावाखाली
रीती होत असल्याचा शिवराय , सभाजी राजे आणि राजमाता जिजाऊ याना राग येत होता .पण राज्याभिषेक देखील महत्त्वाचा होता.
रायगडावर ६ जून १९७४ रोजी सकाळ प्रहारी पासून राज्याभिषेक विधीला सुरुवात झाली.अखेर जातीवर गेलेल्या गागाभट्ट यांनी
क्षत्रिय राजासाठीचे वेदायुक्त मंत्र न म्हणता शूद्र राजासाठी असलेले पुराण युक्त मंत्र म्हणून राज्याभिषेक करताच राजमाता जिजाऊ ,सभाजी राजे याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ब्राह्मण इतिहासकार म्हणतात की राजमाता जिजाबाई याना दम्याचा त्रास होता म्हणून त्या राज्याभिषेक होताच रायगड सोडून रायगड पायथ्या पाचवड येथे येवून राहिल्या .खरे तर शिवबाला शूद्र राजा ठरविण्याचे त्याच्या जिव्हारी लागल्यामुळे त्या पाचवडला आल्या आणि आजारी पडल्या.
अखेरच्या क्षणी राजमाता जिजाऊ म्हणाल्या ” शिवबा राजसत्ता इतकीच धर्मसत्ता महत्वाची
असून सनातनी भट पुरोहिताच्या नाकावर टीचून बहुजनवादी धर्मसत्ता प्रस्थापित करण्याची गरज आहे.राजमाता जिजाऊ याचा शब्द हा अंतिम मानणारे शिवाजी महाराज यांनी धर्म मार्तंडाची पर्वा न करता केवळ ७९ दिवसांत पाहिला राज्याभिषेक नाकारून निश्चलपुरी चे गोसावी याच्या कडून शालिवान
शक १५९६ शुध्द आश्विन पंचमीला गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर १९७४ रोजी शाक्तपंथी म्हणजेच तांत्रिक पद्धतीचा राज्याभिषेक निश्चलपुरीचे गोसावी अर्थात बौध्द भिक्षू यांनी केला.याला एकच पुरावा म्हणजे सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य आणि विक्रमादित्य याचे राज्याभिषेक गणराज्य पद्धतीत जाती धर्माचे उच्चाटन करण्यासाठी राज्याभिषेक प्रसंगी राजाने खालच्या वर्गातील स्रीशी विवाह करणे बंधनकारक आहे.दुसरा राज्याभिषेक वेळी शिवाजी महाराज यांनी वेरूळच्या अस्पृश्य महिलेशी विवाह केल्याची नोंद आहे.
तांत्रिक पद्धतीचा राज्याभिषेक तंत्र शब्दाचा अर्थ तंत्र म्हणजे विशिष्ट शिद्दांत शास्त्र संप्रदाय या विचारसरणी होय.माणसांनी माणसाशी माणसा सारखे वागण्याची समतावादी विचार सरणी बुद्ध धम्मातून आल्याचे मान्यच करावे लागेल.हा राज्याभिषेक ही शिवाजी महाराज याची ह सर्वात मोठी धर्म क्रांती आहे.आग्र्याहून सुटलेले शिवाजी राजे ,शंभू राजे सरळ काशीला म्हणजे सारनाथला बौद्ध भिकू संघात राहिले होते. बौध्द धम्माचा प्रभाव असल्यामुळेच संभाजी राजे ” बुद्धभूषण ” हा ग्रंथ लिहू शकले.सत्य लपविले जाते पण पराजीत करता येत नाही. १९२३ साली श्री शिवराज्याभिषेक ,- कल्पतरू हा ग्रंथ द.वी.आपटे ,का.ना.दीक्षित यांनी प्रकाशित केला.पाहिला राज्याभिषेक मध्ये भट पुरोहित यांनी स्वराज्याची तिजोरी खाली केल्याचे दाखले दिले आहेत.
छ्त्रपती शिवाजी महाराज याचा ३५० वां राज्याभिषेक निमित्त शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभरणारूना प्रश्न आहे की, शिवशाहीचा
राजदंड कोणी पळविला ? शिवशाहीत सुरू केलेला शिवशक बंद करून मोगलांचा फसली शक कोणी सुरू केला ? शिवशाही संपवून पेशवाई कशी आली ? यावरती विचार मंथन होऊन सत्य बाहेर आले पाहिजे.त्यासाठी महात्मा फुलेंनी सत्य शोधक चळवळ सुरू केली होती. या सर्वाची उतर गोविंद पानसरे यांनी आपल्या शिवाजी कोण होता या पुस्तकात देण्याची नुसती सुरुवात करताच त्याची हत्या करण्यात आली.मर्द मावळे मराठे याना सगळे कळते पण वळत का नाही?
छत्रपती शिवाजी महाराज याना शूद्र राजा
म्हणूनच राज्याभिषेक केला. तो शिवाजी महाराज यांनी नाकारला .शिवाजी महाराज याचा अपमान हा शिवसैनिक याना वाटत नाही कारण शिवसैनिक ब्राह्मणी धर्माच्या कोषातून बाहेर पडण्यास तयार नाहीत.परंतु याचा राग असल्यामुळेच मनुस्मृतीचे दहन करून डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी राज्याभिषेक प्रसंगी शिवाजी महाराज याचा केलेल्या अपमानाचा बदला घेतला आहे.कोणाला पाहिला राज्याभिषेक साजरा करायचा त्यांना तो खुशाल साजरा करू द्या.कारण त्यांना शिवाजी महाराज याचा अपमानित सोहळा असल्याचे लक्षात येत नाही.परंतु बहुजन समाजाने मात्र शिवाजी महाराज याचा ३५० वा
२४ सप्टेंबर १७७४ चा दुसरा राज्याभिषेक मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे.
– आनंद म्हस्के