लोकशाही व संविधान विरोधी "जन सुरक्षा कायदा" विरोधात मुंबई हाय कोर्टात जनहीत याचीकेसाठी संभाजी ब्रिगेडची टीम दाखल.
संभाजी ब्रिगेड अध्यक्ष ॲड. मनोजदादा आखरे यांच्या नेतृत्वाखाली वकीलांची सशक्त कायदे विषयक सल्लागार टीम आज मुंबई हाय कोर्टात जन सुरक्षा कायद्या विरोधात पी.आय.एल (Public Interest Litigation)जनहित याचिका दाखल करण्यासाठी दाखल.
याचिकेच्या दाखल प्रक्रियेत उपस्थित : ॲड. आशिषराजे गायकवाड, मुंबई ॲड. मिलिंद पवार, पुणे ॲड. हर्षवर्धन पवार, मुंबई ॲड. रियाताई करंजकर, मुंबई
तसेच संभाजी ब्रिगेडचे मुंबई विभागातील राज्य, विभागीय आणि जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लढ्यामध्ये सहभागी होते.
संभाजी ब्रिगेडचा ठाम संदेश: “लोकशाही व संविधानातील मूलभूत हक्क आणि अधिकारावर गदा आणणारे कोणतेही कायदे आम्ही सहन करणार नाही!” लोकशाही व संविधान यांचे रक्षण करण्यासाठी हा संघर्ष सुरूच राहील!