- 32
- 1 minute read
जय भीम का नारा संविधान हमारा
भारतीय संविधानची उद्देशिका ही कोणत्या देव धर्म या ग्रंथाला अर्पण केली नसून…
” आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यास, तसेच त्याच्या समस्त नागरिकांना:सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,विचार, अभिव्यक्ति, विश्वास , श्रद्धाव उपासना यांचे स्वातंत्र्य ;दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करनेचा संकल्पपूर्वक निर्धार करून;आपल्या या संविधान सभेत आज दिनांक नोव्हेंबर २६, १९४९ ला एतद्द्वारे या संविधानला अंगीकृत,अधिनियमीत आणि आत्मार्पित करीत आहोत.’
भारतीय संविधानात देशाच्या निष्ठेची शपथ घेण्याचा अधिकारी केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, संसद सदस्य, राज्य विधिमंडळ सदस्य, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या पदांवर असलेल्या व्यक्ती भारताच्या निष्ठेची शपथ घेतात शपथ पुढील प्रमाणे
मी, एबी, शपथ घेतो / गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी विश्वासू राहीन आणि भारत आणि भारताशी खरी निष्ठा ठेवीन. भारताच्या संविधानाने कायद्याने स्थापित केले आहे की, मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखीन आणि मी माझ्या पदाची कर्तव्ये निष्ठेने,प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपणे पार पाडीन.”
संवैधानिक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीने आपल्या राज्यघटनेत निहित धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेचे रक्षण करण्यासाठी “देवाच्या नावाने” ऐवजी “गंभीरपणे प्रतिज्ञा” या स्वरूपात शपथ घेतली पाहिजे, धर्मनिरपेक्ष प्रस्तावना असूनही, राज्यघटनेची तिसरी अनुसूची “देवाच्या नावाने” शपथ घेण्याचा किंवा शपथ घेणाऱ्या व्यक्तीच्या विश्वासावर अवलंबून “गंभीरपणे प्रतिज्ञा” करण्याचा पर्याय प्रदान करते..त्यामुळे कोणीही देवा व्यतिरिक्त आपले आदर्श असतील त्याच्या नावाने शपथ घेण्याचे संविधान याने स्वतंत्र दिलेले आहे.
१८ वी लोकसभा निकालांमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) २९३ जागा जिंकल्या, तर विरोधी भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी (इंडिया आघाडी) ने २३२ जागा मिळवल्या. यंदाच्या निवडणुकीतील विशेष म्हणजे संसदला विरोधी पक्षनेता मिळाला.कारण
२०१४ ते २०,१९ गेली दहा वर्षे विरोधी पक्षाला बहुमत नव्हते.लोकसभेच्या 543 जागांपैकी किमान 55 जागा विरोधी पक्षाने जिंकल्या तर विरोधी पक्षनेते पद मिळते.काँग्रेसला २०१४ ला ४४ तर २०१९ ला ५२ प्रतिनिधी निवडून आले.,१६ आणि १७ व्यां लोकसभेला विरोधी पक्षनेते नसल्याने संसद मोदी मोदी म्हणून गाजत होती. स्वतःला देवाचा अवतार समजणारे मोदींना इतका अहंकार झाला . की,विरोधकांना पाणी कम समजणारे मोदी सरकार अनेक विधायक वर कोणतीही चर्चा न करता मनमानी करीत होते लोकशाही नव्हे तर एकाधिकारशाही चां अहंकार झालेले मोदी संसद मध्ये छतीती ठोकून विरोधकांना हिणवत होते की “एक अकेला सबको भारी ”
सत्ता ही आळवरच्या पाना सारखी असते.कारण सत्ता ही कोणासाठी अजरामर नसते सत्तेच्या जोरावर शासन ,प्रशासन ,मीडिया , सी बी आय, ई डी,न्याय पालिका आणि निवडणूक आयोगच नव्हे तर EVM घोटाळा करण्याचा प्रयत्न करणे असो अथवा नसो . सगळ्या वर आम्ही भारताचे लोक आहोत हेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे.कारण भाजपला अबकी बार ४०० पार सोडा ३०० चे आकडा पार करता आला नाही.याच कारण संविधान बदलणार हा न्यारेतिवे शेट करण्यात विरोधक यशस्वी झाले.असेल तरी
संविधान बदलण्याची सुरुवात कोणी केली
आर एस एस चा धर्मनिरपेक्ष राजकारणाला आरंभापासून विरोध राहिला आहे. भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि ते तसेच राहावे व त्यात एकाच धर्माचे वर्चस्व आणि इतरांचे स्थान दुय्यम असावे ही त्यांची १९२५ पासूनची भूमिका आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे म्हणाले संविधान बदलण्यासाठी अब की बार ४०० पार .त्या पूर्वी प्रधान मंत्री याचे सेक्रेटरी यांनी संविधान बदलण्याची गरज व्यक्त करणारा लेख लिहिला होता.संसद मधील अनेक भाजप नेते खुले आम संविधान बदलण्याची भाषा करीत होते.
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राष्ट्रपती भवन मध्ये संविधान बदलण्याची भाषा केली होती.तेव्हा राष्ट्रपती के आर नारायणन यांनी ठणकावून सांगितले होते की संविधान मध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार असताना कोणालाच संविधान बदलता येणार नाही.सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा नारा देवून सत्तेवर आलेल्या मोदींनी अडाणी अंबानींची साथ देवून फक्त त्याचाच विकास केल्यामुळे ते केवळ सात आठ वर्षांत जगातील पहिल्या दुसऱ्या श्रीमंतांना मागे टाकण्याची स्पर्धा करू लागले आहेत . देशातील ८० कोटी लोकांना मोफत पाच किलो धान्यावर पुरविण्यात धन्यता
मानणारे दुसऱ्यांनी वीज ,शिक्षण आरोग्य सेवा मोफत दिल्या की त्याला रेवडी म्हणत होते.
मोदींनी गेल्या दाहा वर्षात विकास सोडा एक संघ राहण्याचा विश्वास दिला नाही.उलट
हिंदू मुस्लिम तुष्टीकरण सुरू करून मत भेद सोबत मन भेद केला. त्याचा परिणाम शाळांमधून लहान मूल जाती धर्माच्या नावाने तिरस्कार करीत आहेत.मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड काढली, शेतकरी आत्महत्या झाल्या , शेतकरी आंदोलन असो या महिला खेळाडू न्याय आंदोलन असो ,महागाई ,बेकारी ,बेरोजगारी ,देशात कितीही असंतोष असला तरी मोदी जन की बात
नाही मन की बात करीत राहिले.जनता सब कुछ जाणती है! सत्तेवर बसविणार जनताच सत्तेवरून
पाय उतार करू शकते.
भारतीय जनतेने मोदी याना निसटता निकाल देवून सत्ता दिली असली तरी विरोधकाना
देखील तेवढ्याच सशक्त लढण्याचे बळ दिले आहे. कोण राहुल गांधी पपू म्हणून हिणवले जात होते .त्याच राहुल गांधींना विरोधी पक्ष नेता मान्य करून मोदींना राज्यकारभार करावा लागणार आहे.कारण विरोधी पक्षाचा नेता शॅडो पंतप्रधान असतो. ते केवळ संपूर्ण विरोधी पक्षाचेच नेतृत्व करत नाहीत तर अनेक महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये पंतप्रधानां सोबत असल्या शिवाय संचालनालय, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो, केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय माहिती आयोग, लोकपाल, तसेच निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष यासारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करता येणार नाही
18 वीं लोकसभा संसदचे वैशिष्ठ म्हणजे १०४ साला पूर्वी शाहू महाराज याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर बदलचे शब्द खरे ठरले २० मार्च १९२० रोजी माणगाव परिषद मध्ये राजश्री शाहू महाराज म्हणाले होते की “अस्पृश्यनो मी तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो.कारण
तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे. डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की,डॉ.आंबेडकर हे संपूर्ण हिंदुस्थानचे एकमेव पुढारी असतील असे मनोदेवता मला सांगते.हे १८ व्या लोकसभा शपथविधीची विशेष
घटना म्हणजे संपूर्ण संसद ” जय भीम जय संविधान आणि डॉ.बाबसाहेब आंबेडकर या जय:जयकाराने गाजली.
संसद शपथ विधीच्या वेळी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीं, आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी शपथ घेताना सत्ताधारी याना भारतीय राज्यघटनेची प्रत दाखवली संविधान नुसारच राज्यकारभार करण्याचा सरकारला इशारा दिला आहे.नवनिर्वाचित खासदार चंद्रशेखर यानी ‘जय भीम, जय भारत, जय संविधान, जय जवान, जय किसान’ या जय घोषाने शपथेची सांगता केली.असदुद्दीन ओवैसी यांनी खासदाराकीची शपथ पूर्ण करताच, ‘जय भीम’, ‘जय मीम’, ‘जय पॅलेस्टाईन’ असा नारा दिला.शिवसेना उबाठा गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आई वडील आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून जयभीम, जय शिवराय, तसेच रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र म्हणताच अध्यक्षांनी त्याच्या आई वडील आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याला आक्षेप घेवून परत शपथ घेण्यास लावले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्या पासून संविधान वाचविण्याची भाषा फक्त आंबेडकरी जनताच बोलत होती काहींचा समज होता की डॉ. आंबेडकर याचे संविधान वाचविण्यासाठी यांनाच फार गरज वाटते पण २०२४ ची लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या विरोधी पक्षाच्या २३२ खासदारांनी सविधन मान्य २२ राष्ट्र भाषा मधून शपथ घेत असताना सत्ताधारी याना संविधान दाखवीत जय संविधान चा नारा दिला.
लोकसभा अध्यक्ष या स्पीकर याची भूमिका फार महत्वाची असते.कारण लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेचे पीठासीन अधिकारी असून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीत अध्यक्षाची निवड केली जाते.लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर होते आणि १७ व्या लोकसभाचे अध्यक्षपदी राहिलेले
ओम बिर्ला यांनी काँग्रेसचे आठ वेळा खासदार राहिलेले दलीत कोडिकुनिल सुरेश यांचा आवाजी मतदानाने पराभव करून १८ व्या लोकसभेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले. यावर खा.चिराग पासवान म्हणाले काँग्रेस बहुमत असताना नव्हे तर अडचणीत असताना दलीत प्रतिनिधींचा बळी देत आल्याचा इतिहास आहे
ओम बिर्ला लोकसभेचे दुसऱ्यांदा स्पीकर होऊन जीएमसी बालयोगी याची बरोबरी केली
असले तरी शपथ विधीच्या वेळी विरोधी पक्ष २३२ खासदारांनी संसद अध्यक्ष आणि सभागृह याना संविधान दाखवीत इशारा दिला की लोकसभा स्पीकर आणि मंत्री मण्डल याना मनमानी राज्यकारभार करता येणार नाही.कारण १७ वी लोकसभा ओम बिर्ला यांनी विरोधकांवर पक्षपात केल्याचा आरोप करीत असून त्यांनी
एक दिवसात 78 खासदारांना संसदेतून निलंबित केले.१७ डिसेंबर २०२३ रोजी १४ खासदार तर १८ डिसेंबर रोजी ४९ खासदारांना निलंबित केले असे एकच अधिवेशनात विरोधी पक्षाचे १४१ खासदार निलंबित केले . गेल्या आठ वर्षांत विरोधी पक्षाचे १५० खासदार निलंबित करण्याचे ओम बिर्ला यांच्या नावावर रेकॉर्ड आहे.लोकसभा अध्यक्ष याना प्रधान मंत्री आणि विरोधी पक्षनेते स्वागत करून त्याच्या संसद सिंहासन वर विराजमान करून स्वागत करीत असतात.कारण सत्ताधारी आणि विरोधक याच्या मधील दुवा लोकसभा स्पीकर असतात.त्यांनी प्रक्षापत करणे संविधान विरोधी आहे.
PRS Legislative Research या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशनात
3 सप्टेंबर 1962 रोजी पहिल्यांदा बेशिस्त वागणुकीमुळे राज्यसभेचे अपक्ष खासदार गोदे मुराहारी यांना निलंबित करण्यात आलं होतं.
राजीव गांधी 1989 साली प्रधान मंत्री असताना लोकसभा अध्यक्षांनी एकाच दिवसात 63 खासदारांना निलंबित करण्यात आले होते.परंतु राज्यसभा नियम 255 आणि 256 नुसार सभापती बेशिस्त वर्तन करणाऱ्या खासदारांना नावानिशी पुकारू शकतात. त्यांना सभागृहातून तात्काळ बाहेर जायला सांगू शकतात.लोकसभा नियम 374 (अ) नुसार सभागृहाच्या हौदात येऊन गोंधळ घालणाऱ्या, घोषणाबाजी करणाऱ्या किंवा सातत्याने गंभीर बेशिस्त वर्तन करणाऱ्या सदस्यांचं अध्यक्षांनी नाव घेतल्यानंतर त्यांचं आपोआप निलंबन होतं.भाजपने तोच विरोधी पक्षावर दबाव निर्माण करण्यासाठी वाटेल त्या किमतीवर ओम बिर्ला याना दुसऱ्यांदा लोकसभा स्पीकर केले आहे. असाही राजकारणात सुरू निघत आहे.
केंद्र आणि राज्याचे राजकारण कोणत्या स्थराला गेले आहे याचा पुरावा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी इंडिया आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे. “काही वेळ जाऊद्या, त्यानंतर इंडिया आघाडीतील अनेक लोक पंक्चर होऊन आमच्याकडे (एनडीए) येतील” लोक आता प्रफुल पटेल याना हाच प्रश्न करीत आहेत की शरद पवार कडून पंक्चर होऊनच अजित पवार सह सर्वच भाजप सोबत गेले आहेत ? आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर असेही. म्हंटले की ५० कोटी रूपये देऊन तुम्ही जनतेला विकत घ्याल; अशी अपेक्षा ठेवू नका. कारण, जनता गद्दारी कधीच स्वीकारत नसते.
One man one vote one value हा
श्रीमंत आणि गरिबांना समान अधिकार प्राप्त झाल्याच्या आनंदात संसद अधून मधून बाहेर पडत असताना खा.कृपलानी म्हणाले मिस्टर आंबेडकर तुम्ही सर्वानाच मताचा अधिकार दिला असला तरी आम्ही तुमच्या गरीब लोकांची मत विकत घेवून या देशावर राज्यकारभार करणार
त्यावर डॉ.बाबसाहेब आंबेडकर. म्हणाले गरिबांना ज्या दिवशी त्याच्या. मताची खरी किंमत कळेल त्या दिवशी तुमच्या सारखे भिकारी दुसरे कोणी नसेल.
भारत हा जगातील मुसलमान धर्माच्या लोकांचाही दुसºया क्रमांकाचा देश आहे. त्यात दोन कोटी ख्रिश्चन राहतात. बौद्ध, जैन ,शीख आणि पारशी धर्माचे लोकही तेव्हढेच राहतात.
सर्व धर्मांना व त्यांच्या अनुयायांना धर्मोपासनेचे स्वातंत्र्य आपल्या घटनेने बहाल केले आहे. भारत हा मध्य आशियातील अरब देशांसारखा कोणत्याही एका धर्माचा देश नाही. तो धर्म जात ,पंथ , भाषा प्रांत सर्वांना कवेत घेणारा आणि राष्ट्र ही संकल्पना धर्मकल्पनेहून श्रेष्ठ आहे असे मानणारा आहे. त्याचे हेच स्वरूप जगाला भावणारे व आवडणारे आहे.विविध फुलांची एक माळ गुंफून एका धाग्यात बांधून ठेवण्यात संविधान शिल्पकार यशस्वी झाले म्हणून डॉ.बाबसाहेब आंबेडकर याना राष्ट्र निर्मात्या म्हणतात.
संविधान बदलण्याची भाषा केली की सत्ता परीवर्तन होऊन जय भीम , जय संविधान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा घोषणा होणारच ! समाजवादी पक्षाचे खासदार आर के चौधरी यांनी संसद अध्यक्ष ओम बिरल याना पत्र लिहून संसद भवन मधील राजदंड म्हणून ठेवलेला सोंगोल हटवून त्या ठिकाणी संविधान ठेवण्याची
मागणी केली आहे.कारण देशाचा राज्यकारभार राजेशाही नव्हे तर लोकशाही पद्धतीने चालत असल्याने धर्म निरपेक्ष लोकशाही साठी संविधान हा दीपस्तंभ आहे.हे खरे असले तरी खा शशी थरूर यांनी संविधान शपत घेताच संविधान शपत
असे अध्यक्ष ओम बिर्ला. म्हणताच संविधानाला कोणाचा विरोधी आहे .असा विरोधकांकडून आवाज येताच अध्यक्ष म्हणाले कोणाचा विरोध नाही.त्यावर संसद बाहेर प्रियंका गांधीनी
म्हंटले की संसद मध्ये असविधनिक शपथ आणि असविधनिक धार्मिक नारे दिलेले चालतात पण सविधनिक शपत चालत नाही? स्वतंत्र्याच्या ७५ वर्षात जिवंत आंबेडकर पेक्षा मृत्यू आंबेडकर जास्त डेंजर असल्याचे सिद्ध झाले आहे.की “जय भीम का नारा संविधान हमारा “.
– आनंद म्हस्के