• 41
  • 1 minute read

जागतिक मानसिक आरोग्य दिन आज आहे..

जागतिक मानसिक आरोग्य दिन आज आहे..

खरे तर समाजाचे मानसिक आरोग्य निरोगी राहणे किती महत्त्वाचं असतं हे आजची परिस्थिती पाहून निश्चितपणे आपणास जाणवेल.

        राजकीय क्षेत्रातील मानसिकता भ्रष्ट बनलेली दिसते. सामाजिक क्षेत्रातील मानसिकता पोखरून गेलेली दिसते आणि वैयक्तिक आयुष्यात मनाने प्रत्येकाला स्ट्रगल करावा लागतो आहे.
स्वतःला मनानं नीट ठेवण्यासाठी सामना करावा लागतोय मतभेदांचा !

मतभेद सगळीकडे आहेत. कामाच्या ठिकाणी. घरामध्ये. बाहेर कुठे गेले तर तिथेही. आणि आपणच आपल्याशी मनातल्या मनात भांडतो तेव्हा. मतभेद सर्व ठिकाणी सर्व व्यक्तींमध्ये सर्व घटनांमध्ये असतात. आपल्या कामात लुडबुड करणाऱ्यांबरोबर, आपल्या मुलांच्या जबाबदाऱ्या कोणी कशा घ्यायच्या त्या जोडीदाराबरोबर, टीव्हीचे चॅनेल बघणाऱ्या बरोबर, एसटीने जायचे की रेल्वेने म्हणणाऱ्यांबरोबर, आमचा राजकीय पक्ष ग्रेट आहे म्हणणाऱ्यांबरोबर, पर्यावरण का अर्थकारण देशास बरबाद करते या विषयांवर, आणि फेसबुकवर-व्हाट्सअपवर-सोशल मीडियावर तर मतभेदांचा पूर आलेला असतो, वगैरे, वगैरे.

हे मतभेद विकोपास गेले की युद्ध सुरु होते. विषय भलतीकडे जातो. मुद्द्यावरून गुद्द्यावर जातो.

मतभेदांचे डोंगर सगळीकडे उभे आहेत. ते फोडायचे कसे हे प्रश्न आपणच आपल्या पद्धतीने सोडवत असतो.

आयुष्यात मतभेद नसावेत हा कल्पनाविलास आहे. टीव्ही, सिनेमा किंवा कथा कादंबऱ्यातून मतभेद नसलेले छान छान लोक्स भरपूर दाखवले जातात. हे एक टोक दाखवले जाते तर दुसरे टोक मतभेद असणाऱ्यांना काळं रंगवून त्यांचा संपूर्ण नायनाट केल्याचा हिरोगिरीचा खोटा आभास माथी मारला जातो.

मतभेद मिटवणं एवढं सोपं नसतं. मतभेदाला तोंड देण्यासाठी आपला मेंदू कसावा अन् तासावा लागतो.

मतभेद जर नीट हाताळले नाहीत तर कडाक्याचे भांडण होतं. मतभेद तर टाळता येत नाहीत पण कडाक्याचे भांडण मात्र टाळता येते… त्यासाठी उपाय आहे आमने-सामने बसून मतभेद हाताळायचा आणि तोही मानसिक कौशल्ये वापरून.
त्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
∆ प्रत्येक व्यक्तीची व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटनेमध्ये वेगवेगळी असते. कधी पडते घेणे, कधी आक्रमक होणे तर कधी दोन्हीचे मिश्रण होऊन तिरसट वागणे. हे त्या त्या वेळच्या प्रसंगानुसार घडते. म्हणूनच एकमत होणं कठीण असतं.

मुद्द्यावरून गुद्द्यावर का जातो?
∆ नात्यात जास्त गुंतले की अधिकार पैदा होतात. भीती वाढते. असुरक्षितता जाणवते. नातं तुटू नये यासाठी मग नवरा-बायको-मुलगा-बॉस-कर्मचारी-कोणत्याही स्वरूपाचे नातं असो, मतभेद चालू होतात. एखादा विषय आपणास महत्त्वाचा वाटतो. तो दुसऱ्यांना क्षुल्लक वाटतो. त्यातून सुरू होतात मतभेद.
∆ आपणच मनातल्या मनात समोरच्याच्या म्हणण्याचा अर्थ काढून तोच गृहीत धरून बोलणे केले की होतात मतभेद.
∆ चर्चा आणि मग सुधारणा आणि मग निर्णय या नियमांची ऐशी तैशी उडाली की मतभेद आकारास येतात.

तीन पद्धती मतभेद मिटवण्याच्या सर्वजण वापरतात. ज्या उपयोगी पडत नाहीत!
मतभेद मिटवायचे असतील तर मनोविज्ञानाने सांगितलेली आत्मनिर्भर पद्धत वापरणे अत्यंत उत्तम आणि सुंदर..!
– Dr. Pradeep Patil

0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *