• 95
  • 1 minute read

जाती हा एक स्वयं मर्यादित वर्ग होय – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जाती हा एक स्वयं मर्यादित वर्ग होय – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-२१ (२५ जुन २०२४)
(डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जातींच्या उत्पत्तीचा सिद्धांत, कालच्या भाग क्र. २० वरुन पुढे.. क्रमशः)

भारतातील जातींची घडण, उत्पत्ती आणि प्रसार या संदर्भात आपला सिद्धांत माडतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीअंतर्गत विवाह हेच जातीचे व्यवच्छेदक लक्षण मानले आहे. (Endogamy is the only characteristic that is peculiar caste). याच आधारावर त्यांनी आपला जातीचा सिद्धांत विकसित केला आहे.

भारतीय लोकसमूह हा सांस्कृतिक एकता असलेला समाज आहे. भारतात आलेले वेगवेगळ्या वंशाचे लोक भिन्न भिन्न प्रदेशांत स्थायिक झाल्यानंतर परस्परात विलीन झालेत आणि त्यांच्यात सांस्कृतिक एकता निर्माण झाली. ही सांस्कृतिक एकताच जमेस धरल्यास जातीची नवीन लक्षणांनी युक्त अशी समस्या ठरते. ही लक्षणे केवळ स्वगटात विवाह करणारे समाज व भटके लोक यांच्या सानिध्यातून निर्माण झालेली दिसत नाहीत. भारतातील जातींच्या एकसंघ समाजाचे कृत्रीमपणे लचके तोडून निर्माण केलेले निश्चित व स्थिर असे हे घटक होते. या प्रत्येकांवर जातीअंतर्गत विवाहाच्या रूढीद्वारे परस्परांत मिसळून जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

आधुनिक काळात भारत हा असा देश आहे की, जेथे आज देखील सामुदायीक जीवन आढळून येते. येथे सामुदायीक विवाह संहिता मिळेल, जी प्रत्येक जातीमध्ये आढळून येते. भारतीय समाजामध्ये विवाहाच्या संदर्भात इतके कठोर असे नियम आढळून येतात की, जे कोणत्याही समाजात आढळून येणार नाहीत. हिंदू समाजात तर हे सर्व प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येतात. विवाहाच्या संदर्भात हा समाज इतका परंपरावादी आही की, एक जाती दुसऱ्या जातीबरोबर कोणत्याही प्रकारचे वैवाहिक संबंध ठेवत नाही. इतकेच नव्हेतर, कोणतीही व्यक्ति यांचे उलंघन करू शकत नाही. अंतर्विवाहाचे कठोर नियम हेच जातीव्यवस्थेचे कारण आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे नमूद करतात.

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)

0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *