- 24
- 3 minutes read
जिथे विसावली मुम’ताज महल !

जिथे विसावली मुम’ताज महल !
जगातील 7 आश्चर्या पैकी ताजमहल हे एक आश्चर्य असून ही वास्तू शहाजहाँची पत्नी बेगम मुमताज महलची समाधी असून जगभर या वास्तूची ओळख प्रेमाचे प्रतिक म्हणून आहे. देश व विदेशातून ताजमहलला पहायला लाखो लोक वर्षाला येत असल्याने त्यातून देशाला करोडो रुपयांचा महसूल मिळतो. ही वास्तू बादशहा शहाजहानने आपली प्रिय पत्नी मुघल बादशहा शहाजहाँनची पत्नी मुमताजचा मृत्यू बऱ्हाणपूर जवळील जामोद या ठिकाणी झाला. हे जामोद ठिकाण बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव – जामोद या तालुक्यात आहे. मुघलकालीन ऐतिहासिक असलेल्या याच जामोद गावात हजरत पीर पौलाद शाह बाबाचा दर्गा आहे. या दरग्याला आजमृत्य भेट दिली.
या जामोद गावचे अनेक वैशिष्टे आहेत. याच गावात 1631मध्ये मुमताजचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिचे शव बऱ्हाणपूर, तापी नदीच्या किनाऱ्यावर दफन करण्यात आले. जामोद गावाचे वातावरण अन भूमी ताजमहाल बनविण्यास योग्य असती तर ताजमहल आग्र्या ऐवजी जामोद अथवा बऱ्हाणपूर येथेच बांधण्यात आले असते. या ठिकाणी बांधकाम करण्यास कुशल कामगार अन संगमरमर मिळत नसल्यानेच ताजमहल आग्र्यात बांधण्यात आला. प्रेमाचे प्रतिम म्हणून युनेस्कोने ताजमहलला वारसास्थान म्हणून खुपच वरचा दर्जा दिलेला असून हे स्थळ आज आपल्या देशाचा मानबिंदू अन शान आहे. याशिवाय येथे येणाऱ्या लाखो देश – विदेशी पर्यटकांमुळे देशाला केवळ तिकिटाच्या माध्यमातून 50 ते 60 कोटींचा महसूल वर्षाला मिळत आहे. तर या पर्यटकांमुळे आग्र्यातील हॉटेल व अन्य व्यवसायातून करोडो रुपये महसूल मिळत आहे. मुघल बादशहांना लुटेरे अन परकीय म्हणणाऱ्या शक्तींनी हे समजून घेतले पाहिजे. मुघलकालीन ताजमहल अन लाल किल्ला देशाला अन्य पर्यटन स्थळ्यांच्या तुलनेत सर्वात जास्त महसूल वर्षाला मिळत आहे.
मुमताजचे खरे नाव अर्जुमंद बानू बेगम असे होते. मात्र अकबर बादशहाचे बेटे राजकुमार खुर्रम शहाजहान यांच्याशी विवाह झाल्यावर राज महालातील सर्वात प्रिय अलंकार म्हणून अर्जुमंद बानूचे नाव सन्मानाने मुमताज महल ठेवले गेले. शहाजहान बादशहा झाल्यानंतर तो जेथे जाईल तेथे तो मुमताजला घेवून जात असे. 1631 मध्ये तो दख्खनच्या स्वारीवर होता व मुमताज त्याच्या सोबत होती. बऱ्हाणपूरकडे जात असताना मुघल सैन्याचा तळ जामोद गावात होता अन याच ठिकाणी वयाच्या केवळ 38 व्या वर्षी मुमताजचा मृत्यू झाला. तिचे दफन बऱ्हाणपूर, तापी नदीच्या किनाऱ्यावर करण्यात आले. मात्र तेथे ताजमहल सारखे स्मारक उभे करणे शक्य नसल्याने शव पुन्हा 1932 मध्ये आग्र्याला नेण्यात आले व तेथेच तिचे दफन करण्यात आले. यानंतर ताजमहलच्या बांधकामाला सुरुवात झाली. ही प्रेमाची प्रतिक असलेली वास्तू 20 वर्षानंतर म्हणजे 1653 मध्ये बांधून पूर्ण झाली.
मुमताजचा मृत्यू ते आग्र्यात दफन या दोन वर्षाच्या काळात बादशहा शहाजहानने मुमताजचे शव सुरक्षित ठेवले. तो तिच्या शवाच्या सानिध्यात राहिला. आज हे स्मारक या देशाला कोटी रुपयांचा महसूल मिळवून देत आहे. मुमताज अन शहाजहाँची कहानी आपल्या देशासाठी अनेक अर्थाने पथ्यावर पडलेली आहे. काही शक्ती मुघल राजवटीवरून देशात नफरतीचे राजकारण करीत आहेत. मुघलांना लुटेरे म्हणत आहेत. मात्र वस्तुस्थिती नक्कीच तशी नाही. प्रामाणिकपणे मुघल राजवटीकडे पाहिले, तर असा विचार करणाऱ्या शक्तींचे विचार कदाचित बदलू ही शकतील.मुघल बादशहांची राजवट नक्कीच होती. त्यांनी 8 शे वर्ष राज्य केले. पण त्यातील सर्वच बादशहा जुलमी नव्हते. हिंदू विरोधी नव्हते. हे खरे. असते तर तानसेन, बिरबल यासारखे ब्राह्मण मुघलांच्या दरबारातील रत्न झालेच नसते.
एक बादशहाने बनवा के हँसी ताजमहल,
सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है !!
इसके साये में सदा प्यार के चर्चे होगे
खतम ना हो सके ऐसी कहानी दी है !!
– राहुल गायकवाड, (प्रदेश महासचिव, समाजवादी पार्टी)