• 107
  • 1 minute read

टिळक भवनमध्ये कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

टिळक भवनमध्ये कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

महाविकास आघाडीतील सर्व सहका-यांसह मिळून कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार रमेश कीर यांना विजयी करा: नसीम खान

मुंबई, दि. १५ जून २०२४
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोमाने काम करावे. मतदारांशी संपर्क व संवाद साधा, महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाशी योग्य समन्वय साधून काम करा, महाविकास आघाडीचा विजय नक्की आहे, असा विश्वास प्रदेश काग्रेसचे कार्याध्यक्ष व कोकण पदवीधर मतदार संघाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष नसीम खान यांनी व्यक्त केला आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे कोकण विभागातील संघटानात्मक १३ जिल्ह्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक प्रदेश कार्याध्यक्ष व कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या समन्वय समितीचे प्रमुख नसीम खान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला आहे. जनता भारतीय जनता पक्षाच्या विभाजनकारी व जनविरोधी राजकारणाला कंटाळली आहे. लोकसभेप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचाच विजय होईल त्यासाठी मतादारांशी थेट संपर्क साधा, त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करा. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, समाजवादी पार्टी, शेकाप, आम आदमी पक्षासह सर्व समविचारी पक्षांशी योग्य समन्वय साधून काम केल्यास आपल्याला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही असे नसीम खान म्हणाले.

या बैठकीला विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रशासन व संघटन प्रमोद मोरे, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, गजानन देसाई यांच्यासह कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, प्रभारी, सहप्रभारी व निवडणुकीचे समन्वयक उपस्थित होते.

0Shares

Related post

तंत्रज्ञान पुढे, पण आत्मा मागे: बॉर्डर २ विरुद्ध बॉर्डर १

तंत्रज्ञान पुढे, पण आत्मा मागे: बॉर्डर २ विरुद्ध बॉर्डर १

तंत्रज्ञान पुढे, पण आत्मा मागे: बॉर्डर २ विरुद्ध बॉर्डर १ ही जेन झी जेन अल्फा टाळ्या…
महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली बारामती : राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत…
रुपयाच्या अवमूल्यनाची किंमत !

रुपयाच्या अवमूल्यनाची किंमत !

रुपयाच्या अवमूल्यनाची किंमत ! जेव्हा रुपयाचे अवमूल्यन होते तेव्हा काय होते ? सगळयात पहिला परिणाम म्हणजे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *