ठाण्यातील द्वेषपूर्ण पोस्टर हटवून, ते लावणाऱ्या विरोधात कारवाई करा – समाजवादी पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

ठाण्यातील द्वेषपूर्ण पोस्टर हटवून, ते लावणाऱ्या विरोधात कारवाई करा – समाजवादी पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

द्वेषपूर्ण पोस्टर हटवून, ते लावणाऱ्या विश्वबंधु राय यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

ठाणे : ठाणे येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ यांचे फोटोसह ‘बटोगे तो कटोगे’ असे द्वेषपूर्ण पोस्टर हटवून, ते लावणाऱ्या विश्वबंधु राय यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, एका तक्रार अर्जातून समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव, राहुल गायकवाड यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
    द्वेषपूर्ण पोस्टर हटवून ते लावणाऱ्या विश्वबंधु राय यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी या पत्रातून केली आहे. अशा प्रकारची पोस्टरबाजी निवडणूक काळातील आचारसंहिता असताना करण्यास बंदी आहे. सामाजिक तणाव निर्माण करण्यास अशा आशयाचे पोस्टर निमित्त होवू शकते. आचारसंहितेच्या काळात बंदी असतानाही, अशा प्रकारचे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे ते पोस्टर तात्काळ हटवून पोस्टर लावणारे विश्वबंधु राय यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने ताबडतोब कायदेशीर कारवाई करून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच शांततेची परिस्थिती कायम ठेवावी, अशी मागणी त्यांनी आयोगाला लिहीलेल्या तक्रार पत्रातून केली आहे.

.

0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *