• 29
  • 2 minutes read

डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मविषयक विचार, क्रमशः

डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मविषयक विचार, क्रमशः

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-४४ (२२ जुलै २०२४)
(डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मविषयक विचार, क्रमशः.. .)

डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मविषयक विचारांचे अध्ययन करीत असताना असे आढळून येते की, त्यांनी इतर धर्माचे अध्ययन केले आहे. तसेच, हिंदू धर्माची त्यांनी सविस्तर अशी चिकित्सा केली आहे. Philosophy of Hinduism, Riddles in Hinduism हे ग्रंथ त्यांच्या चिकित्सक अद्ययनाची साक्ष देतात. या दोन ग्रंथाव्यतिरिक्त Untouchables or the Children of India’s Ghetto and Other essays on Untouchability – Social – Political – Religious, Who were the Shudras?, The Untouchables Who were they and why they became Untouchables, Annihilation of Caste, Caste in India, Buddha and his Dhamma आदि विविध ग्रंथातून हिंदू धर्म, बौद्ध धम्म, धर्माचे तत्वज्ञान या संबंधीचे तत्वज्ञान त्यांनी मांडले आहेत. बाबासाहेबांच्या धार्मिक विचारांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येते.
अ. धर्माच्या तत्त्वज्ञानाचे मूल्यमापन करणाऱ्या कसोट्या,
ब. हिंदू धर्म विषयक विचार,
क. बौद्ध धम्म विषयक विचार.

अ. धर्माच्या तत्त्वज्ञानाचे मूल्यमापन करणाऱ्या कसोट्या: बाबासाहेबांनी Philosophy of Hinduism या ग्रंथात हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाचे चिकित्सक अध्ययन करण्यासाठी धर्माच्या तत्वज्ञानाचे मूल्यमापन करणाऱ्या कसोट्यांचे प्रतिपादन केले आहे. धर्माच्या तत्वज्ञानाचे मूल्यमापन करण्यापूर्वी त्यांनी धर्माचे तत्वज्ञान या शब्दाचा अर्थ सुरवातीलाच स्पष्ट केला आहे. तत्वज्ञान म्हणजे काय? बाबासाहेब तत्वज्ञान या शब्दाचा वापर दोन अर्थाने करतात.
१. पहिले म्हणजे, तसे शिकवणे, जसे सॉक्रेटिसचे तत्वज्ञान, प्लेटोचे तत्वज्ञान असे लोकं म्हणतात.
२. दुसरे म्हणजे, घडलेल्या घटनांवर व निर्णयांवर कारणांसह टीका-टिपणी.
या पद्धतीच्या कार्यात धर्माचे तत्वज्ञान हे बाबासाहेबांच्या दृष्टीने केवळ वर्णनात्मक शास्त्र नाही. जसे ते वर्णनात्मक आहे, तसे ते नियमबद्ध सुद्धा आहे. त्याचा जास्तीत जास्त संबंध हा धर्माची शिकवण या शब्दांशी येतो.

बाबासाहेबांनी तत्वज्ञान या शब्दाचा अर्थ सांगून धर्माच्या अभ्यासाच्या तीन निश्चित दिशा असल्याचे स्पष्ट केले.
१. धर्म म्हणजे काय व त्याची व्याख्या प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. धर्म या शब्दाचा उपयोग बाबासाहेबांनी धर्मशास्त्र (Theology) असा केला आहे. त्यांनी धर्मशास्त्राचे दोन प्रकार सांगितले आहेत.
i. पौराणिक धर्मशास्त्र: पौराणिक धर्मशास्त्र म्हणजे देवांच्या कथा होत.
ii. नागरी धर्मशास्त्र: नागरी धर्मशास्त्रामध्ये विविध प्रांतातील सण, परंपरा यांची माहिती देलेली असते. परंतु, या अर्थाने धर्मशास्त्र या शब्दाचा वापर बाबासाहेब करीत नाहीत. त्यांनी नैसर्गिक धर्मशास्त्र या अर्थाने शब्दाचा उपयोग केला आहे. बाबासाहेबांच्या मते, नैसर्गिक धर्माशास्त्रात देवदेवतांची शिकवण, उपदेश आहे व तो एका नैसर्गिक प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे. पूर्व परंपरागत अशी नैसर्गिक धर्मशास्त्राची तीन निरुपणे आहेत.
अ. परमेश्वराचे अस्तित्व असून ज्याला आपण निसर्ग किंवा विश्व म्हणतो त्याचा तो लेखक आहे.
ब. निसर्गात घडणाऱ्या सर्व घटकांचे परमेश्वर नियंत्रण करतो.
क. परमेश्वर त्याच्या सार्वभौम नैतिक कायद्याद्वारे मनुष्य जातीचे प्रशासन करतो.
धर्मशास्त्राच्या वरील तीन प्रकारच्या निरुपणांचा विचार करताना धर्म म्हणजे दैवी प्रशासनाची एक आदर्श योजना की ज्याचा उद्देश मनुष्याने नितीमत्तेने राहावे यासाठी समाजव्यवस्था निर्माण करणे, अशा प्रकारचा अर्थ बाबासाहेब गृहीत धरतात.

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)

0Shares

Related post

‘वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

‘वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणूक : जाहीरनामाही लवकरच प्रसिद्ध करणार मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश…
“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग… “एक राष्ट्र एक…
“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

विषय: “संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे, मंदिर हा शब्ध वगळावे . संविधान जागराचे सर्वंकष धोरण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *