• 344
  • 1 minute read

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्म विषयक विचार – क्रमशः…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्म विषयक विचार – क्रमशः…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख आदि धर्मांचे अध्ययन केले होते. Philosophy of Hinduism, Riddles in Hinduism, ही ग्रंथ त्यांच्या चिकित्सक अध्यायनाची साक्ष देतात. या दोन ग्रंथाव्यतिरिक्त, Untouchables or the Children of Indian’s Ghetto and Other essay on Untouchabity- Social-Political-Religious, Who were the Shudras? The Untouchables, Who were they and Why they became Untouchable; Annihilation of Caste, Caste in India, Buddha and his Dhamma आदि विविध ग्रंथातून हिंदू धर्म, बौद्ध धम्म, धर्माचे तत्वज्ञान यासंबंधीचे विचार त्यांनी मांडलेत.

धर्माच्या तत्वज्ञानाचे मूल्यमापन करणाऱ्या कसोट्या: धर्माच्या तत्वज्ञानाचे मूल्यमापन करण्यापूर्वी बाबासाहेबांनी धर्माचे तत्वज्ञान या शब्दाचा अर्थ सुरवातीलाच स्पष्ट केला आहे. ते, तत्वज्ञान या शब्दाचा वापर दोन अर्थाने करतात.
१. पहिला म्हणजे, तसे शिकवणे, जसे सॉक्रेटिसचे तत्वज्ञान, प्लेटोचे तत्वज्ञान, असे लोकं म्हणतात.
२. दुसरे म्हणजे, घडलेल्या घटनांवर व निर्णयांवर कारणास्तव टिकटिपणी. हे जसे वरणात्मक आहे, तसे ते नियमबद्ध सुद्धा आहे. त्याचा जास्तीत जास्त संबंध धर्माची शिकवण या शब्दाशी येतो.
बाबासाहेबांनी तत्वज्ञान या शब्दाचा अर्थ सांगून धर्माच्या अभ्यासाच्या तीन निश्चित दिशा असल्याचे स्पष्ट केले आहे (आज, पहिली दिशा दिली आहे):
१. त्यांनी धर्म या शब्दाचा उपयोग धर्मशास्त्र असा केला आहे. त्यांनी, धर्मशास्त्राचे दोन प्रकार सांगितले आहेत.
अ. पौराणिक धर्मशास्त्र,
ब. नागरी धर्मशास्त्र
अ. पौराणिक धर्मशास्त्र म्हणजे देवांच्या कथा होत. तर, नागरी धर्म शास्त्रात, विविध प्रांतातील सण, परंपरा यांची माहिती असते. परंतु, या अर्थाने धर्म शब्दाचा वापर बाबासाहेब करत नाहीत. त्यांनी नैसर्गिक धर्मशास्त्र या अर्थाने शब्दाचा उपयोग केला आहे. त्यांच्या मते, नैसर्गिक देवदेवतांची शिकवण, उपदेश आहे व तो एका नैसर्गिक प्रक्रियेचा अविभाज्य घटक आहे. पूर्व परंपरागत अशी नैसर्गिक धर्म शास्त्राची तीन निरुपणे आहेत.
अ. परमेश्वराचे अस्तित्व असून ज्याला आपण निसर्ग किंवा विश्व म्हणतो त्याचा तो लेखक आहे.
ब. निसर्गात घडणाऱ्या सर्व घटनांचे परमेश्वर नियंत्रण करतो.
क. परमेश्वर त्याच्या सार्वभौम नैतिक कायद्यांद्वारे मनुष्य जातींचे प्रशासन करतो.

धर्मशास्त्राच्या वरील तीन प्रकारच्या निरुपणांचा विचार करतांना धर्म म्हणजे दैवी प्रशासनाची एक आदर्श योजना की, ज्याचा उद्देश मनुष्याने नितीमत्तेने राहावे. यासाठी समाज व्यवस्था निर्माण करणे, अशा प्रकारचा अर्थ बाबासाहेब गृहीत धरतात.

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर (१३४) या ग्रंथातून)

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *