डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत सरकार उदासीन असतानाही स्मारक समिती गप्प का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत सरकार उदासीन असतानाही स्मारक समिती गप्प का?

आंबेडकरी विचारांवर निष्ठा असलेले कुठल्याही परिस्थितीत हा सदोष पुतळा उभा राहू देणार नाहीत.

सामाजिक न्याय, समता आणि नॉलेज ऑफ सिम्बालचे प्रतिक म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संविधान हाती असलेला पूर्णाकृती पुतळा चीन आपली राजधानी बिजिंगमध्ये उभारत आहे. हा पुतळा 1050 उंचीचा असून ज्या ठिकाणी हा पुतळा व स्मारक उभारण्यात येत आहे, त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधायुक्त एक संग्राहलयही उभारले जाणार आहे. डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक न्याय व समतेचा संदेश केवळ भारतीय जनतेलाच दिलेला नाहीतर,तर सर्व जगाला दिलेला. सदा अन सर्वकालीन हा संदेश जगभरातील जनतेला न्याय व समतेचा संदेश देत राहिल, असे या संदर्भात बोलताना चिनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. जगात या पेक्षा मोठे कुठल्या ही महापुरुषांचे असणार नाही, असा ही दावा त्यांनी केलेला आहे. पण डॉ. आंबेडकर यांनी या देशाला लोकशाही, संविधान व समतेची एक भक्कम व्यवस्था दिली, त्या आपल्या देशात मात्र असे स्मारक होत असताना त्यात राजकारण होत आहे. या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही. स्मारकातील पुतळा सदोष उभारला जात आहे. स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असताना त्या धर्तीवरील सुविधा येथे नाहीत,अन हे सारे जाणीवपूर्वक, धार्मिक व जातीय द्वेषातून केले जात आहे.
        चैत्यभूमी, दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाणार असून येथे उभारण्यात येत असलेला पुतळा सदोष असून तो तसा जाणीवपूर्वक उभारला जात आहे. याचा आंबेडकरी समाजातून तीव्र स्वरूपाचा विरोध होत आहे, तर जे संघ व भाजपच्या सत्तेचे कुठल्या ना कुठल्या अर्थाने लाभार्थी आहेत, ते या सदोष पुतळ्याला ही दोषमुक्त म्हणत आहेत. ज्यांच्यामुळे सत्तेची भीक व हड्डी मिळत आहे, त्यामुळे ते यावर बोलत नाहीत. बाकी आंबेडकरी विचारांवर निष्ठा असलेले कुठल्याही परिस्थितीत हा सदोष पुतळा उभा राहू देणार नाहीत. तसेच येथील सुविधा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्याच असल्या पाहिजेत. थोडाही समझोता केला जाणार नाही, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समितीने दिला आहे.
         चैत्यभूमी, दादर येथील इंदू मिलमध्ये होत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. ते त्याच धर्तीवर उभे राहिले पाहिजे, तेथे उभारण्यात येणारा डॉ. आंबेडकर यांचा पुतळा सदोष असला पाहिजे, स्मारकासाठी वापरण्यात येणारी सर्व जमीन स्मारकाच्या नावाने नोंद झाली पाहिजे, स्मारकातील सुविधा ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्याच असल्या पाहिजेत आणि स्मारक वेळेत पूर्ण झाले पाहिजे, आदी प्रमुख मागण्या घेवून ही समिती संघर्ष करीत आहे. अशा एक नव्हेतर अनेक समित्या काम करीत आहेत. मात्र त्यांच्यात समान कार्यक्रम असतानाही समन्वयाचा अभाव आहे. काही समित्यांमधील सदस्य हे विद्यमान हिंदुत्ववादी सरकारचे लाभार्थी असल्याने तो समन्वय असून तो राहणारच.
         पण आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते, पत्रकार दिवाकरजी शेजवळकर यांच्या प्रयत्नांनी स्थापन करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समिती सध्या या स्मारकासाठी संघर्ष करीत आहे. या समितीमध्ये आंबेडकरी विचारांच्या पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच डावे, समाजवादी व गांधीवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा ही समावेश आहे. या समितीने आपल्या मागण्या संदर्भात सर्व संबंधितांशी संपर्क केला असून त्यांना निवेदने दिली आहेत. मात्र राज्य सरकार व सरकारच्या सर्व प्रशासकीय यंत्रणा अगदी संथ गतीने याकडे पाहत आहेत.
      या प्रकरणी पत्रकार दिवाकरजी शेजवळकर आणि आंबेडकरवादी नेते रवीजी गरुड यांच्या पुढाकाराने समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात अनेक बैठका झाल्या. त्यात या संदर्भातील लढ्याची दिशा ठरविण्यात आली. सुरुवात एकदम जोशात झाली होती. समिती स्थापन झाली. सदस्य उत्साही होते. पण काही महिन्यात तो उत्साह मावळल्यासारखा दिसत आहे. याचा अर्थ हा नाही की, समितीचे काम थांबले आहे अथवा समिती कामच करीत नाही. मात्र समितीच्या बैठकांमध्ये अतिशय अभिनिवेशाने बोलणारे गप्प झाले आहेत. खरे तर समिती स्थापन झाल्याने त्यांना मिळालेल्या बळामुळे काहीजणांना उसने अवसान आले होते, हे आता स्पष्ट दिसू लागले आहे.
            मात्र या प्रकरणी पत्रकार दिवाकर शेजवळकर पुन्हा या समितीला कार्यरत करतील, ही अपेक्षा त्यांच्याकडून नक्कीच आहे. समितीमधील अनेक सदस्य या प्रश्नांवर काम करण्यास उत्सुक आहेत. पुन्हा नव्या जोमाने ही समिती कार्यरत होईल, यात शंका नाही.
……………..
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *