• 66
  • 4 minutes read

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन व मान्यवरांचा सन्मान समारंभ संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन व मान्यवरांचा सन्मान समारंभ संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून संयुक्त अभिवादन व मान्यवरांचा सन्मान समारंभ संपन्न

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने आज सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वतीने संयुक्त अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा निळा फेटा, शाल व पेढा देऊन सन्मान करण्यात आला

पुण्याचे माजी उपमहापौर डॉ.  सिद्धार्थ धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अभिवादन आणि सन्मान सोहळ्यात माजी नगरसेवक अविनाश साळवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, रिपब्लिकन युवा मोर्चाचे  राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, शैलेंद्र मोरे, राहुल नागटिळक, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे , माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, अतुल साळवे , प्रदिप देशमुख , अभय छाजेड , पंडितराव कांबळे, लुकस केदारी  यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

यावेळी सुमारे 300 मान्यवर पदाधिकाऱ्यांचा निळा फेटा बांधून तसेच शाल देऊन सत्कार करण्यात आला व सुमारे 134 किलो पेढ्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन मध्यवर्ती समितीचे राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे व इतर मान्यवरांनी केले होते. 

मध्यवर्ती समितीच्या वतीने आयोजित सभेमध्ये माजी आमदार जयदेव गायकवाड, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर व शिवसेना शिंदे गटाचे अजय भोसले व  इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री पृथ्वीराज यांचा तसेच शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांचाही विशेष सन्मान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीकडून करण्यात आला.

0Shares

Related post

भारतीय शेतीक्षेत्र आणि वित्त भांडवल

भारतीय शेतीक्षेत्र आणि वित्त भांडवल

भारतीय शेतीक्षेत्र आणि वित्त भांडवल काही दिवसापूर्वी ग्रामीण भागातील एक तरुण मित्राने मेसेंजर मध्ये विचारले “सर…
”इंडिगो फियास्को” : अभ्यासवर्ग

”इंडिगो फियास्को” : अभ्यासवर्ग

”इंडिगो फियास्को” : अभ्यासवर्ग भारतीय विमान वाहतूक सेवेची जगभर नाचक्की झालेल्या “इंडिगो” प्रकरणाचा गाभ्यातील ‘इश्यू’ नेमका…
”विश्वगुरू” बनण्याचा अभ्यासवर्ग

”विश्वगुरू” बनण्याचा अभ्यासवर्ग

”विश्वगुरू” बनण्याचा अभ्यासवर्ग  ‘नेव्हर वेस्ट अ गुड क्रायसिस’ अशी एक इंग्रजी म्हण आहे. याचा अर्थ असा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *