• 59
  • 1 minute read

ट्रम्प यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत.

ट्रम्प यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत.

          डोनाल्ड ट्रम्प, देशांनी त्यांना हव्या तशा अटींवर व्यापार करारावर सह्या कराव्यात म्हणून त्यांचे हात पिरगळत असतात. वरकरणी असे वाटेल हे सारे अमेरिकेचे व्यापारी आणि आर्थिक हित सांभाळण्यासाठी.

पण ट्रम्प यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत.

व्हियेतनाम पहिल्या काही देशांपैकी आहे ज्यांनी ट्रम्प यांच्या अमेरिकेबरोबर व्यापार करार केला.

बातमी आहे की ट्रम्प यांच्या कुटुंबाच्या कंपनीला, Trump Organisation, व्हिएतनामच्या राजधानी जवळ ९९० हेक्टर्स वर लक्झरी गोल्फ क्लब चालवायला परवानगी व्यापार करार होण्याच्या आजूबाजूलाच दिली गेली आहे.

ट्रम्प सार्वजनिक रित्या हे सांगतात की त्यांच्या कंपन्यांशी त्यांचा काही संबंध नाही. त्या कंपन्या त्यांचे कुटुंबीय चालवतात. सगळ्यांना सगळे माहित आहे.

गोल्फ क्लब प्रकल्पासाठी आवश्यक त्या शासकीय मान्यता व कागदपत्रे फास्ट ट्रॅक पद्धतीने निकालात काढली गेली.

व्हिएतनामी रिअल इस्टेट कंपनी Kinh Bac City आणि काही पार्टनर कंपन्या हा प्रकल्प राबवत आहे. या जमिनीवर अनेक व्हियेतनाम मधील छोटे शेतकरी तांदूळ पीक घेतात आणि त्यांचा विविध फळबागा त्यावर आहेत. त्यांना जुजबी compensation देऊन जमिनी खाली करायला सांगितले जात आहे. पुढच्या काही दिवसात प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे तेथे असंतोष आहे.

(Reuters, Economic Times, ऑगस्ट १२ २०२५ पान क्रमांक ४)

मुद्दा ट्रम्प या व्यक्तीला सिंगल आऊट करून शिव्या देण्याचा नाही. सिस्टिमवर चर्चा झाल्या पाहिजेत. ट्रम्प सारखी व्यक्ती अमेरिकेसारख्या लोकशाही देशाची प्रचंड मताधिक्क्याने राष्ट्राध्यक्ष बनते. बनल्यावर आपले कमर्शियल इंटरेस्ट खुले आम वाढवते हा आहे. अमेरिकेच्या व्यापार वाटाघाटी प्रतिनिधी मंडळातील वरिष्ठ अधिकारी, अमेरिकन शासनातील वरिष्ठ अधिकारी एक ब्र काढत नाहीत हा अजून गंभीर मुद्दा आहे.
_____

भारतात धारावी किंवा आंध्र प्रदेशातील अमरावती किंवा तत्सम महाकाय प्रकल्पात डोनाल्ड ट्रम्प यांच्या रियल इस्टेट कंपनीला भागीदारी मिळाली तर भारताबरोबरचा व्यापार करार फास्ट ट्रॅकवर जाईल

संजीव चांदोरकर (१३ ऑगस्ट २०२५)

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *