यामुळे अवाढव्य कर्ज काढून अमेरिकेत शिकून तेथेच नोकरी करण्याचे स्वप्न भारतीय तरुणांना भविष्यात पूर्वीसारखे पाहता येणार नाही.
भारतीय विद्यार्थी/ प्रोफेशनल साठी काही अंतरदृष्टी
१९८७ मध्ये परदेशात, विशेषतः अमेरिकेत शिकायला गेलेल्या चिनी विद्यार्थ्यांपैकी फक्त ५ टक्के विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यावर चीनमध्ये आपल्या देशात पुन्हा परत गेले होते. २००७ मध्ये ते प्रमाण ३० टक्के झाले. २०२० च्या गेल्या काही वर्षात ते ७० टक्क्यांवर गेले आहे.
चीनने गेल्या काही दशकात जी काही नेत्रदीपक आर्थिक प्रगती केली आहे, विशेषत तंत्रज्ञान क्षेत्रात त्यामध्ये या “रिव्हर्स मायग्रेशन”चे खूप मोठे योगदान आहे.