तंत्रज्ञान पुढे, पण आत्मा मागे: बॉर्डर २ विरुद्ध बॉर्डर १
ही जेन झी जेन अल्फा टाळ्या वाजवू वाजवू बॉर्डर २ बघतायत. यांना काय माहिती बॉर्डर १ ची क्रेझ. जी आजही आहे. बॉर्डर २ बॉर्डर १ च्या जवळपासही नाही. दोन्ही चित्रपटात प्लॉट १९७१ चाच आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने updated असला तरीही बॉर्डर २ पेक्षा बॉर्डर १ च जास्त authentic वाटतो.
बॉर्डर १ चा USP होता त्याचा बॅकग्राऊंड स्कोर. आदेश श्रीवास्तवचा. बॉर्डर २ ला देखील शेवटी त्याचाच आधार घेऊन टाळ्या घ्याव्या लागल्यात. जावेद अख्तर यांची अवीट गाणी आणि अनु मलिकचे अजरामर संगीत. कायम plagiarism चा शिक्का लागलेल्या अनु मलिकने बॉर्डरसाठी दिलेले संगीत खरच अप्रतिम आहे. २ मधली गाणी आवडली नाही. सोनू निगम आणि रूपकुमार राठोड Legend का आहेत हे २ ची गाणी ऐकून समजतं. विशाल मिश्रा आणि अरिजित सिंग husky singing चे competition करतात काय? आरं मोकळं गा की राजाहो. अर्थात दोघेही मोठे गायकयेत, पण आपलं एक मत! त्यांच्यापेक्षा Diljit Dosanjh चा आवाज काय लागला आहे. मस्त एकदम!
बॉर्डर २ च्या नट नट्यांच्या acting बद्दल काही बोलणार नाही. कारण बोलण्यासारखे काही नाहीच. बॉर्डर १ कधीही विस्मृतीत जाणारा सिनेमा नाही. सीन टू सीन लक्षात राहणारा सिनेमा. बॉर्डर २ ची क्रेझ आजच्या जनरेशनची आहे. लवकर hype आणि लवकर विस्मृती.
तरी बॉर्डर १ बॉर्डर २ च्या कानात हळूच म्हणत असेल
चमन में इख़्तिलात-ए-रंग-ओ-बू से बात बनती है
हम ही हम हैं तो क्या हम हैं तुम ही तुम हो तो क्या तुम हो