• 77
  • 1 minute read

तारामंडलातील तेजस्वी तारा म्हणजे संत रोहिदास आहेत !

संत रोहिदास हे पंधराव्या शतकातील एक महान संत होऊन गेले. त्यांचा जन्म वाराणशी तथा काशी या ठिकाणी झाला. बालपणापासूनच ते अत्यंत जिज्ञासू होते. वाडवडिलांच्या पारंपारिक व्यवसायात न रमता लोकप्रबोधनात ते तल्लीन होत असत. त्यांना लोककल्याणकारी धर्म अपेक्षित होता. त्यांना लिंगभेद, जातीभेद मान्य नव्हता. त्यांनी कर्मकांडाला विरोध केला. ते बुद्धिप्रामाण्यवादी होते.

मन चंगा तो कठोती मे गंगा l

असे ते नेहमी सांगत. भारतीय परंपरेमध्ये पापक्षालन आणि पुण्यप्राप्तीसाठी गंगास्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु संत रोहिदास यांनी गंगास्नानाने पापक्षालन होत नाही, तर ते प्रामाणिकपणाने आणि स्वच्छ आचरणाने होते. मन स्वच्छ ठेवा, मग कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नान करण्याची आवश्यकता नाही, असे त्यांचे मत होते. त्यांनी निर्गुण भक्तीचा पुरस्कार केला. लोककल्याण हा त्यांचा भक्तिमार्ग होता.

संत रोहिदास यांचा संपूर्ण देशभर प्रभाव होता. त्यांनी संपूर्ण भारत यात्रा केली. पूर्व भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारत आणि उत्तर भारत अशा संपूर्ण देशाला प्रभावित करण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारांमध्ये आणि वाणीमध्ये होते. संत मीराबाई या सुप्रसिद्ध संत त्यांच्या अनुयायी होत्या. संत रोहिदास यांचे ४१ अभंग शीख धर्माच्या पवित्र अशा गुरू ग्रंथसाहेबमध्ये आहेत.

जात, धर्म, पंथ, प्रांत या भेदापलीकडे गेलेला महामानव म्हणजे संत रोहिदास आहेत. त्यांनी वर्णव्यवस्थेला कडाडून विरोध केला. त्यांचे विचार आणि कार्य क्रांतिकारक आहे. त्यांचे विचार आणि कार्य मानवतावादी आणि लोककल्याणकारी आहे. विश्वविख्यात तत्ववेता आचार्य ओशो रजनीश म्हणतात की संत रोहिदास म्हणजे सर्वात अधिक चकाकणारा तारामंडलातील तारा आहे. त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभले.

– डॉ.श्रीमंत कोकाटे*तारामंडलातील तेजस्वी तारा म्हणजे संत रोहिदास आहेत!*

– डॉ.श्रीमंत कोकाटे

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *