भारतीय शेती प्रश्न याविषयी शेतीवरील समस्या निवारण , सरकारचे आयात निर्यात धोरण ,शेती विषयक विकासाचे प्रश्न ,शेती प्रक्रिया उद्योग शेतीवरील अनैतिक कर्ज , शेती उत्पादकता आणि शेती उत्पन्न , सरकारच्या शेती विरोधी धोरणामुळे भारतीय शेतीवर होणारे परिणाम , शेतकरी आत्महत्या, शेतीवरील अनैतिक कर्ज या सर्व गोष्टी वर व्यापक चिंतन आणि मंथन 3 सप्टेंबर 2025 रोजी माननीय शरद जोशी साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने जनशांती धाम ओझर शांतिगिरी आश्रम दहावा मैल येथे शेतकरी संघटना समन्वय समितीच्या वतीने शेतकरी कर्जमुक्ती अधिवेशन घेण्यात आल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी दिली विष़य शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज मुक्त करावे व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची कारवाई थांबविण्या संदर्भात ३ व ४ सप्टेंबर रोजी ओझर येथे शेतकरी व्यापक चिंतन मंथन परिषद आयोजन प्रत्येक पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमुक्ती करणार असल्याची जाहीर घोषणा आपल्या जाहीरनाम्यात दिल्याप्रमाणे सरकारला याची जाणीव करून देण्यासाठी येत्या तीन व चार सप्टेंबर रोजी शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची व्यापक तयारी करण्यासाठी अधिवेशन घेण्यात आले आहे असल्याचे माहिती बोराडे यांनी सांगितले शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी या मागणीसाठी आम्ही कर्जदार शेतकरी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक १ जून 2023 पासून 823 दिवसापासून आंदोलन सुरू आहे अनेक वेळा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,अर्थमंत्री ,सहकार मंत्री, आदिवासी विकास मंत्री नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार सर्व मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आलेले आहेत मात्र राज्य शासनाने याकडे लक्ष दिले नाही म्हणून आम्ही दिनांक १ जून 2023 पासून 823 दिवसापासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ,,(सिव्हिल हॉस्पिटल) समोर धरणे आंदोलन धरून बसलेला आहोत नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीचे कर्ज वसुली करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे व जिल्हा बँकेच्या व विकास सहकारी संस्थेचे नाव शेतकऱ्यांच्या सातबारा खाते उतारा लावले जात आहे ते तात्काळ बंद करावे व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज मुक्ती द्यावी यासाठी दिनांक 3 सप्टेंबर व ४ सप्टेंबर रोजी ओझर येथे जनशांती धाम शांतिगिरी महाराज आश्रम ओझर १०मैल येथे अधिवेशन भरविण्यात येणार आहे यासाठी खालील वक्ते व उपस्थित राहणार आहेत शिवराम पाटील जळगाव ,सतीश देशमुख पुणे, श्रीकांतराव अमरावती रावसाहेब ऐतवाडे सांगली ,नारायण विभूती वाशिम, स्वामी ईलाजेलीयन मुंबई ,निंबाजी डोईफोडे शिंदखेजराजा ,धनंजय पाटील काकडे अमरावती ,बाळासाहेब रास्ते सांगली, श्याम अष्टेकर नाशिक ,संजय मालोकर अकोला ,विठ्ठल राजे पवार पुणे ,चंद्रकांत देशमुख नागपूर ,सुधाकर मोगल नाशिक, अक्षय महाराज आहेर नाशिक कार्यक्रमाचे उद्घाटक महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज ,कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प रामकृष्ण महाराज लहवीतकर उपस्थित राहणार आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे अशी विनंती शेतकरी आंदोलकांनी केलेली आहे.