• 669
  • 1 minute read

तुलना : राष्ट्रप्रेमी उद्योजक बजाज परिवार आणि व्यापारी रामदेव बाबा !

तुलना : राष्ट्रप्रेमी उद्योजक बजाज परिवार आणि व्यापारी रामदेव बाबा !

बऱ्याचं ठिकाणी रामदेव बाबा या भोंदू व्यापाऱ्याची तुलना राष्ट्रप्रेमी आणि प्रसिद्ध उद्योजक बजाज परिवार यांच्या सोबत केलेली वाचण्यात आली.
अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून 1991 ते 2000,दहा वर्ष वीडियोकॉन मध्ये सर्विस करताना माझे बरेच मित्र बजाज कंपनी मध्ये असल्यामुळे बजाज ग्रुप विषयी चर्चा होत असे म्हणून ही तुलना मनाला कुठेचं पटली नाही.
म्हणून मी या विषयी थोडेफार लिहिण्याचे ठरवले !!.
बजाज कडे स्वतःची R & D करणारी अद्ययावत यंत्रणा,Endurance test करण्यासाठी लागणारी वेगवेगळी instrments,मेटल पार्ट्स तयार करण्यासाठी लागणारी हजारों लेथ मशीन्स,Components चेक करण्यासाठी लागणारी jigs & fixtures,computerised moulding shops,Assembling करण्यासाठी Pneumatic tools & Screw Drivers,फिनिश्ड प्रोडक्ट चेक करण्यासाठी अद्ययावत electronic equipments असलेली testing रूम्स,हजारो Small scale Suppliers आणि ईतरही शंभरच्या वर टेस्टिंग Facilities आहेत म्हणून बजाज चे प्रोडक्ट त्या तत्कालीन काळात Quality मध्ये ईतर कंपनी पेक्षा उच्च स्तराचेचं होते.
रामदेव बाबा कडे बजाज सारखी यंत्रणा,स्वतःच्या लाखो (त्यांच्या सेल क्वांटिटी नुसार मी लाखो म्हणतोयं) गाईं व म्हशी नाहीयेत.
गाई व म्हशी नाहीयेत म्हणून ते ईतर लोकांकडून पैकिंग करून पतंजली च्या नावाने बाजारात विकतात !!.
मी औरंगाबाद वीडियोकॉन कंपनीत असताना पाहिलेले राहुल बजाज असोतं की आत्ताचे बजाज चे मैनेजिंग डायरेक्टर असलेले राजीव बजाज असोत,सरकारचा 1 रुपयाही कर न बुडवता काम करा जेणेकरून सरकारचा ऐकही अधिकारी आपल्याकडे चुकुनही बोट दाखवता कामा नये असा आदेश संपूर्ण यंत्रणेला देवून आपले काम ईमानदारीने करणारी राष्ट्राच्या विकासाला हातभार लावणारी राष्ट्रप्रेमी लोकं आहेत.
बजाज परिवार कुठल्याही सरकारचे शर्मिंदे आणि लाचार नाहीयेत म्हणूनचं 5 वर्षापूर्वी राहुल बजाज आणि 4 वर्षापूर्वी राजीव बजाज यांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात आणि दडपशाहीच्या विरोधात स्पष्टपणे,सडेतोड आणि सणसणीत बोलण्याची हिंमत करू शकतात जी आजपर्यंत (अंबानी,अदानी सोडा) कूणीही करू शकलेले नाहीये.
आणि काँग्रेसच्या काळात रामदेव बाबा पंजाबी ड्रेस घालून पळ काढणारा पळपुटा आणि या सरकारच्या फेवर मध्ये बोलून आपला उल्लू सीधा करून घेणारा,राष्ट्रवादाच्या आड़ आपली कामे उरकून घेणारा,आपले हजारो कोटीचे लोन माफ करून घेणारा,सरकारतर्फे बेभाव जमीनी विकत घेणारा आधुनिक भामटा व्यापारी आहे.
ओतपोत राष्ट्रप्रेमाचा DNA असलेले बजाज परिवार आणि भामट्या रामदेव बाबा यांची तुलनाचं होवू शकत नाही.
असो !!
– Radheshyam Baldawa

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *