• 51
  • 1 minute read

तो सध्या काय करतो…?

तो सध्या काय करतो…?

हे काय विचारणं झालं…!
तो फ़ुल्ल्लल्ल बिझी असतो…

सकाळी नऊला उठतो, कडक पाण्यानी आंघोळ करतो देव्हार्यातल्या देवांच्या पाया पडतो, हातात तांब्याचं कडं घालतो , कडक ओपन शर्ट आणी मळकी जीन घालतो घरातला नाष्टा त्याला चालत नाय. त्याला चौकातल्या अन्नाची मिसळ लागती.
ईकडुन १०० ची नोट घेतो, येवढ्यात काय होनार? आजुन एका नोटेसाठी हुज्जत घालतो , गाडीत ५० च पॕट्रोल टाकतो. मग थाटात एक पौष्टिक तर्रीवाली मिसळ चार पाव खातो. मग चौकात येऊन गन्या,आंड्या,र्हावल्याला फोन लावतो. ते आल्यावर भाऊंच्या आॕफीसमधे जाऊन पेपर मधल्या कालच्या टोळी राड्याच्या, राॕबरीच्या , देशातल्या कुठल्याशा भागातल्या हिंदू मुस्लीम दंग्याच्या, बलात्काराच्या बातम्या वाचतो.
भाऊच्या भागातल्या लोकांची आधारकार्ड,दवाखाना चिठ्ठीची कामं करतो, इकडं तिकडं टाइमपास करुन दुपारी जेवायला घरी येतो. त्या घरच्या भाज्या आवडत नाय…मग चिडचीड करतो… पंखा लाऊन छान ताणुन देतो… आई बाप आणी लग्नाची तरुण बहीण कामाला गेलेले असतात. हा निवांत असतो. चार वाजता उठुन आवरुन परत चौकात त्या आयटमची वाट पहात उभा रहातो, तोवर आंड्या र्हावल्या गन्या आलेलेच असतात.शाळेच्या वर्गातली मृण्मई ग्रॕज्युएशन संपवुन कुठल्यातरी कंपनीत नोकरीला लागलेली असते. १०/१२ वी त गणित इंग्लीश मधे गचकल्यावर याने शिक्षणाकडे कायमची पाठचं फिरवलेली असते, संध्याकाळी पक्षाच्या “पाडवा “,”दसरा”, मेळाव्याच्या तयारित व्यस्त होतो, झेंड्याची मोजणी आणी ठिकाणांच्या जागा ठरवतो, मेळाव्यात ” ए आव्वाज कुणाच्चा ” अशी गगनभेदी घोषणा घोकतो.मंडळात IPL च्या मॕचवर काॕटरच्या पैजा लावतो .रात्री भुर्जीच्या गाडीवर काॕटर, बाॕइल, भुर्जीची शाही पार्टी झोडतो. उशिरा गपचुप दार उघडुन घरात आल्यावर आई फादरनी जाब विचारलाच तर थेट धाऊन जातो अंगावर, गावाकडची जमिन कधी विकणार?
मला कॕब घ्यायचीय टुरिस्टच्या धंद्याला,आमच्या साठी काय केलं तुमी,?असा प्रश्न विचारून त्यांच्याशी हमरीतुमरी करतो, बहीणीच्या पर्समधे हात घालुन मिळेल ती नोट खिशात घालतो. आणी बेडवर बिनघोर झोपुन जातो.
दोस्ती खातर अंगावर केस घेतो, पोलीस चौकी न कोर्टाच्या चकरा मारतो. तो” दोस्तीच्या दुनियेतला राजा “असतो ! वाढदिवसाच्या फ्लेक्सवरच्या १०/१२ जणांसोबत झळकतो. कोविड काळात हा गरजुंच्या घरी भाऊंनी पाठवलेली किट वाटतो. स्वतः च्या घरासाठी असलं काही घेण त्याच्या इज्जतीत बसत नाय..कधीतरी ओला उबेरवर बदली ड्रायव्हींग करतो…आणी सगळेच उपाय संपल्यावर,भाऊचे इलेक्शन सुरुच होत आहे.सध्या तो भाऊ दादा ला निवडणूकीचे तिकीट मिळवण्याच्या शक्ती प्रदर्शनात असतो.नंतर भाऊचेलोकसभेचे इलेक्शन कसे लढवायचे?
काय काय तयारी करायची?
ह्याच्या नियोजनात बिझी आहे…

अधूनमधून हा झुमॕटो, स्वीगीची पार्सलं पोचवतो, तोवर हा ३० पार झालेला असतो किडनीचा विकार जडलेला असतो . याच्या तारुण्याचा जोश संपून तो अगतीक आयुष्य ढकलत असतो.

तो सध्या असाच असतो…!!

0Shares

Related post

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा दादरमध्ये निषेध मोर्चा.         जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड…
धर्म पुछ्कर हत्या करने का संघी और मोदी अजेंडा आतंकीयो ने कैसे अपनाया…?

धर्म पुछ्कर हत्या करने का संघी और मोदी अजेंडा आतंकीयो ने कैसे अपनाया…?

देश के मातम के माहोल को संघ और मोदी सरकार जिम्मेदार…!        पुलवामा के…
वाचीत जावे, समजून घ्यावे, शहाणे करावें सकल जन…

वाचीत जावे, समजून घ्यावे, शहाणे करावें सकल जन…

वाचीत जावे, समजून घ्यावे, शहाणे करावें सकल जन… मला लहानपणापासूनच पुस्तकांची प्रचंड आवड. वडिलांनी घरात एका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *