- 57
- 1 minute read
दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी जागतिक मच्छर दिन साजरा केला जातो.
जागतिक मच्छर दिवस काही साजरा करण्यासारखा दिवस नाही पण हा दिवस साजरा केला जातो.
20 ऑगस्ट हा जगभरात ‘जागतिक मच्छर दिन’ म्हणजेच ‘जागतिक डास दिन’ म्हणून साजरा केला जातो. हे छोटे दिसणारे डास सामान्य वाटत असले तरी, त्यांच्या चाव्याने डेंग्यू, मलेरिया, झिका तसेच चिकुनगुनियासारखे गंभीर प्राणघातक आजार कारणीभूत ठरतात. डासांमुळे होणाऱ्या या आजारांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आज जागतिक स्तरावर साजरा होत असलेल्या या दिवशी विविध शिबिर आणि आरोग्य सेवा पुरविल्या जातात. तर या दिवसाच्या निमित्ताने जाणून घ्या त्याची सुरुवात कशी झाली? आणि त्याच्या इतिहासाबद्दल सविस्तर.
आपल्या आजूबाजूला अनेकप्रकारचे कीटक आपण पाहतो. यामधील काही कीटक माणसांच्या संपर्कात येतात, आणि त्यांच्या चाव्याने अनेक रोगराई तसेच साथीचे आजार पसरवतात. त्यामुळेच तर आकाराने छोटे असणारे हे डास किती मोठा संहार करू शकतात हे नवीन सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच डासांपासून स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आणि सर्वेक्षण जागतिक मच्छर दिनाच्या निमित्ताने आयोजित केले जातात.
जागतिक मच्छर दिनाचा इतिहास…
हा दिवस साजरा करण्याची सुरुवात लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनने 1930 साली केली होती. खरं तर, ब्रिटिश डॉक्टर रोनाल्ड रॉस यांनी 1897 मध्ये 20 ऑगस्ट रोजी मादी ॲनोफिलीस डासाचा शोध लावला. हाच डास मलेरियाच्या धोकादायक आजारासाठी जबाबदार आहे. त्यांच्या या शोधासाठी त्यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिकही देण्यात आले.
जागतिक मच्छर दिनाचे महत्त्व…
डास हा जगातील सर्वात धोकादायक कीटकांपैकी एक आहे. त्यांच्या चाव्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका विषाणू आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. काळजी न घेतल्यास हे आजार जीवघेणेही ठरू शकतात. डासांमुळे होणा-या आजारांमुळे जगात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. एका अहवालानुसार 2010 साली आफ्रिकेत सर्वाधिक मृत्यू हे डासांच्या चावण्यामुळे झाले होते. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना या धोकादायक आजारांबद्दल जागरूक करणे आणि डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे मार्ग सांगणे हा आहे.
दरवर्षी अंदाजे तरी, मच्छरांमुळे 4,35,000 लोक मलेरियामुळे मरतात. इतकेच नाही तर जगभरात दरवर्षी मलेरियाचे अंदाजे 219 दशलक्ष प्रकरणे असल्याचे मानले जाते. मलेरिया 100 पेक्षा जास्त देशांमध्ये आढळतो.
आजच्या घटकेला, माणसाच्या आरोग्याचा खरा शत्रू ‘डास’च (mosquito day) आहे. झिका, मलेरिया, डेंगी, हत्तीपायासारख्या आजारांचा वाहक असलेल्या डासांचे समूळ उच्चाटन शक्य नाही. मात्र, डासांपासून निर्माण होणाऱ्या रोगांचा सामना करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची औषधे आणि आरोग्यविषयक उपकरणांची बाजारपेठ निर्माण झाली आहे.
डासांमुळे होणाऱ्या आजारांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी घर आणि भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कचरा साठणार नाही, कुठेही पाणी साठणार नाही तसेच एखाद्या कामासाठी पाणी साठवले असल्यास ते व्यवस्थित झाकून ठेवले आणि त्यात डासांची पैदास होणार नाही याची खबरदारी घेतली तर डासांमुळे होणारे अनेक आजार टाळणे शक्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. जलस्त्रोतांच्या ठिकाणी डासांची पैदास होऊ नये म्हणून वेळोवेळी हे पाणी स्वच्छ करावे तसेच त्या पाण्यात मर्यादीत गप्पी मासे सोडावे, असेही सल्ले तज्ज्ञ देतात.
आजही जगात डासांमुळे होणाऱ्या आजारांनी मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. विशेष म्हणजे जगातील घातक प्राण्यांविषयी केलेल्या एका सर्वेक्षणात आजारांमुळे डासांविषयी लोकांच्या मनात प्रचंड भीती असल्याचे स्पष्ट दिसून आले. याच कारणामुळे दरवर्षी जागतिक डास दिन साजरा केला जातो. या दिवशी डासांमुळे होणाऱ्या आजारांविषयी जनजागृती केली जाते.
जगात दरवर्षी दोन अब्जांपेक्षा जास्त नागरिकांना मलेरियाचे बाधा होते. भारतातही दरवर्षी डेंग्यू, मलेरिया या डासांमुळे आजारांनी अनेकांची तब्येत बिघडते. यामुळेच डासांमुळे होणाऱ्या आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक डास दिनाला प्रचंड महत्त्व आले आहे.
डासांपासून स्वत:चा बचाव कसा कराल..?
डासांमुळे पसरणारे रोग टाळण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाय करणे महत्त्वाचे आहे. जाणून घ्या काही टिप्स आहेत
1. डासांपासून बचाव करण्यासाठी डास पळवणारी क्रीम त्वचेवर लावा.
2. संरक्षणात्मक कपडे घाला : डास चावणे कमी करण्यासाठी तुम्ही लांब बाहीचे टॉप, पँट आणि मोजे यांनी शरीर झाकून घेऊ शकता.
3. साचलेले पाणी काढून टाका : साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते, त्यामुळे बादल्या, फ्लॉवर पॉट्स किंवा कोणत्याही कंटेनरमध्ये साचलेले पाणी रिकामे करा.
4. बेड नेट वापरा : झोपताना, डास चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मॉक्स्क्यूटो नेट वापरा, विशेषत: मलेरियाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात ही नेट आवर्जून वापरावी.
5. पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी डास सर्वात जास्त सक्रिय असतात, त्यामुळे या काळात घरातच राहण्याचा प्रयत्न करा.
लक्षात ठेवा, डासांपासून होणा-या रोगांचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधच महत्वाचा ठरतो. सतर्क राहा आणि स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे डासांपासून संरक्षण करा.
जागतिक डास दिनाची थीम…
2025…
अधिक समतापूर्ण जगासाठी मलेरिया विरुद्धच्या लढाईला गती देणे.
जागतिक डास दिनानिमित्त शुभेच्छा..!🦟🦟🦟🙏🌹