• 46
  • 1 minute read

दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन भाजपचे अश्रित विद्रोहीचा आरोप !!!

दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन भाजपचे अश्रित विद्रोहीचा आरोप !!!

आधी राजकीय बनलेल्या अखिल भारतीय चे आता शासकीय आणि पक्षीय संमेलनात रूपांतर विद्रोहीचा घणाघात !!!

विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फ १९९९ पासून अखिल भारतीय ब्राह्मणी भांडवली पुरुष सत्ताक मराठी साहित्य संमेलनाच्या विरोधात विद्रोही साहित्य संमेलने आयोजित करण्यात येतात. महात्मा फुले यांच्या साहित्य संस्कृती विषयक भूमिकेवर आधारित या विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मणी मराठी साहित्य संमेलनाच्या समोर त्याच दिवशी त्याच तारखांना व अनेकदा समोरासमोर करण्यात येते. नाशिक उदगीर, वर्धा व अमळनेर या ठिकाणी कोट्यावधींचा खर्च करूनही मंडपातील रिकाम्या खुच्यांमुळे खजील झालेले अखिल भारतीय ब्राह्मणी मराठी साहित्य संमेलन आता दिल्लीधरांच्या आश्रयाला गेलेआहे. विद्रोही साहित्य संमेलन मात्र मराठी मातीत पाय रोवून विषमतावादी शोषक संस्कृतीच्या विरोधात फुले शाहू अबिडकरी भूमिका घेऊन खंबीरपणे लढत आहे म्हणूनच १९ ते अ. भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद येथील आमखास मैदानात मलिक अंबर नगरीत २१,२२व२३ फेब्रुवारी रोजी संपन होत आहे. त्या संदर्भात भूमिका व संमेलनाची कार्यक्रम पत्रिका अध्यक्ष व उद्‌घाटक इत्यादी आज जाहीर करण्यात आले. सत्यशोधक समाजाचे १५१ वर्ष भारतीय प्रजासत्ताकाचे ७५ वर्ष यानिमित्ताने होणान्या एकोणिसाव्या विद्रोही मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी नराठीतील लोकसाहित्य संकृती व प्राच्यविद्या अभ्यासक, इतिहास संशोधक, भाषा तज्ञ, विचारवंत हों अशोक राणा यांची तर उद्‌घाटक पदी ख्यातनाम अंआंबेडकरवादी हिंदी साहित्यिक समीक्षक, अनुवादक, विचारवंत कंवल भारती (दिल्ली) यांची निवड आज पत्रकार परिषदेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष इंजि. सतीश चकोर व मुख्य निमंत्रक एडवोकेट धनंजय बोरडे यांनी घोषित केली.
१९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची तीन दिवसीय कार्यक्रमांची भरगच्च कार्यक्रम पत्रिका आहे.

छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे आम खास मैदानावर उभारलेल्या मलिक अंबर साहित्य नगरीत २ भव्य सभा मंडप असून ३ दालनांमध्ये बालमंच, युवा मंच यासह एकूण ४ विचार मंचावर विद्रोही चे विविध कार्यक्रम बहरणार आहेत. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला व बिस्मिल्ला या दोन नाटकांसह पुढील दोन दिवसांमध्ये विद्रोहीत ६ परिसंवाद, १४ गटचर्चा १ विशेष व्याख्यान होईल. ४ काव्य संमेलने व १ काव्य पहाट मैफिल, १ गझल संमेलन असेल. २ सत्रात साहित्यिक, विचारवंत, पत्रकारांशी साहित्य संदाद होईल. सांस्कृतिक व कला प्रकारात आदिवासी गाणी कला दर्शन, लोककलांचे सादरीकरण व महाराष्ट्र दर्शन इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे, कथाकथनांच्या कार्यक्रमासह २ नाट्धवाचन ३ एकपात्री प्रयोगासह २ एकांकिकेचे सादरीकरण या मंचावर होणार आहे. युवा रैंप कलाकारांचे रॅप गीतांचे सादरीकरण लक्षवेधी ठरेल.

खास मंडपातील ८ कला दालनात चित्रकाव्य शिल्पकला, तुलेखन, चित्रकला, कलात्मक फलकलेखन, रांगोळी, व्यंगचित्र अशा ८ कला प्रकारांचे लाईव्ह सादरीकरण व प्रदर्शन होईल, संविधान आणि स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान या विषयावरील २ पोस्टर प्रदर्शन भरवण्यात येईल..

महाराष्ट्रातील कथा, कविता, नाटक, ललित इत्यादी साहित्य प्रकारातील २०० हून अधिक निमंत्रित साहित्यिक उपस्थित राहणार असून २१ जिल्ह्यातील ७५ लोकशाहीवादी विचारवंत, अभ्यासक, १० कथाकथनकार आणि ४ इतिहासकार, १५ गजल कार, यांसह ३५ नाट्य व सिनेमालिका अभिनेते, एकपात्री नाटककार, एकांकिका नाट्यछटाकार, १२३ निमंत्रित कठी साहित्य नगरीत आपल्या विविध कार्यक्रमाच्या सहभागातून साहित्य प्रेर्मीसाठी मेजवानी घेऊन येतील.

महाराष्ट्रातील वारकरी, महानुभाव, लिंगायत, बौद्ध, आदिधर्न इत्यादी पाच धर्मपीठांचे प्रमुख प्रतिनिधी, २७० लोककलाकारांसह १५ गायक शाहीर, भीमगीतकार, रैंप कलाप्रकारातील ७ युवा कलाकार, बोलीभाषांचे २० अभ्यासक, ७ नामवंत पत्रकार आणि विद्रोहाच्या लेखणीची तोफ तयार करणारे चित्रकार राआनंद सुरडकर व शिल्पकार विकास सरवदे कलाकारासह ७ शिल्पकार, १ व्यंगचित्रकार, यांसह २ चित्रकाव्य कर्ते, ५ चित्रकार, ४ पोस्टर प्रदर्शनकार, २ सुलेखनकार, २ फलक लेखन कार आपले योगदान देवून साहित्य चळवळीचा जागर यशस्वी करणार आहे.

संमेलनात माजी संमेलनाध्यक्ष डॉ प्रतिभा अहिरे हॉप्रल्हाद लुलेकर डॉ वासुदेव मुलाटे गणेश विसपुते मार्गदर्शन करणार आहेत तसेच १) भारतीय जाती व पुरुषप्रधान विषमतेला धर्म आणि संस्कृतीच्या आधारे दूर करता येणे शक्य आहे, २) बोलीभाषा, प्रमाणभाषा, अभिजात भाषा आणि सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण, अन्तोशल मीडिया अन्यायाविरुद्ध लढण्याचे साधन ? ४) अंधकारमय काळात नवे विषय नवी आव्हाने नते लेखन साहित्यिकांशी संवाद ५) इतिहासाचे विकृतीकरण तिरुद्ध सत्य इतिहास कथन या पाच विषयांवरील परिसंवाद होणार. अरविंद सुरवाडे, प्रा. मोहन बाबुळगावकर, प्रभू राजगडकर धर्म कीर्ती महाराज परभणीकर, कोरनेश्वर आप्पाजी, डॉ तंदना महाजन, डॉ देवेंद्र इंगळे, डॉ दिलीप चव्हाण, डॉ, लीलाधर पाटील, डॉक्टर पी टी गायकवाड, डॉअशोक नरनवरे, डॉ शिवाजी उसे, संध्या नरे पवार एडवोकेट वैशाली डोळस, प्राचार्य संजय मुन प्रा हटकर कोडवा, सुनीता भोसले, शाहू पाटोळे, छाया बेले, डॉ मारुती कसाब, आशा डांगे, डॉ. नवनाथ गोरे हे मान्यठर सहभागी होणार आहेत

१९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात मराठी साहित्यिक, नाट्य कलावंत, लोककलावंत कठी, नाटककार, ललित लेखक, १०,००० दहा हजार हून अधिक रसिक फुले शाहू आंबेडकरी, अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी, कामगार व विद्यार्थी चळवळीतील तसेच आदिवासी क्षेत्रात काम करणारे संविधानिक मूल्यांसाठी लढणारे कार्यकर्ते यांचेसह सहभागी होणार आहेत असे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष इंजिनीयर सतीश चकोर व मुख्य निमंत्रक एडवोकेट धनंजय बोर्ड यांनी जाहीर केले.

0Shares

Related post

मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना मृत्यदंड…?

मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना…

       मालेगाव बॉम्बस्फोट नुसती एका स्फोटाची घटना नाही, तर देशातील २० कोटी जनतेला देशविरोधी…
अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!      …
निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा दादरमध्ये निषेध मोर्चा.         जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *