• 25
  • 1 minute read

“देव नाही-दैव नाही,नशीब सारं खोट्टं। माणसाचं माणूसपण,आभाळाहुन मोठ्ठं।।

“देव नाही-दैव नाही,नशीब सारं खोट्टं। माणसाचं माणूसपण,आभाळाहुन मोठ्ठं।।

धर्म ही व्यवस्था माणसांनी माणसांसाठी आखलेली नीतिनियमांची व्यवस्था असते.ती समाजावर अन्यायकारकरित्या न लादता मानवी समाजाचा विकास होण्यासाठी या धर्मव्यवस्था कालानुरुप परिवर्तनशील असणे आवश्यक असते.परंतु ह्या व्यवस्थेला अपौरुषेय-दैवी साखळदंड देवुन धर्मव्यवस्था माणसांवर लादली जाते.त्यावेळी तो धर्म माणसांसाठी न रहाता,माणसे धर्मासाठी असल्याचा दावा केला जातो.आणि तो धर्म,त्या धर्माचा ईश्वर,धर्मस्थळांना इतराच्या तश्याच देव,धर्म,धर्मस्थळांपासुन धोका असल्याच्या.तो धर्म वाचवण्यासाठी तश्याच दुसर्‍या धर्माच्या देव,धर्मस्थळांचाच नव्हे;तर माणसांच्याही कत्तली-संहाराचा विध्वंसक मार्ग अनुसरला जातो.
असाच अतिरेकी मार्ग एका धर्माच्या अतिरेक्यांनी ६डिसेंबर १९९२रोजी अनुसरला आणि त्या धर्मस्थळाचा विध्वंस केला.
त्यामुळे धर्म वाचवायसाठी त्याही धर्माचे अनुयायी रस्त्यावर उतरले.यांना धर्मस्थळ उध्वस्त करण्यासाठी जितक्या उत्साहाने कायदा-सुव्यवस्था-शासनसंस्थानी मदत केली होती.तितकीच उदासिनता त्यांनाही आवर घालण्यासाठी दाखवली.त्याला प्रत्युत्तर म्हणून तथाकथित हृदयसम्राटाने दिलेल्या आदेशाने याही धर्माच्या धर्मयोद्ध्यांनी रस्त्यावर उतरुन धर्मवेड्या अत्याचारांचा धूडगुस घातला.या अत्याचारांच्या सुडाची आग पेटली.त्यातुन १२मार्च१९९३ रोजी मुंबईत बाँबस्फोटांची विनाशकारी मालिका रचली गेली.
या धर्मवेड्यांच्या धर्मयुद्धात शेकडो निरपराधाचे बळी गेले.त्या बाँबस्फोटाच्या जखमा घेवुन आजही अनेकजण जगत आहेत.मरणारांच्या नातेवाईकांचे अश्रु दरवर्षी ओघळत असतात.
पण,धर्मयुद्धाच्या चिथावण्या देणारे आजही तितक्याच उत्साहाने धर्मयुद्धाच्या गर्जना-धर्माधिष्ठीत राष्र्टवादाच्या रणभेर्‍या वाजवत आहेत.धर्माच्या या छावण्याना एकमेकांविरुद्ध सज्ज करण्यासाठी आता तर सत्तेच्या सिंहासनावरुनच शासनसंस्थांनाही वेठीस धरले जात आहे.
धर्म वाचवण्यासाठीच्या या धर्मयुद्धापासुन मानवी समाजाचे रक्षण होणे गरजेचे नाही काय?
धर्मांपलीकडे जावुन माणसा माणसातले माणुसकीचे नाते वृद्धिंगत करणे गरजेचे नाही काय?
जर धर्म माणुसकी वृद्धिंगत करण्याऐवजी माणसाच्या विध्वंस आणि कत्तलीचा संदेश देत असेल;तर त्याला धर्म म्हणता येईल की अधर्म?;याचा विवेक माणसा माणसाच्या भेजात रुजणे.स्वातंत्र्यौत्तर धर्मयुद्धांतील बळी पडलेल्या निरपराधांना या पेक्षा दुसरी योग्य कोणती बरं आदरांजली असु शकेल?
धर्मांपलिकडे जावून माणसातले माणूसपण जागो;हेच या धर्मयुद्धातील बळी पडलेल्या निरपराधांना विनम्र अभिवादन….!
“देव नाही-दैव नाही,नशीब सारं खोट्टं।
माणसाचं माणूसपण,आभाळाहुन मोठ्ठं।।
देव-दैत्य-राक्षस,हे सारं खोट्टं।
माणसाचं माणूसपण,माणूसपण आभाळाहुन मोठ्ठं।।
जात-धर्म-पंथ,हे सारं खोट्टं।
माणसाचं माणूसपण, आभाळाहुन मोठ्ठं।।”
-जयवंत हिरे,
“क्रांतिकारी जनता”

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *