- 187
- 1 minute read
देशाला लुटणाऱ्या मोदींच्या उद्योगपती मित्राच्या घरचा शाही विवाह सोहळा म्हणजे देशाच्या लूटमारीचा आनंदोत्सवच…!
देशाला लुटणाऱ्या मोदींच्या उद्योगपती मित्राच्या घरचा शाही विवाह सोहळा म्हणजे देशाच्या लूटमारीचा आनंदोत्सवच…!
आमच्या जवळ पैसे नाहीत. सावकार व फायनान्सवाले धमकवतात. बँकवाले घरादारावर जप्ती आणतात. पतपेढीवाले शिव्या देतात. अशा परिस्थितीत न्याय कुणाकडे मागायचा. मोदी साहेब तुम्ही तर शेती मालाला भाव देत नाही, तुम्ही एकदमच निक्कमी आहात, असे पत्र लिहून पुण्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अशीच काही अवस्था असलेल्या देशभरातील 1,00, 474 शेतकऱ्यांनी 2014 ते 2022 या मोदींच्या 9 वर्षांच्या सत्ताकाळात आत्महत्या केल्या आहेत. शेत मजुरांच्या आत्महत्येचा आकडा पण याच आसपासचा आहे. या हत्या मोदींच्या सत्तेवरील कलंक आहेत.देशाचे पंतप्रधान व प्रमुख म्हणून मोदींच या आत्महत्यांना जबाबदार आहेत.गेल्या दहा वर्षात आपले उद्योगपती मित्र अदानी, अंबानी यांच्यासह काहींचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करणाऱ्या मोदींनी यातील केवळ एखादा 1 लाख कोटी देवून या शेतकरी व शेतमजूरांचे कर्ज माफ केले असते, तर या शेतकरी व शेतमजूरांचे जीव वाचले असते. पण ते त्यांनी केले नाही. त्यामुळे या अन्नदात्याचे मारेकरी हे संघ, भाजप व मोदीच आहेत.
बरं ज्या उद्योगपतींचे कर्ज मोदींने माफ केले आहे, ते काही स्वतः उभ्या केलेल्या कमाईतून दिलेले कर्ज नव्हते. आपल्या दहा वर्षांच्या सत्ता काळात मोदींने कमाईचे कुठलेच स्रोत उभे केले नाहीत. कुठले उद्योग उभारले नाहीत. उलट आहेत, ते ही विकले. बाप कमाईवर मजा मारणे यालाच म्हणतात. अन मजा मारणाऱ्यांना निक्कमा म्हणतात . मोदी तेच आहेत. हे साऱ्या देशाला माहित आहे. तरी ही आज यावर लिहिण्याची गरज वाटली, त्याचे कारण आहे. ते म्हणजे देशाला लुटणाऱ्या मोदींचे मित्र मुकेश अंबानी यांच्या पुत्राचा शाही विवाह सोहळा. अंबानीने व अदानीने उद्योग करून नाहीतर देशातील बँका अन अन मालमत्तेची लूट करून संपत्ती मिळविली आहे. या दोघांची लाखो कोटींची कर्ज मोदींने माफ केली असताना ही तितकेच कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे. बांद्रा बीकेसी येथील ज्या ” जियो केंद्रात हा विवाह सोहळा पार पडला त्या भूखंडाची एमएमआरडीएची ही 4381.5 कोटी इतकी थकबाकी अंबानीच्या मेसर्स रिलायन्स या कंपनीने थकविली आहे. इतकी थकबाकी असताना त्याच भूखंडावर शाही विवाह साजरा करून 5000 कोटींची उधळपट्टी करणाऱ्याला मूर्खच म्हटले पाहिजे. अन मुकेश अंबानीची गनती या मुर्खात झाली आहेच.
अन आपले थकबाकीदार थकबाकी न भरता आपल्याच डोळ्या देखत 5000 कोटींची उधळपट्टी करीत आहेत, हे उघड्या डोळ्यांनी पाहणारे एमएमआरडीचे प्रशासन ही अंबानीचे दलाल व मूर्ख ठरले आहे. हे प्रशासन जनतेसाठी आहे की, अंबानीसाठी हा प्रश्न या थकबाकी प्रकरण व शाही सोहळ्यावरून पडला आहे. अंबानी – अदानीच्या मदतीवर व पैशावर संघ, भाजप व मोदींचे राजकारण चालले आहे. त्यामुळे ते या उद्योगपतींचे गुलाम आहेत. पण प्रशासनाचे काय ? मोदी अडाणी आहे. शिकलेला नाही. पण प्रशासन तर आयएएस अधिकारी चालवत आहेत ना? ते ही गुलामी करीत आहेत. हे वेगळे सांगायची गरज नाही. या अशा प्रकरणात अनेकांचे उखळ पांढरे होते. टक्केवारी मिळते. कर्ज माफीतून टक्केवारी मिळविण्याची भ्रष्ट्राचाराची नविन युक्ती मोदींच्या सत्ताकाळात आली व ती अगदी खालपासून वरपर्यंत स्थिरस्थावर झालेली आहे. निरव मोदी प्रकरणानंतर या संदर्भातील चर्चा देश – विदेशात सुरु झाली होती व त्यातील टक्केवारी अगदी न्यायालयाच्या कामकाजात व पटलावर आली आहे. देश लुटणाऱ्यांना देशातून पळून जाण्यासाठी भाजपने भल्या मोठ्या रक्कमा घेतल्याचे आरोप झाले आहेत. सोयीनुसार हे आरोप खोटे असल्याचे सिद्ध करण्याचा खटाटोप व प्रयत्न भाजपला करावा लागत आहेच. अन यामुळे संघ व भाजपच्या चरित्र व चारित्र्यावर प्रश्न चिन्ह ही निर्माण होत आहे.
सन 214 व 2019 मध्ये मोदींकडे पूर्ण बहुमत होते. त्यामुळे ते मनमानी पद्धतीने सरकार चालवीत होते. धोरणे राबवित होते. कायदे करीत होते. अदानी, अंबानीच्या घशात सारा देश घालीत होते. देशातील शेतकऱ्यांना सातबारावरूनच बेदखल करण्याचा कार्यक्रम मोदींने तयार केला होता. त्यासाठी कृषि विधायके आणली. ज्यांची ओळख कृषि नव्हेतर ” काळे कायदे ” म्हणुन या देशात झाली आहे. अन हे कायदे आपल्या उद्योगपती मित्रांच्याच फायद्यासाठी आणले आहेत. आज ते स्थगित आहेत. रद्द झालेले नाहीत. अन मोदी सरकार आता बहुमतात नसल्यामुळे विरोधकांशी जुळवूनच मोदीला संसद चालवावी लागणार आहे. कायदे करावे लागणार आहेत. हे या देश लुटणाऱ्या उद्योगपतींना कळू लागल्याने अंबानीने आपल्या पुत्राच्या शाही विवाह सोहळ्याचा इव्हेंट करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना ही निमंत्रणे देवून सहभागी करुन घेतले आहे. ही अंबानी, अदानी व मोदींच्या संयुक्त विचारातून साकार झालेली कृती आहे. असे गेल्या दहा वर्षात एकदा ही घडले नाही. इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या रडारवर मोदी सोबत अदानी व अंबानी ही होते. हे उद्योगपती देश लुटत असल्याचा आरोप याच घटक पक्षांचे नेते करीत होते. पण त्याच लुटीतील पैसातून तयार करण्यात आलेल्या भोजनावर ताव मारताना , पंचतारांकित सुविधांचा लाभ घेताना, भेट वस्तू स्वीकारताना या नेत्यांना जरा ही लाज वाटली नाही. अगदी सहजरित्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने देश लुटणाऱ्या या उद्योगपतीशी संबंध प्रस्थापित करताना जरा ही संकोच न वाटणाऱ्या विरोधकांना मोदींचा पर्याय म्हणावे तरी कसे ? असा प्रश्न हे सर्व पाहिल्यावर पडल्या शिवाय राहत नाही.
मोदी संविधान व लोकशाही विरोधी आहेत. मोदी गरीबा विरोधी आहेत. मोदी धर्मांध आहेत, मोदी मुस्लिम विरोधी आहेत. अन हे विरोधी असल्याने मोदी जनविरोधी आहेत, हे देशातील जनतेला कळून चुकले आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीत ते दाखवून ही दिले आहे. आता हे डॅमेज कन्ट्रोल करण्याचा मोदींचा प्रयत्न राहणार आहे. ” 25 जून संविधान हत्या दिन ” जाहीर करून त्याची सुरुवात मोदींनी केली आहे. संसदेतील त्यांच्या भाषणातील रोख ही असाच होता. या शिवाय मोदी आपल्या दोन उद्योगपती मित्रांमुळे बदनाम झाले आहेत. हे दोन मित्र म्हणजे अंबानी व अदानी. आता या दोन उद्योगपतींच्या घशात मोदींने जे जे काही घातले आहे, ते वाचविण्यासाठी हे उद्योगपती इंडिया आघाडीशी जुळवून घेतील. तेव्हा हे उद्योगपती फक्त मोदीचेच मित्र नाहीत, तर इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांचे ही मित्र आहेत, हे जनतेला सांगण्याचा प्रयत्न होईल. त्यासाठी हा लग्न सोहळ्याचा इव्हेंट अगदी जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. या शाही विवाह सोहळ्याची सुरुवात तीन महिन्यापूर्वी गुजरात जामनगर येथून झाली तेव्हा या सोहळ्यात इंडिया आघाडीतील नेते सहभागी होतील, हे अशक्य वाटणारी गोष्ट होती. पण मोदी पूर्ण बहुमताने सत्तेवर आले नसल्याने या उद्योगपतींनी आता इंडिया आघाडीतील नेत्यांशी ही संबंध प्रस्थापित करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी या सोहळ्याचा वापर करण्यात आला आहे.
हा शाही विवाह सोहळा म्हणजे ‘ देशाच्या लूटमारीचा आनंदोत्सव सोहळा ‘ होता, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.देशातील बँका या उद्योगपतींनी लुटल्या आहेत, या बँकामधील पैसा देशातील जनतेचा आहे. तोच लुटला. याचा अर्थ सामान्य जनता, कामगार, किसान यांच्या कष्टाची लूटमार केली आहे. अन अशा सोहळ्यात इंडिया आघाडीतील डावे पक्ष, त्यांचे नेते, कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन व गांधी परिवार वगळता सर्वच राजकीय पक्षांचे नेते सहभागी होत असतील, लाखोंच्या भेटवस्तु स्विकारत असतील, शाही भोजनावर ताव मारीत असतील व पंचतारांकित सुविधांचा उपभोग घेत असतील, तर ते ही या लूटमारीत भागीदार आहेत. हे नक्की.
……………………………………
– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश.)