• 17
  • 1 minute read

धर्माच्या पलीकडे उभा असलेला गुरुनानक : माणुसकीचा जाहीरनामा

धर्माच्या पलीकडे उभा असलेला गुरुनानक : माणुसकीचा जाहीरनामा

धर्माच्या पलीकडे उभा असलेला गुरुनानक : माणुसकीचा जाहीरनामा

नानक या नावाचा अर्थ आहे, जो एकाग्र आहे, एक देव पाहतो आणि त्यावर विश्वास ठेवतो आणि द्वैत पाहत नाही. इतिहास साक्ष देतो की जेव्हा धर्म माणसांना जोडण्याऐवजी तोडू लागतो, जेव्हा ईश्वराचे नाव घेऊन माणसावर अन्याय होतो आणि जेव्हा सत्ता व अहंकार मानवतेवर कुरघोडी करतात—तेव्हाच गुरुनानक देवांसारखा महामानव जन्माला येतो. पंधराव्या शतकातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय अराजकतेत गुरुनानक देवांनी जे विचार मांडले, ते त्या काळासाठीच नव्हे तर आजच्या सत्ता, पाखंड आणि द्वेषाच्या काळासाठीही सत्ताधाऱ्यांना आणि धर्मठेकेदारांना अस्वस्थ करणारे आहेत. 1469 साली तलवंडी येथे जन्मलेल्या गुरुनानक देवांचे पहिलेच विधान “एक ओंकार” हे निव्वळ धार्मिक तत्त्वज्ञान नव्हते, तर तत्कालीन समाजरचनेवर केलेला थेट हल्ला होता. “ईश्वर एक आहे” ही श्रद्धा नाही, ही बंडखोरी आहे. जर ईश्वर एकच असेल, तर जात कशी? धर्म कसा? उच्च-नीचतेचा अधिकार कोणाला? गुरुनानकांनी प्रश्न विचारले; आणि प्रश्न विचारणे हीच खरी क्रांती असते.

आजही समाज प्रश्न विचारण्याऐवजी आंधळे अनुकरण करतो. गुरुनानकांनी मात्र कर्मकांड, तीर्थयात्रा, उपास-तापास आणि दिखाऊ भक्ती यांना निर्भीडपणे नाकारले. त्यांनी सांगितले—ईश्वर बाहेर शोधू नका, तो तुमच्या कृतीत आहे. प्रामाणिक श्रम, सत्य वागणूक आणि करुणा हाच खरा धर्म. गुरुनानक देवांच्या विचारांचा सर्वात मोठा धोका म्हणजे जात, धर्म आणि लिंगभेदावर गुरुनानकांचा थेट वार ते विषमतेच्या मुळावर घाव घालतात. “जिच्यापासून राजा जन्माला येतो, तिला कमी लेखायचे कसे?” असा प्रश्न त्यांनी स्त्रीविषयक मानसिकतेला विचारला. पंधराव्या शतकात स्त्रीसमतेची अशी ठाम भूमिका घेणे म्हणजे सामाजिक बंडच होते.

आजही स्त्री, दलित, अल्पसंख्याक यांच्याविषयी बोलताना समाज गप्प बसतो. गुरुनानक मात्र गप्प बसले नाहीत. त्यांनी धर्माच्या नावावर चालणारी माणसामाणसातील दरी ठामपणे नाकारली. म्हणूनच गुरुनानक हे केवळ शीख धर्माचे संस्थापक नसून समतेच्या विचारांचे जागतिक प्रवर्तक आहेत. गुरुनानक देवांनी भारतभरच नव्हे तर मध्य आशिया, अरब देशांपर्यंत प्रवास केला. उदासी यात्रांमधून संवाद, संघर्ष आणि समन्वय, हिंदू-मुस्लिम संवाद साधला, मौलवींना प्रश्न विचारले, पंडितांच्या पाखंडाला आव्हान दिले. त्यांनी कुठेही तलवार उचलली नाही, पण शब्दांनी सत्ता हादरवली. आज जे संवादाच्या नावावर द्वेष पसरवले जातात, त्याच्या नेमक्या उलट गुरुनानकांचा मार्ग होता—संवादातून समन्वय.

गुरुनानक देवांची लंगर परंपरा ही भूक भागवणारी नाही, व्यवस्था बदलणारी क्रांती जगातील सर्वांत मोठी आणि शांत सामाजिक क्रांती आहे. एकाच पंक्तीत बसून राजा आणि रंक, सवर्ण आणि दलित, हिंदू आणि मुसलमान जेवतात—याहून मोठा समतेचा धडा कोणता? आजही गुरुद्वाऱ्यातील लंगर हा मानवतेचा जिवंत घोष आहे. आजच्या काळात जेव्हा गरीबांसाठी योजना फक्त कागदावर असतात, तेव्हा लंगर कृतीतून बोलतो. गुरुनानकांनी केवळ भाषण दिले नाही; त्यांनी व्यवस्था उभी केली. आज गुरुनानक असते तर, आजचा समाज धर्मांधतेने ग्रासलेला आहे. धर्म म्हणजे श्रद्धा न राहता राजकारण झाले आहे. देवाच्या नावावर दंगली, द्वेष, बहिष्कार होत आहेत. अशा काळात गुरुनानक देव असते तर त्यांनी स्पष्ट सांगितले असते—धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही.

गुरुनानक यांनी अनेक ठिकाणी संगत (धर्मशाळा) आणि पंगत (लंगर) सुरुवात केली. आजही संगत व पंगत मुळे गुरुनानकांचे अनुयायी प्रत्येक दिवशी एकत्र येतात आणि सबद-किर्तन करतात नानकदेव आपल्या गुरवाणीत म्हणतात की, ‘नानक उत्तम निच न कोई’ आपण ईश्वराच्या नजरेत सर्व समान आहोत कारण मानव जात एक आहे. तो खालच्या जातीचा, मी उच्च जातीचा हा भेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जात-पात नष्ट करण्यासाठी त्यांनी जो गुरु (लंगर) चा निशुल्क पायंडा पाडला तो वाखण्याजोगा आहे. आम्ही सर्व ईश्वरांची लेकरे आहोत हा अविभाव त्यांनी (लंगर) च्या रुपाने मग तो गरीब असो की श्रीमंत त्यांनी एकाच पंगतीमध्ये बसण्यास सर्वांना भाग पाडले. आजही ही प्रथा अखंड पणे गुरुद्वारामध्ये राबविली जाते या पासुन प्रत्येक मानवाने बोध घेतला पाहिजे. गुरूनानक यांनी कधीही ‘देवांच्या ट्रिनिटी’ वर विश्वास ठेवला नाही किंवा देव मानवी स्वरूपात जन्माला येऊ शकतो यावर विश्वास ठेवला नाही. शीख धर्मात त्यांनी हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचा मेळ साधण्याचा प्रयत्न केला. अंधश्रद्धा, जातीभेद, कर्मकांड यावर त्यांचा कधीच विश्वास नव्हता. त्यांचे शब्द श्री गुरु ग्रंथ साहिब, पवित्र शास्त्रात समाविष्ट आहेत.

आज गुरुनानकांचे विचार सत्तेला अस्वस्थ करतात, कारण ते प्रश्न विचारायला शिकवतात. ते अंधश्रद्धेला आव्हान देतात. ते श्रमाला प्रतिष्ठा देतात. म्हणूनच गुरुनानक देव केवळ जयंतीपुरते स्मरणात ठेवण्याचे नव्हेत; ते रोजच्या आचरणात उतरवण्याचे आहेत. गुरुनानक देव हे इतिहासात अडकलेले संत नाहीत. ते वर्तमानाला आरसा दाखवणारे आणि भविष्याचा मार्ग दाखवणारे विचारवंत आहेत. आज जर समाजात शांतता, समता आणि बंधुता हवी असेल, तर गुरुनानकांचा विचार स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. गुरुनानक जयंती म्हणजे फक्त प्रकाशोत्सव नव्हे; ती आत्मपरीक्षणाची संधी आहे. आपण माणूस म्हणून किती प्रामाणिक आहोत, हे तपासण्याची संधी.

शीख एक देव, निर्माता आणि सर्व मानवजातीच्या समानतेवर विश्वास ठेवतात. गुरूनानक यांनी शिखांना कौटुंबिक जीवन जगायला शिकवले आणि तीन पटीचे बोधवाक्य पाळले ज्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनात आणि त्यामध्ये देवाशी जोडण्यास मदत झाली: नाम जपो – प्रार्थना करा आणि देवाचे स्मरण करा. किरत करो – प्रामाणिक जीवन जगा. देशातील जेवढे संत होऊन गेलेत त्यांनी तथागत भगवान बुध्दांनी सांगीतलेल्या मार्गाचा अवलंब केल्याचे आम्हाला आढळून येईल. कोणताही संत बघा, कित्येक वर्षापूवी तथागतांनी सांगीतलेल्या उपदेशाचा प्रचार या देशातील संतानी आपापल्या परिने केले हे नाकारुन चालणार नाही. भारतीय अध्यात्मिक शिक्षक जे शीख धर्माचे पहिले गुरू गुरुनानक होते, एकेश्वरवादी धर्म हिंदू आणि मुस्लिम प्रभाव एकत्र करतो. अशा सत्याचा मार्ग दाखविणाऱ्या महान सतिगुरु श्री गुरुनानकदेवजींचा जन्म कार्तिक पौर्णिमा आणि गुरुनानक जयंती दिनी 15 एप्रिल 1469 ला श्री नानकाना साहिब येथे आई तृप्ता देवी आणि वडील कालू खत्री यांच्या घरी झाला. ज्याला गुरुनानकचा प्रकाश उत्सव आणि गुरुनानकदेवजी जयंती असेही म्हणतात. एकता, श्रध्दा आणि प्रेमाचा संदेश देणारे शिख धर्माचे संस्थापक गुरुनानकददेव यांच्या जयंती निमित्त त्यांना शत: शत प्रणाम !

वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह।

सर्व शीख बांधवाना गुरुनानक जयंती च्या खूप खूप शुभेच्छा ! 

प्रविण बागडे

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *