• 104
  • 1 minute read

धुळे जिल्हा वकील संघाचे सदस्य अमोलदादा सावंत यांची महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड,धुळे जिल्हा वकील संघाकडून सत्कार

धुळे जिल्हा वकील संघाचे सदस्य अमोलदादा सावंत यांची महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड,धुळे जिल्हा वकील संघाकडून सत्कार

धुळे दि.१०(यूबीजी विमर्श-संहिता)
धुळे जिल्हा वकील संघाचे सन्माननीय सदस्य, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सक्रिय सदस्य, तसेच संपूर्ण महाराष्ट्र व गोवा वकील संघात लाडके, ज्युनिअर वकिलांचे मार्गदर्शक, नेहमी वकिलांच्या अडचणींना तत्परतेने धावून जाणारे, प्रभावी नेतृत्वगुण व समयसूचकता असलेले, हसमुख व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले ॲड. अमोलदादा सावंत यांची दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा बारच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धुळे जिल्हा वकील संघाने मुंबईत बार कौन्सिल च्या कार्यालयात जाऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल पाटील, उपाध्यक्ष ॲड. मधुकर भिसे, सचिव ॲड. उमेशकांत पाटील, ॲड. बळीराम वाघ, कार्यकारणी सदस्य ॲड. उमाकांत घोडराज, ॲड. अर्जुन महाले, ॲड. ललित महाले, ॲड. अमोल बडगुजर, तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. विजय रंवदळे, ॲड. हितेश कबाडे, ॲड. राहुल शिकारे, ॲड. योगेश खैरनार, ॲड. प्रशांत चौधरी आदींनी अमोल सावंत सरांचे अभिनंदन केले.
अमोल सावंत धुळे बारचे सदस्य असल्याने जिल्हा वकील संघाचा सन्मान व प्रतिष्ठा महाराष्ट्र आणि गोवा राज्यात वाढली असल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

0Shares

Related post

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राजकीय समीक्षक पवारांचे आर्थिक लाभार्थी असल्याने सहा दशकांच्या राजकीय कार्यकाळाची समिक्षा होत नाही…?      …
आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

प्रा. ज्योती वाघमारे यांची निवड : आंबेडकरी चळवळीचा वैचारिक पाया मोडीत काढण्याच्या नियोजित योजनेचा व्यावहारिक भाग!…
असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड    देशभर कामगारांचा प्रचंड विरोध असतानाही अखेर सरकारने चार लेबर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *