नवी मुंबईत राज्यस्तरीय रिपब्लिकन खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन !
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रजासत्ताक विदयार्थी परिषद, प्रजा सबलिकरण महासभा आणि बुध्द सासन सभा मुंबई महानगर प्रदेशाच्या वतीने राज्यस्तरीत खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. ही वक्तृत्व स्पर्धा ऑनलाईन, ऑफलाईन रेकॉर्डेड व्हिडीओ आणि प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या स्पर्धकांना यामध्ये भाग घेता येईल. १) “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भवितव्य” २) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापनेच्या मागील ६७ वर्षात का उभारला नाही. ३) रिपब्लिकन शासनकर्ती जमात : निती, धोरण, पुनर्रचना आणि कर्तव्य ४) रिपब्लिकन अनुयायी नव्या नेत्याच्या शोधात ! ५) सामाजिक न्यायाच्या धोरणात आणि संविधानाच्या संवर्धनात रिपब्लिकन पक्षाची भुमिका ६) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन पक्षाच्या मुळावर ! हे विषय आहेत. वरील सहा पैकी कोणत्याही एका विषयावर स्पर्धकाला वक्तृत्व स्पर्धैत भाग घेता येईल. स्पर्धेचे स्वरुप तीन प्रकारचे असून वक्तूत्व स्पर्धा जेथे असाल तेथे भाषणाचा व्हिडीओ रेकॉर्ड अथवा प्रत्यक्ष सुप्पारक भवन, प्लॉट नं ५२, सेक्टर – १९, खारघर, नवी मुंबई येथे हजर राहून स्पर्धेत भाग घेता येईल अथवा वरील पैकी कोणत्याही एका विषयावर निबंध स्वहस्तक्षरात अथवा टंकलेखित (संगणक) माध्यमाद्वारे E-mail :- hshakkya@gmail.com आणि ८६९३०१५२७९/ ९८६७१८७६६५ व्हॉटसृॲप नंबरवर पाठवावे तसेच प्रत्यक्ष हजर राहून वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊ इच्छिनाऱ्या स्पर्धैकांनी शनिवार दि. ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वरील मोबाईल नंबरवर व्हॉटस्ॲप द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धकाची योग्य व्यवस्थापन करणे सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्यामूळे नोंदणी केल्याशिवाय स्पर्धेत भाग घेता येणार नाही. वक्तृत्वासाठी केवळ जास्तीत जास्त १० मी वेळ आहे. वत्कृत्वाचे माध्यम इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेत आहे. स्पर्धा रद्द करणे अथवा नियमात फेरबदल करण्याचे अधिकार आयोजकाच आहेत. सर्वोत्कृष्ठ पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या यशस्वी स्पर्धकाला अनुक्रमे ८ हजार, ०५ हजार, ३ हजार रुपये भारताचे सविधान, स्मृति चिन्ह आणि प्रशिस्ती पत्र देऊन त्याच दिवशी निमंत्रीत पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करणार येईल. स्पर्धा सर्वांसाठी निशुल्क व खुली आहे. असे या स्पर्धैचे आयोजक आयु. एच. बी. जाधव, ॲङ हर्षल शाक्य, नंदू मोहिते, अनिल मुळे, राजरत्न डोंगरगावकर, किशोर शिंदे, प्रणित कांबळे, अक्षय कांबळे यांनी एका निवेदनाद्वारे कळविले आहे.
– एच. बी. जाधव, ॲङ हर्षल शाक्य, राजरत्न डोंगरगावकर