• 111
  • 1 minute read

नागपूर मतदार संघ आता भाजपाचा मजबूत गड असून तेथे निवडणुके दलित आता अगदी अदखलपात्र झाले आहेत.

नागपूर मतदार संघ आता भाजपाचा मजबूत गड असून तेथे निवडणुके दलित आता अगदी अदखलपात्र झाले आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदार संख्या नागपूर मतदार संघात १९,००,७८७ होती. त्यापैकी १०,८५,०७१ मतदारांनी म्हणजेच ५७.१६% टक्के मतदारांनी मतदान केले; त्यापैकी भाजपाच्या गडकरींना ५,८७,७६७; काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांना ३,०२,९१९ व बसपाच्या डॉक्टर मोहन गायकवाड यांना ९६,४३३ तर आपच्या अंजली दमानियांना ६९,०८१ एवढी मते मिळाली. विरोधकांना एकत्रितपणे ४,६८,४३३ एवढी मते मिळाली असून गडकरींना त्यापेक्षा १,१९,३३४अधिक मते मिळाली. भाजपाला ५४.१७%, काँग्रेसला २७.९२% तर बसपाला ८.८९% व आपला६.३७% मते मिळाली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघाची मतदार संख्या २१,६९,९३० एवढी होती आणि दिलेली एकूण मते ११,८७,२१५ एवढी होती. त्यापैकी भाजपाच्या गडकरींना ६,६०,२२१(५५.६७); काँग्रेसच्या नाना पटोले यांना ४,४४,२१२(३७.४५%)आणि बसपाच्या मोहम्मद जमाल यांना ३१,७२५(२.६७%) व वंचितच्या सागर डबरासे यांना २६,१२८(२.२%) मते मिळाली. म्हणजेच विरोधकांची एकत्रित मते ५,०२,०६५ एवढी असून त्यापेक्षा गडकरींना ( ६,६०,२२१-५,०२,०६५) १,५८,१५६ मते अधिक मिळाली.

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने अवहेलना करून अखेर गडकरींना उमेदवारी जाहीर केली तेव्हा समर्थकांच्या प्रचंड गर्दीत गडकरी नामांकन अर्ज दाखल करायला गेले त्यावेळेस त्या भाऊगर्दीत स्वतःची आंबेडकरवादी अशी ओळख सांगणारे सुलेखा कुंभारे आणि जोगेंद्र कवाडे नारंगी शालीसह उपस्थित होते.

गडकरींना समर्थन जाहीर करताना जोगेंद्र कवाडे म्हणाले, यावेळी नागपूरकरांनी गडकरींना लोकशाही व संविधान मजबूत करण्यासाठी पाच लाखांच्यापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून द्यायचे आहे. कवाडेंना ते काय म्हणतात त्याचा अर्थ त्यांना स्वतःला कळला तरी पुरे आहे. कवाडे, कुंभारे, गवई, खोब्रागडे, शेंडे इत्यादींची आंबेडकरवादी म्हणवून घेणारी संघटने आहेत पण निवडणुकांच्या फडात त्यांची उपस्थिती नसते आणि त्यांची वळवळ केवळ समर्थनापूरती उरली आहे व याची त्यांना ना खंत,ना खेद!

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या झेंड्याखाली यशवंत मनोहर यांना मैदानात उतरवले होते. मनोहर यांना केवळ ४,४५५ मते मिळाली. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे मात्र त्यांच्या संघटनेची उपस्थिती या मतदार संघात दखलपात्र नाही.

खरी गंमत बहुजन समाज पक्षाची आहे. भारतात सर्वत्र एकला चलो रे ही भूमिका मायावतीने घेतली आहे, त्याला अनुसरून नागपूर मतदार संघात योगेश लांजेवार यांना मायावतीने मैदानात उतरवले आहे ते केवळ आपल्या पक्षाची हजेरी लावण्यासाठी. २०१४ ला बसपाला ८ .८९% तर २०१९ ला २.३७% मते मिळाली होती. या मतदारसंघात आता बसपाने असे काय केले आहे की विजयापर्यंत जाण्याइतपत त्यांच्या मतदारांची टक्केवारी वाढवलेली आहे?

कोणत्याही लोकसभा मतदारसंघात विजयी होण्यासाठी किमान ४५ ते ५०% मतांची बेगमी करावी लागते. एकला चलो रे भूमिका स्वीकारलेल्या बसपा वा वंबआची अशी ताकद कोणत्याही मतदार संघात दिसून येत नाही. अशा परिस्थितीत वोट कटुवा पार्टी हेच नामाभिधान त्यांना मिळू शकते आणि अंतिमतः भाजपाची सहाय्यकारी दले अशी त्यांची ओळख स्थापित होते. लोकशाही व संविधानाचे संरक्षण हे दूरचे साजरे डोंगर आहेत.

अशीच अवस्था शेजारच्या रामटेक मतदार संघाची आहे. रामटेकमधून बसपाच्या संदीप मेश्राम यांनी नामांकन दाखल केले आहे आणि अपक्ष म्हणून सुरेश साखरे यांनी. सुरेश साखरे पूर्वी बसपाचे प्रदेशाध्यक्ष होते. नंतर ते ठाकरेंच्या शिवसेनेत आले आणि आता ते रामटेकमधून अपक्ष म्हणून लढत आहेत. कारण एकच. लोकशाही व संविधानाच्या सलामतीसाठी. सैतान त्यांना यश देवो !

0Shares

Related post

निवडणूक ईव्हीएम मधील हेराफेरी, काळ्या पैशाचा महापूर, व निवडणूक आयोगाची निष्क्रीयता या विरोधात बीआरएसपी लढा उभारणार”

निवडणूक ईव्हीएम मधील हेराफेरी, काळ्या पैशाचा महापूर, व निवडणूक आयोगाची निष्क्रीयता या विरोधात बीआरएसपी लढा उभारणार”

निवडणूक ईव्हीएम मधील हेराफेरी, काळ्या पैशाचा महापूर, व निवडणूक आयोगाची निष्क्रीयता या विरोधात बीआरएसपी लढा उभारणार”…
आंबेडकरी चळवळ व मिशन चालविणारेच डॉ. आंबेडकर यांच्या स्वप्नांतील वर्ग व वर्णहीन भारताच्या निर्मितेतील अडथळे….!

आंबेडकरी चळवळ व मिशन चालविणारेच डॉ. आंबेडकर यांच्या स्वप्नांतील वर्ग व वर्णहीन भारताच्या निर्मितेतील अडथळे….!

विधानसभा निवडणुकीतील 4,140 उमेदवारांमध्ये रिपब्लिकन पक्ष, आंबेडकरी विचारांच्या 19 पक्षांचे अन अपक्ष बौद्ध उमेदवारांची संख्या 2040…
अपप्रचार करणाऱ्या नवाब मलिक यांच्या विरोधात कारवाई करा – अबू आझमी यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

अपप्रचार करणाऱ्या नवाब मलिक यांच्या विरोधात कारवाई करा – अबू आझमी यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

नशेच्या प्रकरणावरून मानखुर्द – शिवाजीनगरमधील जनतेची बदनामी सहन केली जाणार नाही…. अबु आजमी यांचा अजित पवार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *