नागपूर येथील रवी भवन येथे महाराष्ट्रातील रिपब्लिकन विविध आंबेडकरी पक्षाच्या..,संघटनांच्या…गटांच्या…राज्याध्यक्ष यांची सभा संपन्न…
(नागपूर) दि.14 जुलै 2024 ला रवी भवन नागपूर येथे विविध आंबेडकरी पक्षांचे.. संघटनांचे.. गटांचे राज्याध्यक्ष यांची बैठक घेण्यात आली .या बैठकीत आजाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे यांना सर्वानुमते बैठकीचे अध्यक्ष स्थान देण्यात आले होते. या बैठकीला विविध आंबेडकरी संघटना व पक्ष च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्या त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष यांनी बैठकीला हजेरी लावली होती. त्यात प्रामुख्याने आजाद समाज पार्टीचे व भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांच्या आदेशानुसार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने यांच्या आदेशानुसार राज्य अध्यक्ष रमेश पाटील ,भारत मुक्ती मोर्चा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या आदेशानुसार राज्य अध्यक्ष श्रीकांत दादा ओहल, भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले यांच्या आदेशानुसार त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांच्या सूचनेनुसार त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. सभेचे अध्यक्ष स्थानी आजाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा भीम आर्मी चे राज्य अध्यक्ष आनंद लोंढे उपस्थित होते.
या बैठकीत सर्वच पक्षांचे अध्यक्षांनी सकारात्मक चर्चा केली असून रिपब्लिकन कृती समिती तयार करण्याबाबत मुंबई येथे आगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकीकृत रिपब्लिकन समितीच्या माध्यमातून सशक्त एकीकृत रिपब्लिकन आंबेडकर संघटना स्थापन करण्याच्या दृष्टीने सर्व गटांचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची मुंबई या ठिकाणी बैठक घेण्याचे ठरविण्यात आले व त्या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरविण्यात येईल असे सर्व राज्याध्यक्षांच्या संयुक्त वतीने निर्णय घेण्यात आला. या बैठकीचे आयोजन एकीकृत रिपब्लिकन समितीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केलेले होते. यावेळी भीमशक्ती संघटनेचे प्रदेश सचिव रोशन जांभुळकर, सामाजिक कार्यकर्ते अमृत बनसोड भंडारा ,सामाजिक कार्यकर्ते दिलीप वानखेडे भंडारा, सामाजिक कार्यकर्ते तसा पत्रकार संजीव भांबोरे भंडारा ,पत्रकार कालिदास खोब्रागडे भंडारा ,सामाजिक कार्यकर्ते विजय भोवते भंडारा ,आर व्ही मडामे ,सामाजिक कार्यकर्ते ग्यानचंद जांभुळकर ,सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक रमेश जांगडे,
भीमशक्ती नागपूर शहराध्यक्ष हंसराज मेश्राम बाबा बनसोड भिम शक्ती नागपूर अस्मिता साळवे आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंजिनिअर पद्माकर गणवीर विदर्भ राज्य प्रभारी राष्ट्रीय संघटक भारत मुक्ती मोर्चा दीपक ढोके प्रवक्ता प्रदेश तारा मेश्राम अमृत गजभिये खोब्रागडे रिपब्लिकन गट दुर्वा चौधरी जिल्हाध्यक्ष नागपूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर घर वसंत कांबळे आनंदराव आंबेडकर गटाचे भगवान शेंडे भूषण भस्मे भारतीय बुद्ध महासंघाचे पद्माकर गणवीर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे दिनेश हनुमंत वैभव बडगे राजेश रंगारी विलास खवास प्रकाश शहारे दीपक शेंडे हेमलता पाटील सुमित साबळे संजय फुलझिले व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी समाज कल्याण सभापती तथा एकीकृत रिपब्लिकन चे अध्यक्ष भंडारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केले संचालन सामाजिक कार्यकर्ते अमृत बनसोड यांनी केले तर आभार प्रबोधनकार यांचं ज्ञानचंद ग्यानचंद जांभुळकर यांनी मानले.