• 140
  • 1 minute read

नागूतात्याचा बोल खरा ठरला !

नागूतात्याचा बोल खरा ठरला !

नागूतात्या नावाचा माझ्या वडिलाचा एक चुलता होता .Ex. मिलिट्रीमन.देखना, रुबाबदार, करारी आणि तितकाच विक्षिप्त . आपल्या घरातील बायकांनी पाणी भरायला सार्वजनीक पाणवठ्यावर जावू नये म्हणून नागू तात्याने आपल्या छोट्या घरातच आड खोंदला होता .

नागूतात्या गाण्याचा अत्यंत नादी आणि चहाचा अत्यंत तलपी होता . संध्याकाळ झाली की त्याचे डोळे उघडत. त्याचा परीवार मोठा होता. बायका मुले घेऊन तो गावी रहात होता. कटाळ्या सारखे नागूतात्याला ही कोणतेही कामधाम येत नव्हते . इंग्रज मायबाप सरकारने महारांना थोडी शेत जमीन दिली होती , त्यावर आणि किरकोळ उलाढाली करून नागूतात्या आपल्या परिवाराचे पोट भरत होता .

पूर्वी ग्रामीण भागात तमाशा , लेझीम हे एकमात्र करमणुकीचे साधन होते .नागूतात्याला तमाशाचा भारी शौक . रात्र झाली की तमाशातील गाणी मोठ्याने म्हणत तो चावडीत पडे.

माझे वडील सोलापुरला दयानंद कॅालेज मध्ये शिकत होते . दिवाळीच्या सुट्टीत ते गावी आले . घरा समोरील अंगणात वडील आणि त्यांचे मित्र बसले होते . चुलत्याची खवंडळ काढण्याची हुकी वडिलांना आली .’ शुभमंगल चरणी गण नाचला ‘ अशी गण वडिलांनी मोठ्याने म्हटली. नागूतात्या चावडीत पडला होता. “कोण हाय र तो , गण नाचवणारा ?” असे म्हणत नागूतात्या धावत आला.त्याचा चढलेला आवाज , भेसूर झालेला चहरा बघून वडील घाबरले. वडिलांना बघून नागूतात्या म्हणाला ” आर..र..र बापसख्या तू हायस व्हय र ! कोणाच भल झालय गण म्हणून ? झाडाखाली निवांत पुस्तक वाचत बसायच ! जिंदगी भर तुपात रोटी चुरून खाशील .”

वडिलांनी नागू तात्याचा साल्ला ऐकला . नागूतात्याचा बोल खरा ठरला .

– प्रियदर्शी सोनवणे

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *