- 140
- 1 minute read
निमंत्रणाच्या समर्थनात राजेंद्र गवई, मात्र धर्मांध व संविधान विरोधी संघाच्या कार्यक्रमाला न जाण्याचा कमलताईचा निर्णय……..!
संघ, भाजपशी संबंध असणारे सारेच आंबेडकरी विचारांशी, चळवळीशी गद्दार व देशाचे दुश्मन, देशद्रोही......!
राष्टीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांशी रा. सु. गवई यांचे अतिशय घरोबा आणि घनिष्ट संबंध होते. ते आज ही आहेत. त्याच संबंधातून अमरावतीत होणाऱ्या संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आईसाहेबांना आले आहे. विरोधाची पर्वा न करता त्यांनी मुख्य अतिथी म्हणून कार्यक्रमाला जावे, मुलगा म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे वक्तव्य रामकृष्ण सूर्यभान गवई यांचे चिरंजीव व रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी अतिशय गर्व आणि अभिमान व्यक्त करीत केले व निमंत्रण वादावर पडद्या टाकण्याचा प्रयत्न केला मात्र संघ आणि भाजपने आंबेडकरी विचारांची चळवळ, राजकीय पक्ष, संघटना व समाज किती खोलवर पोखरून काढला आहे, हे राजेंद्र गवई यांच्या या वक्तव्यामुळे स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच या निमंत्रणा विषयी बोलताना गवई स्वतः अशा कार्यक्रमाला गेल्याचे सांगून या निमंत्रणाचे समर्थनही केले आहे. इतके सारे करण्या मागे त्यांची काय अडचण आहे, हे त्यांना आणि संघालाच माहित.
या विषयावर पडद्या टाकण्यासाठी त्यांनी सोशल मिडियाचा वापर केला. तसेच आपल्या वक्तव्यात त्यांनी आंबेडकरी विचाराचा आणि आंबेडकरी विचारामुळे स्वाभिमानी, प्रबुद्ध झालेल्या समाजाच्या भावनांना पायंदळी तुडविण्याचा प्रयत्न ही केला. संघ आणि भाजप परिवाराशी असलेल्या गवई परिवाराच्या संबंधात आडकाठी ठरणाऱ्या कुठल्याही गोष्टींचा आणि कुणाची ही पर्वा गवई परिवार करीत नाही, असे विधान ही त्यांनी केले. तसेच या प्रकरणी गवई परिवाराची संयुक्तपणे एक भूमिका असल्याचे दिसत नसून वास्तविक जीवनात ही हा परिवार विभक्त असून त्यांच्यात कमालीचे वाद आहेत.
आर. एस. एस.गवई ……..!
संघाच्या कार्यक्रमाला जाण्यात गैर काहीच नाही. स्वतः रामकृष्ण गवई संघाच्या कार्यक्रमाला गेले होते. असे सांगत ते या निमंत्रणाचे समर्थन करीत आहेत. मात्र गवई ही कार्यक्रमाला गेल्यानंतर खूप विरोध झाला होता. त्या कार्यक्रमानंतर आर. एस. गवई यांच्या नावापुढे आणखी एक एस लावून त्यांना आर.एस.एस. गवई बोलले जात होते. या अगोदर ही अशा प्रकारचा विरोध या कुटुंबाने झेलला आहे. मात्र आज पुन्हा ते त्याच वाटेने जात आहेत. काय मजबुरी आहे, हे त्यांनाच माहित.
या संदर्भात राष्टीय पातळीवरून विरोध होऊ लागला असून गवई परिवाराला आधीच बसलेला गद्दारीचा शिक्का आता अधिक गडद होऊ लागला आहे. दरम्यान, कमल गवई यांनी संघ हे संघटन धर्मांध विचारांचे, संविधान व लोकशाही विरोधी असल्याने आपण त्या कार्यक्रमाला जाणार नाही, हे स्पष्ट केले आहे. तरी ही राजेंद्र गवई या निमंत्रणात व जाण्यात काहीही गैर नाही, असे बोलत आहेत. त्यावरून हे स्पष्ट होत आहे की, या सर्व प्रकरणा मागे ते स्वतःच आहेत. संघ आणि भाजपने आंबेडकरी चळवळ आणि समाजाला किती खोलवर जाऊन किड लावली आहे, हे पाहण्यासाठी राजेंद्र गवई यांचे हे वक्तव्य पुरेसे आहे. आम्ही काही ही केले तरी संघ व भाजप आणि त्यांची सरकार, यंत्रणा आमच्या मागे खंबीरपणे उभी असल्याने आमचे कुणीच काही वाकडे करू शकत नाही, असा एक गर्भित इशारा ही त्यांच्या या वक्तव्यात होता.
मोदींच्या अकरा वर्षांच्या सत्ताकाळात संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे. संघाचा हिंदू राष्ट्र निर्मितीचा अजेंडा लपून राहिलेला नाही. भाजप,भाजपची सरकारे आणि सारी प्रशासन व्यवस्था हिंदू राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी आहेत. बाबरी मशीद प्रकरणी बहुसंख्यांक समाजाच्या आस्था व अस्मितेला डोळ्यासमोर ठेवत संविधान विरोधी घेतलेला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय याचे जिवंत उदाहरण आहे. अशा संघ, भाजपबरोबर आंबेडकरी समाजाचे कधीच घनिष्ट संबंध असू शकत नाहीत. अन् ज्यांचे असतील ते आंबेडकरी विचार व समाजाचे गद्दार आहेत.
संघ, भाजप मनुस्मृतीला विधान मानतो व वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करतो, तर आंबेडकरी विचार या दोन्ही गोष्टी केवळ नाकारतच नाहीतर त्यास पर्याय ही देतो. त्यामुळे संघाची ब्राह्मणी धर्म व्यवस्था व भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी दिलेली सवैधानिक व्यवस्था या परस्पर विरोधी आहेत.
या देशाने हजारो वर्षांच्या गुलामीनंतर स्वतंत्र होताच लोकशाही राज्य व्यवस्था व ती चालविण्यासाठी संविधान स्वीकारले आहे. या दोन्ही व्यवस्था डॉ. आंबेडकर यांनी या देशाला दिल्या असून हेच आज या देशातील अधिकृत आहेत. तर मनुस्मृतीचा पुरस्कार आणि वर्ण व्यवस्था मानने हे देश विरोधी, देशद्रोही कृत्य आहे. संघ, भाजप या दोन्ही गोष्टींचा पुरस्कार करीत असल्याने संघ व भाजपशी संबंध ठेवणे म्हणजे देशद्रोही शक्तींशी संबंध ठेवण्यासारखे आहे. हे कृत्य ही देशद्रोहीच आहे. राजेंद्र गवई यांना या संबंधात काहीच गैर वाटत नसेल तर ते केवळ आंबेडकरी चळवळीशी गद्दारी करीत नाहीत, या देशाशी ही गद्दारी करीत आहेत.
………………………..
राहुल गायकवाड,
प्रवक्ता, महासचिव समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश