• 275
  • 1 minute read

निवडणूक ईव्हीएम मधील हेराफेरी, काळ्या पैशाचा महापूर, व निवडणूक आयोगाची निष्क्रीयता या विरोधात बीआरएसपी लढा उभारणार”

निवडणूक ईव्हीएम मधील हेराफेरी, काळ्या पैशाचा महापूर, व निवडणूक आयोगाची निष्क्रीयता या विरोधात बीआरएसपी लढा उभारणार”

निवडणूक ईव्हीएम मधील हेराफेरी, काळ्या पैशाचा महापूर, व निवडणूक आयोगाची निष्क्रीयता या विरोधात बीआरएसपी लढा उभारणार" - अॅड.(डॉ.) सुरेश माने.

मुंबई: 
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणूकीत अमाप पैशांचा महापूर, ईव्हीएम मशीन मधील हेराफेरी, निवडणूकीतील गैरप्रकार, राजकीय पक्षाव्दारे अमाप पैशाची उधळपट्टी यामुळे निवडणूकीतील लोकांचा स्वतंत्र व निपक्ष निवडणूका यावरील विश्वास कमी होत असून, निवडणूकामध्ये काळा पैशांचा महापूर, निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरवापर यांना रोखण्यात भारतीय निवडणूक आयोग, यंत्रणा संपूर्णपणे अपयशी ठरलेल्या असून या विरोधात राज्यघटना व लोकशाही रक्षणासाठी बीआरएसपी तर्फे राज्यात व दिल्लीत आगामी दिवसात  उग्र जन आंदोलन केले जाईल, अशा प्रकारचा जाहीर ईशारा बीआरएसपीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. डॉ. सुरेश माने यांनी मुंबई पेथे दिनांक ०१ डिसेंबर २०२४ रोजी बीआरएसपी महाराष्ट्र प्रदेश वतीने आयोजीत निवडणूक आढावा बैठकीत जाहीर केले आहे. ही बैठक मुंबई-चेंबूर या ठिकाणी पार पडली.
 
बीआरएसपी चा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीतीत सहभाग व अपयश याची समीक्षा करतांना अॅड. डॉ. सुरेश माने यांनी असमाधान व्यक्त करून, पक्ष संघटना यंत्रनेची पुनर्रचना करून आगामी निवडणूकांना सामोरे जाण्याचे सर्व बीआरएसपी पदाधिकारी-कार्यकर्ते यांना आवाहन केले. याशिवाय, निवडणूकीतील गैरप्रकाराचे विश्लेषण करताना राज्यात महाविकास आघाडीला फाजील आत्मविश्वास नडला. तर, लहान-सहान राजकीय पक्षांना या निवडणूकीत महायुती व महाविकास आघाडी या दोघांनी मिळून संपविण्याचे कटकारस्थान केले असाही आरोप अॅड. डॉ. माने सर यांनी केला.
 
या निवडणूकीत महायुती व महाविकास आघाडी नेत्यांकडून एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी करोडो रूपये, काळ्यापैशांचा वापर करण्यात आला. मात्र, निवडणूकीतील काळयापैशाचा गैरवापर रोखण्यास भारतीय निवडणूक आयोग कसा अपयशी ठरला,  याची चिरफाड करतांना राज्याच्या निवडणूकीत निवडणूक आयोग यंत्रणेतर्फे करोडो रूपये जप्त केले, करोडो रूपयाची दारू, सोने-चांदी जप्त केले. त्याबाबतत निवडणूक आयोग
व पोलीस यंत्रणेव्दारा राज्यात किती गुन्हे नोंदविले, कारवाई केली व हा काळा पैसा कुणाचा होता, कुणासाठी वाटला गेला? याचा विस्तृत खुलासा राज्यातील निवडणूक आयोग यंत्रणा व पोलीस यंत्रणा यांनी लोकहीतासाठी जाहीर करण्याचे आवाहन अॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले. देश व राज्यात भाजपा-मोदी केंद्र सरकार व्यारा नोटबंदी नंतर काळा पैशाचा गैरवापर थांबला,  या भाजपाच्या दाव्याची राज्य विधानसभा निवडणूकीतील पैशाच्या
महापुराने पुरेपुर वस्त्रहरण केलेले आहे, असेही अॅड. डॉ. सुरेश माने यांनी स्पष्ट केले. याशिवाय राज्यातील ईवीएम निवडणूक आकडेवारी, एकुण मताची टक्केवारी व महायुतीला मिळालेले अनपेक्षीत यश याबावत प्रश्न चिन्ह निर्माण करून भारतीय निवडणूक आयोग आपल्या घटणात्मक जबाबदारीचे पालन करीत नसून त्याला केंद्र व राज्य सरकार यंत्रणा खतपाणी घालत असून, याप्रकारे भारतीय लोकशाही व राज्यघटना या दोन्हीची हत्या केली जात असल्याचा आरोप अॅड. डॉ. सुरेश माने यांनी अनेक उदाहरणासह केला. या सर्व विरोधात बीआरएसपी-मित्र पक्षा या तर्फे राज्यात व दिल्लीत आंदोलन केले जाईल असे अॅड. डॉ. माने सरांनी घोषीत केले.
याबैठकीला बीआरएसपीचे राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, उमेदवार, पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर, पक्षाची आवश्यकता लक्षात घेऊन व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूका लक्षात घेऊन बीआरएसपी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले असून पक्षाचे नवीन पदाधिकारी लवकरच घोषीत करण्यात येतील.
 
 
0Shares

Related post

जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले

जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले

जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले जळगांव दि.२२(यूबीजी विमर्श-प्रतिनिधी)       जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ रेल्वे…
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !        महाराजा शहाजीराजे – जिजाऊ माँसाहेब यांच्या संकल्पनेतील आणि अथक…
अमेरिकन व्हाइट हाऊस मध्ये भारतीय वंशाचा उष:काल !

अमेरिकन व्हाइट हाऊस मध्ये भारतीय वंशाचा उष:काल !

अमेरिकी व्हाइट हाऊस मध्ये दक्षिण भारतीय महिलांचा उष:काल !       डोनाल्ड ट्रम्प 47 वे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *