नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनेकांनी निवडणुक भाकितांचा बाजार भरवला. त्यात शेअर बाजार उसळला आणि नंतर कोसळला. यात अनेक सर्वसामान्यांचा आर्थिक चूराडा झाला. भाकितकार मात्र आता गायब झाले.
अशाच एका प्रायोजित “भाकीतकावर” एका चॅनलवर झालेला विनोद मजेशीर आहे. संकेत उपाध्याय यांच्या युट्युब चॅनलवर ‘प्रशांत महासागर’ सध्या कुठे आहेत. त्यांचे विद्वत्ता दिसत नाही. असा खोचक विनोद केला. त्यावर आणखी एक सहभागी उत्तरला, त्यानेही विनोदाचा चिमटा घेत म्हणाला… ‘मै पीके बात नही करता’ अर्थातच हा महासागर आणि पिके कोण म्हणजे प्रशांत किशोर.
किशोरांचं भाकीत पश्चिम उत्तरेकडून उडून पूर्व किनाऱ्याला आंध्रा आणि ओरिसात लागलं. प्रशांत यांचा ओरिसातला अंदाज किशोर वयात गेला.
2010 पासून म्हणजे साधारण चौदा वर्षात असे अनेक महात्मे, अनेक स्वातंत्र्यलढ्याचे दुसरे गांधी, विद्वान, बाबा, बुवा उदयाला आले आणि असेच विनोदी चमत्कार करून होऊन शांत होत आज पडद्यामागे गेलेत. काही जात आहेत. जाणारच. कारण प्रायोजित कार्यक्रम कार्यभाग संपल्यावर एक दिवस आटोपणारच..चलो,… चलती का नाम जिंदगी…