• 627
  • 1 minute read

निष्ठावंत नोकर आणि प्रेमळ मालकाची जुगलबंदी !

निष्ठावंत नोकर आणि प्रेमळ मालकाची जुगलबंदी !

रविवारचा सुट्टीचा दिवस हा अगदी मस्त एन्जॉय करायचा दिवस असतो. आपल्या परीवारासोबत, मित्रांसोबत. कालचा रविवार अगदी छान एन्जॉय करता आला तो राजू बन गया झेंटलमन या विनोदी व तितकाच सस्पेंस अशा नाटकाने.
राजू बन गया झेंटलमन ची कथा मालक आणि नोकराच्या अवतीभवती फिरत असली तरी त्यात अंशुमन विचारे या नटाने साकारलेला नोकर हा बावर्जी सिनेमा मधला राजेश खन्ना आणि स्वर्ग मधला गोविंदा यांच्या तोडीचा वाटायला लागतो. अंशुमन विचारे इतके त्यात समरसून गेले आहेत. ‌ त्याच बरोबर उमेश जगताप यांनी साकारलेला मालक मला आयत्या घरात घरोबा या मराठी सिनेमातला अशोक सराफ यांनी साकारलेला गोपू काका आठवायला लावतो. अमृता फडके यांनी साकारलेली चिंगी पण तिच्या अल्लडपणा मुळे लक्षात राहते. त्याचबरोबर पालिका कर्मचारी, पोलिस आणि पाकिस्तानचा बजरंगी भाईजान ही छोट्या भूमिकेत असले तरी छाप पाडून जातात.( नरेंद्र केरेकर, संदीप कांबळे) या नाटकात चिंगीचा मानलेला कट कारस्थानी भाऊ विनम्र भाबल यांनी चांगला साकारलाय.
मालक आणि राजूचे संवाद त्याच्यातील भाषेच्या विशेषता राजूचे कोकणी भाषेतले संवाद आणि त्याला शुध्द करणारे मालक यातून त्यांची जुगलबंदी होते. हे संवाद प्रेक्षकाना खूप अधिक हसायला लावतात. राजूची मालकाप्रती असलेली निष्ठा असूनही मालकाच्या अभिनय करण्याच्या हौसेवर त्याने कठोर प्रहार करुन त्यातूनही खूप छान विनोदनिर्मिती झाली आहे. ‌मालकाच्या एकटेपणामुळे राजूने घेतलेली काळजी आणि राजुला खूप काम पडते म्हणून सोबतीला कोणीतरी घेऊन ये असं सांगणारा मालक उमेश जगताप यांनी तितकाच प्रेमळ साकारलाय.‌ नाटकात मध्ये मध्ये अलेक्सानी वाजविलेली गाणी, राजू आणि चिंगीच्या प्रेम प्रसंगात दिलेले गाणं, नाटकाचे संगीत, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्थ साऱ्यांना पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतील.
नाटकाच्या पहिला भाग खुनाच्या कट कारस्थाने संपतो आणि दुसऱ्या भागात त्या खूनाच्या कटाचा शोध सुरु होतो. अंशुमन यांनी साकारलेला राजू आणि उमेश जगताप यांनी साकारलेला मालक, चिंगीचा अल्लड पणा, तिच्या कारस्थानी भावाचे उद्योग,धमाल पालिका कर्मचारी, पोलिस, जवान, आणि पाकिस्तानचा सलमान खान उर्फ बजरंगी भाईजान बघण्यासाठी राजेश कोळंबकर लिखित आणि प्रशांत विचारे दिग्दर्शित राजू बन गया झेंटलमन हे खूप धमाल विनोदी तितकेच रहस्यमयी नाटक आपण साऱ्यांनी नक्कीच पहावे.

-सुरेंद्र बनसोडे

0Shares

Related post

जिथे विसावली मुम’ताज महल !

जिथे विसावली मुम’ताज महल !

जिथे विसावली मुम’ताज महल ! जगातील 7 आश्चर्या पैकी ताजमहल हे एक आश्चर्य असून ही वास्तू…
वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी पुणे : वेल्हा तालुक्यातील साखर या गावांमधील…
स्पर्धात्मक निवड प्रक्रिया डावलून शिल्पकार, आर्किटेक्टला पसंती !

स्पर्धात्मक निवड प्रक्रिया डावलून शिल्पकार, आर्किटेक्टला पसंती !

डॉ. आंबेडकर स्मारक दक्षता समितीचा गौप्यस्फोट सर्वाधिक आसन क्षमतेचे सभागृह देशाच्या आर्थिक राजधानीत का नको ?…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *